• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, May 17, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Biography

राजीव गांधी यांच्या बद्दल माहिती

Rajiv Gandhi Mahiti

राजीव गांधींच्या विषयावरील हा लेख आपण कुठेही, केव्हाही आणि सहजरीत्या वाचू शकतो. जगात कुठेही संपर्क साधू शकतो इतकेच काय व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून एकमेकांना पाहूही शकतो. पण काही वर्षांआधी तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत इतका समृद्ध नव्हता.

भारतात आधुनिक तंत्रज्ञान आणण्यामागे आणि या तंत्रज्ञानाच्या धोरणात ज्यांची फार मोठी भूमिका आहे ते व्यक्ती होते भारतरत्न राजीव गांधी.

राजीव गांधी यांच्या बद्दल माहिती – Rajiv Gandhi Information in Marathi

राजीव गांधी यांची बायोग्राफी – Rajiv Gandhi Biography in Marathi

नाव (Name) राजीव गांधी (Rajiv Gandhi)
जन्म (Birth) 20 ऑगस्ट 1944
जन्मस्थान (Birth Place) मुंबई
वडील (Father Name)फिरोज गांधी
आई (Mother Name)इंदिरा गांधी
पत्नी (Wife Name)सोनिया गांधी (Sonia Gandhi)
मुले (Children Name) राहुल गांधी आणि प्रियंका गांधी (Rahul Gandhi and Priyanka Gandhi)
पेशा (Profession) राजकारणी (Politician)
राजकीय पक्ष (Political Party) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (Indian National Congress)
मृत्यू (Death)21 मे 1991

राजीव गांधी – जन्म, शिक्षण, विवाह – Rajiv Gandhi Family & History

राजीव गांधी यांचा जन्म मुंबई मध्ये 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला. वडील फिरोज गांधी आणि आई इंदिरा गांधी यांचा ते मोठा मुलगा. सुरवातीचे शिक्षण देहरादून येथील प्रसिद्ध ‘दून’ शाळेत झाले. उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनच्या कैम्ब्रिज यूनिवर्सिटी च्या इम्पीरियल कॉलेजमध्ये गेले. १९६५ साली तेथून त्यांनी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले.

लंडन मध्ये शिक्षण घेत असतांना त्यांची ओळख सोनियांसोबत झाली. 1968 मध्ये त्या दोघांनीही पारंपारिक पद्धतीने विवाह केला. त्याच वर्षीपासून पायलटची नौकरी करू लागले.

राजकारणातील त्यांचा प्रवेश आणि प्रवास – Rajiv Gandhi Career in Indian Politics

पुढे 23 जून 1980 रोजी जेव्हा लहान भाऊ संजय गांधी यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला त्यावेळी आई इंदिरा गांधी यांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून राजकारणात पाउल ठेवले आजोबा पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पासूनच राजकारणाचा वारसा मिळाला असल्यामुळे त्यांना राजकारण अवघड गेले नाही. 1981 साली अमेठी मतदार संघातून निवडून आले आणि संसदेचे दार त्यांच्यासाठी उघडले.

31 ऑक्टोबर1984 ला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या होत्या.. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजीव गांधी यांनी त्याच दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ते भारताचे नववे आणि भारताच्या ईतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान बनले.

राजीव गांधींच्या नेतृत्वात कॉंगेस पक्षाची  1984 ची  सार्वजनिक निवडणुक – About Rajiv Gandhi

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतली पण इंदिराजींच्या हत्येनंतर लगेच दोन महिन्यांनी सार्वजनिक निवडणुका झाल्या.

या निवडणुकांचे नेतृत्व राजीव गांधीकडे होते. 1984 च्या डिसेंबर मध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला अभूतपूर्व असे यश मिळाले. कॉंग्रेसने 508 जागांपैकी ४११ अशा विक्रमी जागा मिळविल्या आणि कॉंगेस पक्ष पुन्हा सत्तेत विराजमान झाला. या निवडणुकीत कॉंग्रेसला इंदिरा गांधीच्या मृत्युच्या सहानुभूतीचीही किनारहि होतीच. त्यानंतर ते 1985 मध्ये कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षही झाले.

दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानावर भर –

सत्तेत आल्यानंतर राजीव गांधीनी विज्ञान-तंत्रज्ञान याबाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.
ज्यावेळी दूरसंचार तंत्रज्ञानावर त्यांनी चांगला भर दिला.

राजीव गांधींनी घेतलेले महत्वाचे निर्णय भविष्यात भारताला आधुनिकतेकडे नेणारे होते.

राजीव गांधी स्वत: पायलट असल्यामुळे ते टेक्नोसॅव्ही होते. जवाहरलाल नेहरूंनी आयआयटी ची स्थापना केली होती. इंदिरा गांधी याचं सरकार असतांना त्यांच्याच प्रयत्नातून 1983 साली आयटी कंपन्यांच्या अनेक कठोर नियमात शिथिलता आणली. (उदा. मदर बोर्डच्या आयात शुल्कात सूट ईत्यादि ) याचा बराच फायदा आयटी कंपन्यांना झाला. पुढे त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर त्याबाबतीत अनेक महत्वाचे निर्णय घेतलेच.

भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर ‘परम’ च्या निर्मितीत त्यांची भूमिका –

अनेकदा अमेरिकेकडे महासंगणकाची मागणी केली पण अमेरिकेने तंत्रज्ञान सुरक्षेचे कारण देऊन त्यांना नेहमी नकारच दिला. पण हा नकार त्यांच्या जिव्हारी लागला.

महासंगणक निर्मितीच्या उद्देशाने 1988 साली सी-डॅक या संस्थेची स्थापना पुण्यात करण्यात आली आणि त्याचे नेतृत्व डॉ. विजय भटकर यांच्याकडे देण्यात आले. आणि अथक परिश्रमातून तयार झाला तयार झाला भारताचा पहिला सुपर कॉम्पुटर त्याचे नाव ‘परम’ ठेवण्यात आले या भविष्यात या क्षेत्रांतील अनेक दारे उघडल्या गेली. राजीव गांधी यांनी ईतरही क्षेत्रात चांगले निर्णय घेतले.

दूरसंचार माहिती तंत्रज्ञान धोरणात त्यांनी अमुलाग्र बदल घडवून आणले. त्यावेळी त्यांनी सॅम पित्रोदा, पी.ए.देवधर, एन.शेषाद्री आणि टी.एच.चौधरी यांच्यासह अनेकांना सोबत घेतले.

पुढे त्यांच्यावरील लागलेल्या बोफोर्स घोटाळ्याच्या आरोपांमुळे 1990 मध्ये ते सत्तेत राहण्यास अपयशी ठरले.

राजीव गांधी याचं निधन – Rajiv Gandhi Death

21 मे 1991 ते तमिळनाडूतील पेरुम्बूदूरमध्ये एका सभेसाठी गेले असता तेथे एलटीटीइ (लिट्टे) या संघटनेने मानवी बॉम्बचा स्फोट घडवून आणला त्यात राजीव गांधींसह १५ लोकांना प्राण गमवावे लागले.

आधुनिक भारतामध्ये त्यांचे योगदान आपण कधीच विसरू शकणार नाही. त्यांना 1991 साली मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच पुरस्कार देण्यात आला. राजीव गांधी यांच्या मृत्युनंतर  त्यांच्या पत्नी सोनिया गांधी ह्या  त्यांची दोन मुले राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह राजकारणात सक्रीय झाल्या.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जुळून रहा माझी मराठी सोबत.

राजीव गांधी यांच्या बद्दल काही महत्वाचे प्रश्न : Question on Rajiv Gandhi

प्र. 1. राजीव गांधीचा जन्म केव्हा आणि कुठे झाला?

उ. 20 ऑगस्ट 1944 ला मुंबई येथे.

प्र. 2. राजीव गांधींच्या आईचे नाव काय होते?

उ. इंदिरा गांधी

प्र. 3. राजीव गांधी कुठल्या पक्षाचे नेतृत्व करीत होते?

उ. कॉंग्रेस पक्ष.

प्र. 4. राजीव गांधी केव्हा पंतप्रधान झाले?

उ. 1984 साली.

प्र. 5. राजीव गांधी यांना कोणत्या वर्षी मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला?

उ. 1991 साली.

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

बहिणाबाई चौधरी माहिती

Bahinabai Chaudhari Biography in Marathi अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,आधी हाताले चटके तवा मियते भाकर. बहिणाबाई चौधरी यांच्या या...

by Editorial team
May 16, 2022
पी.टी.उषा माहिती
Marathi Biography

पी.टी.उषा माहिती

PT Usha Mahiti तिच्या धावण्याच्या वेगाने अनेकांना आश्चर्यचकित केले. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदके, पुरस्कार तिने प्राप्त केले. अनेक विक्रम केले,...

by Editorial team
May 16, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved