Sunday, May 18, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

विजेंदर सिंग यांचा जीवन परिचय

Vijender Singh chi Mahiti

विजेंदर सिंह बेनीवाल मुख्यतः विजेंदर सिंह या नावाने ओळखले जातात ते एक प्रसिध्द भारतीय  बॉक्सर आहेत.  आपल्या या करीयर मध्ये त्यांनी ८ सामन्यांपैकी ८ ही सामने जिंकले आहेत. हरियाणा राज्यातील भिवनी जिल्हयातील कलुवास या गावात जन्मलेले.

भारतीय बॉक्सिंग संघात प्रवेशानंतर भारतीय बॉक्सिंग कोच गुरवक्श सिंह संधू यांनी त्यांना प्रशिक्षण दिले आहे.

Contents show
1 पद्मश्री पुरस्कार विजेता विजेंदर सिंग – Vijender Singh Biography in Marathi
1.1 अतुलनीय बॉक्सर विजेंदर सिंह – Boxer Vijender Singh Mahiti
1.2 विजेंदर सिंह यांचे पुर्वीचे व व्यक्तिगत जीवन – Early Life of Vijender Singh
1.3 विजेंदर सिंह यांचे अमली पदार्थावरून वाद – Vijender Singh Controversy
1.4 विजेंदर सिंह यांचे प्रोफेशनल करियर – Vijender Singh Career

पद्मश्री पुरस्कार विजेता विजेंदर सिंग – Vijender Singh Biography in Marathi

Vijender Singh Biography

अतुलनीय बॉक्सर विजेंदर सिंह – Boxer Vijender Singh Mahiti 

विजेंदर सिंह यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकले आहेत. २००४ च्या एथेन्स समर ऑलंपिक मध्ये ८ व्या क्रमांकावर राहीले होते, तर २००६ च्या कॉमनवेल्थ मध्ये त्यांनी ब्रॉंझ मेडल जिंकले होते. २००८ च्या बिजींग समर ऑलंपिक मध्ये ब्रॉंझ पदक जिंकले होते. हे कोणत्याही भारतीयासाठी बॉक्सिंग चे पहीले पदक होते, यामुळे त्यांचा भारतात गौरव करण्यात आला.

भारतीय खेळांसाठीचा सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न अवार्ड देवून त्यांना सन्मानीत करण्यात आले. त्यासोबतच त्यांना चौथा नागरी सन्मान पद्मश्री २००९ मध्ये देण्यात आला होता. जागतिक बॉक्सिंग असोसिएशन ने त्यांना आपल्या वार्षिक मिडलवेट कॅटेगरी सूचित २८०० पॉइंट देवून क्रमांक एक वर स्थापीत केले होते. २०१२ च्या ऑलंपिक मध्ये त्यांना निराशा हाती आली.

२९ जुन २०१५ रोजी त्यांनी आपले बॉक्सिंग करीयर सोडुन व्यावसायिक बॉक्सिंग क्षेत्रात पदार्पण केले.

विजेंदर सिंह यांचे पुर्वीचे व व्यक्तिगत जीवन – Early Life of Vijender Singh

विजेंदर सिंह यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९८५ रोजी हरियाणा राज्यातील भिवणी जिल्हयातील कलुवास या गावी झाला. त्यांचे वडील महिपाल सिंह बेनीवाल हे रोडवे डिपार्टमेंट मध्ये ड्रायव्हर आहेत तर आई एक गुहिणी आहे.

वेलुवास येथुन त्यांची प्राथमिक व माध्यमिक शिक्षा संपन्न झाली आहे. भिवणी येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले, मनोज बेनिवाल या थोरल्या भावाकडुन त्यांना बॉक्सिंग ची प्रेरणा मिळाली.

मनोजला बॉक्सिंग चे राज्यस्तरीय पदकामुळेच आर्मीत नौकरी मिळाली त्यामुळेच विजेंदर ने बॉक्सिंग मध्येच आपले करियर करायचे ठरविले होते.

भिवनीत बॉक्सिंग क्लब मध्ये बॉक्सिंग चा अभ्यास करतांना जगदीश सिंह यांनी त्यांची प्रतिभा ओळखुन त्यांना प्रोत्साहन दिले व त्यांना कडक शिस्तीचे प्रशिक्षण दिले. २००० मध्ये ते राष्ट्रीय स्तराचे बॉक्सर बनले होते.

२००३ मध्ये ऑल इंडिया युथ बॉक्सिंग चॅंपीयन बनले. त्यांचे आक्रमण, प्रतिहल्ले व सुरक्षित रक्षातंत्र यामूळेच त्यांना हरविणे कठीण व्हायचे.

विजेंदर सिंगचे आवडते सिनेकलाकार हॉलीवुड एक्शन हिरो सिल्वस्टर स्ट्रॉलोन व बॉक्सर म्हणुन मुहम्मद अली आणि माईक टायसन कडून त्यांना बरीच प्रेरणा मिळाली आहे.

२०१४ मध्ये आपली जवळची मैत्रीण अर्चना सिंह हिच्याशी विवाह केला. त्यांचा मुलगा अर्बिर सिंह याचा जन्म २०१६ मध्ये झाला.

विजेंदर सिंह यांचे अमली पदार्थावरून वाद – Vijender Singh Controversy

६ मार्च २०१२ मध्ये चंदीगढ मध्ये पोलीसांच्या धाडीत २६ किलो हेरोईन व इतर अमली द्रव्ये जप्त करण्यात आले त्या ठिकाणी विजेंदर यांची गाडी आढळली त्यानंतर प्रसार माध्यमांनी या प्रकरणात फारच रस घेवून विजेंदर सिंह यांची कोंडी केली.

पंजाब पोलीसांनी विजेंदर सिंग यांना ताब्यात घेतले त्यांच्या रक्ताचे व केसांचे नमूने घेण्यात आले परंतू तपासण्यांमध्ये ते निर्दोष मुक्त झाले, गाडी त्यांच्या जवळच्या रामधारी सिंह यांनी नेली होती जे अमली द्रव्य सेवन करण्याचे आदी होते.

विजेंदर यांचे बॉलिवूड मध्ये १३ जून २०१४ रोजी त्यांची फुगली ही फिल्म रिलीज झाली होती. त्यात त्यांनी चांगला अभिनय केला होता. याशिवाय अनेक रियालीटी शो मध्ये पाहुणे म्हणुनही ते जात असतात.

विजेंदर सिंह यांचे प्रोफेशनल करियर – Vijender Singh Career

१०५ स्पोर्ट अॅण्ड इंटरटेनमेंट नुसार त्यांनी फ्रॅंक वारेन क्वीनवेरी प्रमोशन सोबत महत्वाचा करार करून आपले बॉक्सिंगचे प्रोफेशनल करियर सुरू केले.

१० ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांनी आपला पहिला प्रोफेशनल सामना खेळला. आजवर त्यांनी ८ सामने खेळुन एकही हार पत्करली नाही. जगातील नामवंत बॉक्सरांना त्यांनी धुळ चारली आहे.

विजेंदर सिंह एक यशस्वी बॉक्सर आहेत ज्यांनी एका साधारण माणसापासुन आज जगात प्रसिध्दी मिळवणाऱ्या सेलीब्रिटीची प्रसिध्दी मिळवली आहे.

विजेंदर आपल्या खेळाप्रती पूर्णपणे समर्पक आहेत ते यासाठी ६ ते ८ तास सराव करतात. अनेक युवा त्यांच्या कडून आज प्रेरणा घेत आहेत.

विजेंदरमूळे आज हजारो नवयुवक बॉक्सिंग ला आपले करीयर बनवत आहेत. विजेंदर सारख्या दिपकाने आज हजारो दिपक प्रज्वलीत केले आहेत.

तर आज आपण पाहिली विजेंदर सिंह यांच्या जीवनातील काही महत्वाची माहिती, आशा करतो आपल्याला हि माहिती आवडली असेल आवडल्यास या माहितीला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
January 26, 2024
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved