Friday, June 9, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

2 October Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा आपण सर्व भारतीय नागरिकांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आज  आपल्या देशाचे महान क्रांतिकारक नेता व स्वतंत्रता सेनानी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री या सरख्या महान नेत्याचा जन्मदिन आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे अहिंसेचे थोर पुजारी असल्याने त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आज संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

तसचं, आपल्या देशाचा स्वच्छता दिन देखील आहे. सन २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीनिमित्त देशांत राष्ट्रीय स्वच्छता दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. तसचं, मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवसाचे संपूर्ण दिनविशेष जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 2 October Today Historical Events in Marathi

2 October History Information in Marathi
2 October History Information in Marathi

२ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 October Historical Event

  • सन 1909 साली थोर भारतीय समाजसेविका रमाबाई रानडे यांनी पुणे येथे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.
  • सन १९२५ साली जॉन लोगी बेअर्ड याने पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
  • सन १९५५ साली पेरांबूर येथे इंट्रीकल कोच फॅक्टरीची स्थापना करण्यात आली.
  • सन १९५८ साली गिनीला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
  • सन १९६९ साली महात्मा गांधीं यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.
  • सन १९९२ साली झी टीवी चे संस्थापक सुभाषचंद्र यांनी देशातील पहिल्या खाजगी उपग्रह वाहिनीची सुरवात केली होती.

२ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 2 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८६९ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रख्यात राजकीय आणि आध्यात्मिक नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९१ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय महाराष्ट्रीयन मराठी शिल्पकार विनायक पांडुरंग करमकर यांचा जन्मदिन.
  • सन १९०४ साली सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान भारत रत्न पुरस्कार सन्मानित पसिद्ध भारतीय राजकारणी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान तसचं, राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळाचे संस्थापक लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिन.
  • सन १९०८ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक, विचारवंत व साहित्यिक तसचं, बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचा जन्मदिन.
  • सन १९२७ साली भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या आग्रा आणि ग्वालेर घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा जन्मदिन.
  • सन १९४२ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्मदिन.

२ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 2 October Death / Punyatithi /Smrutidin

  • सन १९०६ साली प्रख्यात भारतीय चित्रकार आणि कलाकार राजा रवी वर्मा यांचे निधन.
  • सन १९६४ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व कार्यकर्त्या तसचं, स्वतंत्र भारतातील पहिल्या आरोग्यमंत्री महिला राजकुमारी अमृत कौर यांचे निधन.
  •  सन १९७५ साली भारत रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सेनानी व राजकारणी तसचं, तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री के. कामराज यांचे निधन.
  • सन १९८२ साली माजी भारतीय नागरी सेवक अधिकारी तसचं, इंग्रज सरकारने नियुक्त केलेले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर व केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचे निधन.
Previous Post

नवनाथ महाराजांचा मंत्र

Next Post

महात्मा गांधी यांचे अनमोल विचार

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Mahatma Gandhi Vichar Marathi

महात्मा गांधी यांचे अनमोल विचार

3 October History Information in Marathi

जाणून घ्या ३ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

Sniffer Dogs are Detecting Coronavirus in German

कुत्रे ओळखतील आता कोरोनाचे रुग्ण

4 October History Information in Marathi

जाणून घ्या ४ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

Bioluminescent Mushrooms

गोव्यात सापडले रात्री चमकणारे मशरूम्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved