जाणून घ्या २९ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

29 October Dinvishes

मित्रांनो, आपल्या इतिहासात अनेक काही घटना घडून गेल्या आहेत, ज्यांचा आपल्याला विसर पडला असेल. त्याच घटनांमुळे प्रत्येक दिवसाला महत्व प्राप्त झालं आहे. मित्रांनो, चला तर आपण जाणून घेवूया आजच्या दिवशी कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत तर, तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन तसचं, निधन पावणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल माहिती जाणून घेवूया.

जाणून घ्या २९ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 29 October Today Historical Events in Marathi

29 October History Information in Marathi
29 October History Information in Marathi

२९ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 29 October Historical Event

 • इ.स. १८५१ साली ब्रिटीश कालीन भारतात बंगाल प्रांतात ब्रिटीश इंडियन असोसिएशन ची स्थापना करण्यात आली.
 • इ.स. १८६४ साली युनान देशाने नवीन संविधान अंगिकारले.
 •  इ.स. १८९४ साली महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना करण्यात आली.
 • सन १९५८ साली  महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • सन १९९४ साली  विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीकरिता देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर करण्यात आला.
 • सन १९९६ साली  मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या तानसेन पुरस्कारासाठी बनारस घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड करण्यात आली.

२९ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 29 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १७३९ साली ब्रिटीश कालीन भारतातील ओडिसा राज्यातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख कार्यकर्ता जय राजागुरू यांचा जन्मदिन.
 • सन १९३७ सालीकर्नाटक राज्य साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त भारतीय कन्नड व इंग्रजी भाषिक लेखक, पत्रकार, चरित्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी एस. आर. रामास्वामी यांचा जन्मदिन.
 • सन १९३९ साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय बंगाली कवी, नाटककार, लघुकथा लेखक, निबंधकार आणि कादंबरीकार मलय रॉय चौधरी यांचा जन्मदिन.
 • सन १९८७ साली भारतीय व्यावसायिक बॉक्सर (मुष्टियोद्धा) विजेंदर सिंह बेनिवाल यांचा जन्मदिन.
 • सन १९८९ साली भारतीय विद्यमान क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज वरून आरोन यांचा जन्मदिन.
 • सन १९९६ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय हेपॅथलिट स्वप्ना बर्मन यांचा जन्मदिन.

२९ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 29 October Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९११ साली अमेरिकन वृत्तपत्र पोस्ट-डिस्पॅच आणि न्यूयॉर्क वर्ल्डचे प्रकाशक व संपादक जोसेफ पुलित्झर यांचे निधन.
 • सन १९३३ साली  फ्रेंच गणितज्ञ आणि राजकारणी तसचं,फ्रांसचे माजी पंतप्रधान पॉल पेनलिव्ह यांचे निधन.
 • सन १९७८ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतात वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे महान पॅथॉलॉजिस्ट वसंत रामजी खानोलकर यांचे निधन.
 • सन १९८८ साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय गांधीवादी विचारसारणी असणाऱ्या भारतीय क्रांतीकार व समाजसुधारक महिला कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here