सोनिया गांधी यांच्या बद्दल माहिती

Sonia Gandhi Information in Marathi

भारतीय राजकारणात गांधी घराण्याचा फार पूर्वी पासून दबदबा आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, संजीव गांधी, राजीव गांधी अशी अनेक मुत्सद्दी राजकारणी या घराण्यातून जगासमोर आले आहेत. याच यादी मध्ये समाविष्ट होणारे आणखी एक नाव म्हणजे सोनिया गांधी.

सोनिया गांधी यांच्या बद्दल माहिती – Sonia Gandhi Information in Marathi

Sonia Gandhi Information in Marathi
Sonia Gandhi Information in Marathi

सोनिया गांधी यांची बायोग्राफी – Sonia Gandhi Biography in Marathi

नाव (Name) सोनिया गांधी (Sonia Gandhi)
जन्म (Birth) ९ डिसेंबर १९४६ (9th December 1946)
जन्मस्थान (Birth Place) लुसिआना, इटली (Lusiana, Italy)
वडील (Father Name) स्तेफानो माईनो (Stefano Maino)
आई (Mother Name) पाओला माईनो (Paola Maino)
पति (Husband Name) राजीव गांधी (Rajiv Gandhi)
मुले (Children Name) राहुल गांधी आणि प्रियंका गांधी (Rahul Gandhi and Priyanka Gandhi)
पेशा (Profession) राजकारणी (Politician)
राजकीय पक्ष (Political Party) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (Indian National Congress)

सोनिया गांधी यांच कुटुंब आणि जीवनाबद्दल – Sonia Gandhi Family & History

सोनिया गांधींचे मूळ नाव सोनिया माईनो असे असून त्या मुळच्या इटली येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म ९ डिसेंबर १९४६ रोजी लुसिआना, इटली येथे झाला. त्यांच्या आईचे नाव पावोला तर वडिलांचे नाव स्तेफानो माईनो आहे. कॅम्ब्रिज विश्व विद्यालयात शिकत असतांना त्यांची ओळख राजीव गांधी यांच्या सोबत झाली. दोघे १९६८ मध्ये विवाहबद्ध झाले. त्यांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अशी दोन मुले आहेत.

सोनिया गांधी यांचा राजकारणातील प्रवेश आणि कारकीर्द – Sonia Gandhi Career in Indian Politics

राजकारणात तसा फारसा रस नसल्यामुळे त्या पासून सोनिया खूप दूर होत्या. परंतु १९९१ साली भारताचे माजी  पंतप्रधान आणि सोनिया यांचे पती राजीव गांधी यांची हत्त्या करण्यात आली. तेव्हापासून सोनिया राजकारणात सक्रीय झाल्या. १९९८ साली त्यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा म्हणून नेमण्यात आले. यासाठी त्या तयार नव्हत्या परंतु, पक्ष आणि विशेष लोक आग्रहास्तव त्या राजकारणात उतरल्या. १९९९ साली पहिल्यांदा अमेठी लोकसभा क्षेत्रातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या.

२००४ साली लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्षाने जिंकली. परंतु काही कारणास्तव त्यांना पंतप्रधान पदापासून वंचित राहावे लागले. त्यांच्या जागी काँग्रेस पक्षाचे सदस्य आणि अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान पदासाठी निवडण्यात आले.

२०१७ साली त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा म्हणून राजीनामा दिला. सोनियाजी नंतर त्यांचे पुत्र राहुल गांधी हे कॉंग्रेसची धुरा कुशलतेने सांभाळत आहेत. राहुल गांधी हे सुद्धा एक उत्तम राजकारणी आहेत.

सोनिया गांधी यांच्या बद्दल थोडक्यात : About Sonia Gandhi

  • सोनिया गांधी यांचे मूळ नाव (Sonia Gandhi Real Name) : सोनिया माईनो
  • सोनिया गांधी यांचे वय (Sonia Gandhi Age) : ७४ वर्षे (२०२१ साली)
  • सोनिया गांधी यांची एकूण संपत्ती (Sonia Gandhi Net Worth) : ११.८१ करोड रू.
  • सोनिया गांधी यांची मुले (Sonia Gandhi Children) : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी

सोनिया गांधी यांच्या बद्दल काही महत्वाचे प्रश्न : Question on Sonia Gandhi

१. सोनिया गांधी यांचे मूळ नाव काय आहे? (Sonia Gandhi Real Name)

उत्तर: सोनिया माईनो.

२. सोनिया गांधी यांचे वय काय आहे?

उत्तर: ७४ वर्षे (२०२१ साली)

३. सोनिया गांची यांची एकूण संपत्ती किती आहे?

उत्तर: ११.८१ करोड (अंदाजे) (इंटरनेट वरील उपलब्ध माहिती नुसार)

४. सोनिया गांधी यांच्या मुलांची नावे काय?

उत्तर: राहुल गांधी आणि प्रियंका गांधी.

५. सोनिया गांधी यांना भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या अध्यक्ष पदी पहिल्यांदा कधी निवड झाली?

उत्तर: १९९८ साली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here