भारताच्या पंतप्रधानांची यादी

Bhartache Pantpradhan List

आपल्या भारत देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर पहिल्यांदाच देशात पंतप्रधान पदाकरिता निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्या निवडणुकीमध्ये महात्मा गांधींच्या म्हणण्यानुसार ‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस’ चे नेता, पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताचे पहिले पंतप्रधान बनविण्यात आलं होतं.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपला देश गुलामीच्या बेड्यांमध्ये अडकलेला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात वेगवेगळे राजे होऊन गेले.

ते राजे आपल्या नियमांनुसार कायदे बनवत असतं आणि त्या नियमांचे पालन प्रांतातील प्रजेला करावं लागत असे.

राजेशाही परंपरेनुसार प्रजेला आपल्या इच्छेनुसार राजा सुद्धा निवडता येत नव्हतां. त्याकाळी राजा हा वारसाहक्कानुसार निवडला जात होता.

उदारणार्थ एखाद्या राजकुमाराचे वडिल शासन करत असतील तर त्यांच्या मृत्यू नंतर वारसाहक्काने प्रांताच्या उत्तराधिकारी पदी स्वत: च्या मुलाला बहाल करत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, वेगवेगळया भागामध्ये विभागल्या गेलेल्या भारत देशाला एकत्रित करून, देशात एकच सत्ता असावी याकरता पंतप्रधान पदाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारताच्या संविधानात पंतप्रधानांना देशातील तसचं, देशाच्या सरकारमधील सर्वात महत्वाचे व्यक्ती म्हणून दर्शविले आहे.

पंतप्रधान हे राष्ट्रपतींचे मुख्य सल्लागार, लोकसभेत बहुमताने निवडून आलेल्या पार्टीचे नेता, आणि मंत्रिपरिषदेचे प्रमुख असतात.

देशाची कार्यप्रणाली सुरळीतपणे चालविण्याकरता ते जबाबदार व्यक्ती असतात. या बरोबरच पंतप्रधान भारत सरकारच्या कार्यकारणीचे नेतुत्व देखील करतात.

याचाच अर्थ असा होतो की, देशाच्या संविधानात लिहिल्याप्रमाणे पंतप्रधानांकडे सर्वच प्रकारचे वास्तविक अधिकार असतात.

पंतप्रधान हे संसदेच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख असुन, ते आपल्या मतानुसार त्यांच्या मंत्रिमंडळाच्या समितीत कोणत्याही प्रकारचा बद्दल आणायचा असल्यास त्यांना पूर्ण अधिकार असतो..

पंतप्रधान आपल्या मतानुसार त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्याला मंत्री पद बहाल करू शकतात, त्याचं प्रमाणे सदस्याला त्याच्या मंत्री पदावरून निलंबित करण्याचा सुद्धा त्यांना पूर्ण अधिकार असतो.

राष्ट्रपती हे केंद्र सरकारमधील एक नामधारी शासक असतात.

पंतप्रधान हे देशाच्या सरकारचे प्रमुख सदस्य तर, राष्ट्रपती हे राष्ट्राच्या प्रमुख पदी असतात. पंतप्रधानांना त्यांच्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ ही, देशाच्या राष्ट्रपती कडून देण्यात येते.

आपला भारत देश जगातील सर्वात मोठा लोकशाहीयुक्त प्रजासत्ताक राज्य आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून १९४७ ते २०१९ पर्यंत भारतात १५ असे प्रधानमंत्री होऊन गेले आहेत ज्यांनी आपला पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण वेळ सांभाळला आहे.

आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जवळपास ‘सहा हजार एकशे तीस’ दिवसांपर्यंत आपल्या पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळली होती.

यानंतर, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून “इंदिरा गांधी” यांनी जवळ जवळ ‘पाच हजार आठ्शे एकोणतीस’ दिवस सत्तेवर राहिल्या.

तर, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुद्धा जवळ जवळ ‘दहा’ वर्षांपर्यंत म्हणजेच ‘तीन हजार सहाशे छपन्न’ दिवस आपला कार्यभार सांभाळला आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ संपल्यानंतर २०१४ सालापासून या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी “बीजेपी पक्षाचे सदस्य नरेंद्र मोदी” सांभाळत आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत सर्व पंतप्रधानांची नावे, तसचं त्यांचा कार्यकाल आणि त्याचं संक्षिप्त वर्णन आम्ही आपल्याला खाली देणार आहोत, त्या पूर्वी आपण या यादीकडे एकवेळ लक्ष द्यावे-

भारताच्या पंतप्रधानांची यादी – Prime Minister of India List

Prime Minister of India List

भारतातील सर्व पंतप्रधानांची नावे आणि त्यांच्या कार्यकाळाची यादी- Indian Prime Ministers List in Marathi

क्रमांकनावकार्यकाळराजनीतिक पक्ष

पंडित जवाहरलाल नेहरू

१५ ऑगस्ट १९४७ – २७ मे १९६४कॉंग्रेस
श्री. गुलजारीलाल चंद७ मे १९६४ – ९ जून १९६४कॉंग्रेस
श्री. लालबहादुर शास्त्री ९ जून १९६४ – 11 जानेवारी १९६६कॉंग्रेस
श्री. गुलजारी लाल नंदा11 जानेवारी १९६६ – २४ जानेवारी १९६६कॉंग्रेस
श्रीमती इंदिरा गांधी२४ जानेवारी १९६६ – २४ मार्च १९७७कॉंग्रेस
श्री चरण सिंग२८ जुलै १९७९ – १४ जानेवारी १९८०जनता पार्टी
श्रीमती इंदिरा गांधी१४ जानेवारी १९८० – ३१ ऑक्टोबर १९८४कॉंग्रेस
श्री राजीव गांधी३१ ऑक्टोबर १९८४ – २ डिसेंबर १९८९जनता दल
श्री विपी सिंग

 

२ डिसेंबर १९८९ – १० डिसेंबर १९९०जनता दल
१०

श्री चंद्र शेखर

१० डिसेंबर १९९० – २१ जून १९९१सपा
११

श्री पी.वी. नरसिम्हा राव

२१ जून १९९१ – १६ मे १९९६कॉंग्रेस
१२

श्री अटल बिहारी वाजपेयी

१६ मे १९९६ – १ जून १९९६बीजेपी
१३

श्री एच डी देवगौडा

१ जून १९९६ – २१ एप्रिल १९९७जनता दल
१४

श्री इंद्र कुमार गुजराल

२१ एप्रिल १९९७ – १९ मार्च १९९८जनता दल
१५श्री अटल बिहारी वाजपेयी१९ मार्च १९९८ – १३ ऑक्टोबर १९९९बीजेपी
१६

श्री अटल बिहारी वाजपेयी

१३ ऑक्टोबर १९९९ – २२ मे २००४बीजेपी
१७

मनमोहन सिंग

२२ मे २००४ – २६ मे २०१४कॉंग्रेस
१८श्री नरेंद्र मोदी२६ मे २०१४ पासून आज पर्यंतबीजेपी

Prime Ministers Of India List

1. पंडित जवाहरलाल नेहरू- देशाचे पहिले पंतप्रधान

राजनीतिक पक्षकॉंग्रेस
कार्यकाल१५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ पर्यंत(१६ वर्ष २८६ दिवस)
जन्म१४ नोव्हेंबर १८८९ इलाहाबाद उत्तरप्रदेश
मृत्यू२७ मे १९६४ नवी दिल्ली
आई-वडिलस्वरुपराणी नेहरू, मोतीलाल नेहरू
पत्नीकमला नेहरू
मुलगीइंदिरा गांधी

भारताचे पहिले पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरू’ यांना आधुनिक भारताचे शिल्पकार माणले जाते. त्यांची प्रतिमा आदर्शवादी आणि सिद्धांतवादी महानायका प्रमाणे होती.

त्यांनी आपल्या प्रभावशाली व्याक्तीमत्वातून सर्वच जनतेला प्रभावित केलं होतं.

गुलामीच्या बेड्यांन मध्ये अडकलेल्या भारत देशाला स्वातंत्र्य मुक्त करण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. तसचं, भारत देशाचा पाया मजबूत करण्याकरता आपले महत्वपूर्ण योगदान दिलं.

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले खूप आवडत असतं, त्यामुळेच “१४ नोव्हेंबर” हा त्यांचा जन्म दिवस “बालदिवस” म्हणून साजरा केला जातो.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात पंतप्रधान पदाकरिता निवडणुकी झाल्या होत्या. त्या निवडणुकी मध्ये सरदार ‘वल्लभभाई पटेल’ आणि ‘आचार्य कृपलानी’ यांना जास्त मते मिळाली होती.

परंतु, ‘महात्मा गांधी’ यांच्या म्हण्यानुसार ‘पंडित जवाहरलाल नेहरू’ यांना पंतप्रधान बनविण्यात आलं होतं. त्यानंतर नेहरू सलग तीन वेळा पंतप्रधान पदावर निवडून आले होते.

पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू-

भारताला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

भारतात विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला जास्त महत्व दिलं.

शांतता आणि संघटन करण्यासाठी निरपेक्ष आंदोलनाची निर्मिती केली.

कोरियन युद्ध, सुएझ कालवा वाद आणि काँगो करारा मध्ये त्यांनी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली.

२. श्री गुलजारीलाल नंद – भरताचे पहिले “अंतरिम पंतप्रधान” तसचं दुसरे आणि चौथे काळजीवाहू पंतप्रधान

राजनीतिक पक्षभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
पंतप्रधान पदाचा पहिला कार्यकाळ२७ मे १९६४ – ९ जून १९६४ (तेरा दिवस)
जन्म४ जुलै १८९८, सियालकोट, पंजाब, पाकिस्तान
आईईश्वर देवी नंदा
वडिलबुलाकु राम नंदा
पत्नीलक्ष्मी देवी
निधन१५ जानेवारी १९९८

गुलजारीलाल नंदा हे भारताचे एक महान राजकीय नेता तसेचं, एक चांगले शिक्षणतज्ञ आणि उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ देखील होते.

कॉंग्रेस पक्षाकडून दोनवेळेस काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाची सेवा केली. “काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ हा १३-१३ दिवसांचा होता.”

‘सन १९६४’ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर “गुलजारीलाल नंदा यांनी पहिल्यांदा काळजीवाहू पंतप्रधान पादचा कार्यभार सांभाळला होता”, त्यावेळेलासन १९६२ साली चीन सोबत सुरु असलेलं आपलं युद्ध संपल होतं.

सन १९६६ साली लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर गुलजारीलाल नंदा दुसऱ्यांदा काळजीवाहू पंतप्रधान बनले. त्यादरम्यान, आपल्या देशाचे पकिस्तान सोबत सुरु असलेले युद्ध संपले होते.

अश्या प्रकारे दोन्ही वेळेस जेव्हा देश कठीण परिस्थितीतून जात होता, त्यावेळेस गुलजारीलाल नंदा यांनी भारत देशाची कमान सांभाळली होती. अश्या

वेळी त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे आणि शांततापूर्वक काम केले.

भारत देश गुलामीत असतांना सुद्धा त्यांनी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. सन १९२१ साली झालेल्या “असहयोग” आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला होता.

तसेच ते महात्मा गांधी यांच्या “सत्याग्रह आंदोलना” च्या वेळेस त्यांना जेल सुद्धा भोगावं लागलं होतं. याशिवाय त्यांनी “कामगार वर्गा” ला त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले.

३. श्री लालबहादुर शास्त्री

राजनीतिक पक्षभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
कार्यकाल९ जून १९६४ – 11 जानेवारी १९६६ (१ वर्ष २१६ दिवस)
जन्म२ अक्टोबर १९०४, मुगलसराय वाराणसी, उत्तरप्रदेश
आईराम दुलारी
वडिलमुन्शी शारदा प्रसाद श्रीवास्तव
पत्नीललिता देवी
निधन11 जानेवारी १९६६

लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. त्यांची प्रतिमा एक विश्वासू, प्रामाणिक आणि निष्ठावंत नेत्यांच्या रुपाने प्रसिद्ध झाली होती.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यू नंतर, “९ जून १९६४ साली लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या महान व्यक्तिमत्व आणि भक्कम स्वरूपाच्या प्रतिभावंत प्रतीमे करता त्यांना पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्यात आली.”

स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मुक्त करण्याकरता गुलजारीलाल नंदा यांनी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली.

तसचं, महात्मा गांधी यांच्या “असहयोग आंदोलन”, “भारत छोडो आंदोलन” आणि “दांडी यात्रेत” ते सहभागी झाले होते. त्यादरम्यान त्यांना अनेक वेळा जेलमध्ये पण जावं लागलं होतं.

याच बरोबर त्यांनी भारतात दुग्ध उत्पादनामध्ये वाढ करण्याकरिता “श्वेत क्रांती” योजनेला प्रोत्साहन दिलं. पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी देशातील जनतेला दिलेला “जय जवान जय किसान” नावाचा नारा खूप प्रसिद्ध झाला होता.

“लाल बहादूर शास्त्री महात्मा गांधीजींचे शिष्य होते”. त्याचप्रमाणे ते पंडित नेहरू यांना आपले आदर्श मानत असतं.

” सन १९६५ सालच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाच्या वेळेस भारत देशाला त्यांनी अतिशय कुशलतेने हाताळलं.” त्याचं प्रमाणे आपल्या देशाच्या सैन्यांला योग्यरीत्या मार्गदर्शन करून देशाचे नेतृत्व केलं होतं.

४. श्रीमती इंदिरा गांधी (भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान)

राजनीतिक पक्षकॉंग्रेस
कार्यकाल
 • २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ (11 वर्ष ५९ दिवस)
 • १४ जानेवारी १९८० ते ३१ ऑक्टोबर १९८४ (४ वर्ष २९१ दिवस)
जन्म१९ नोव्हेंबर, १९१७, इलाहाबाद, उत्तरप्रदेश
मृत्यू३१ ऑक्टोबर १९८४, नवी दिल्ली
आई-वडिलकमला नेहरू, जवाहरलाल नेहरू
पतीफिरोज गांधी
मुलेराजीव गांधी, संजय गांधी
नातवंडेराहुल गांधी, वरून गांधी, प्रियंका गांधी

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान “इंदिरा गांधी” यांना दिला जातो. त्यांनी भारताच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार बरेच वर्ष सांभाळला आहे.

इंदिरा गांधी यांनी वयाच्या १२ वर्षी काही मुलांना एकत्र घेऊन आपली वानर सेना तयार केली होती.

इंदिरा गांधी यांनी लहान मुलांना एकत्रित करून त्यांच्या सोबत भारताच्या स्वातंत्र्याकरता संघर्ष करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

याव्यतिरिक्त, “इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदावर असतांना सन १९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धांच्या वेळी भारताचे कौशल्यपूर्वक नेतृत्व करून भारताला विजय मिळवून दिला होता.”

शेजारील देशांसोबत असलेले आपल्या देशाचे संबंध चागल्या प्रकारे सुधारित करण्याकरता त्यांनी खूप महत्वाची पाऊले उचलली होती.

यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच उंचावली गेली. इंदिरा गांधी यांची प्रतिमा एका हुशार राजनीतिक नेत्याच्या रुपात बनली.

याशिवाय, इंदिरा गांधी यांनी देशातील कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता अनेक प्रकारच्या योजना सुरु केल्या.

देशातील बेरोजगारीची समस्या नष्ट करण्याकरता आणि देशाला अन्न धान्याच्या उत्पादना बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

५. श्री मोरारजी देसाई

राजनीतिक पक्षजनता दल
कार्यकाल२४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ (२ वर्ष १२६ दिवस)
जन्म२९ फेब्रुवारी १८९६ भदेली गाव, गुजरात
मृत्यू१० एप्रिल १९९५ (दिल्ली)
पत्नीगुजराबेन

मोरारजी देसाई, हे भारताचे एक महान स्वातंत्र्य सेनानी तसेच, स्वातंत्र्य भारताचे पहिले बिगर-कॉंग्रेस पंतप्रधान होते.

“इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदावर असतांना देशात आणीबाणी लागू केली होती.” त्या आणीबाणीला आळा घालण्याची महत्वपूर्ण भूमिका ‘मोरारजी देसाई’ यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या नेतृत्वाखाली राबविली.

आपत्कालीन काळात इंदिरा गांधी यांनी अनेक नविन कायदे लागू केले होते.

त्या लावलेल्या कायद्यात बद्दल घडवून आणण्याचे महत्वपूर्ण काम मोरारजी देसाई यांनी केलं.

मोरारजी देसाई यांनी बरेच नविन नियम बनविले जेणेकरून भविष्यात येणारे कोणतेही सरकार आपत्कालीन परस्थिती निर्माण करू शकणार नाही.

भारत-पाक यांच्यातील संबंधात सुधारणा करण्याकरता मोरारजी देसाई यांनी अनेक प्रयत्न केले होते. ते एक शांतीप्रिय व्यक्ती होते.

मोरारजी देसाई देशातील पहिले असे व्यक्ती होते की, ज्यांना भारताच्या सर्वोच्च सन्मान ‘भारत रत्न’ आणि पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान ‘निशान-ए-पाकिस्तान’ देऊन गौरविण्यात आलं होतं.

६. चौधरी चरण सिंग

राजनीतिक पक्षजनता पार्टी
कार्यकाल२८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० (१७०दिवस)
जन्म१८९६, मेरठ, उत्तरप्रदेश
मृत्यू२९ मे १९९५ दिल्ली
वडिलचौधरी मीर सिंग
पत्नीगायत्री देवी

“चौधरी चरण सिंग यांनी देशाचे पाचवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.” त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत केवळ ‘१७० दिवसच’ काम केलं आहे. इतक्या कमी वेळेत सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रकारची कौतुकास्पद काम केली आहेत.

चौधरी चरण सिंग यांनी जमीनदार प्रणालीला बाजूला सारून जमीन सुधार अधिनियम लागू केला होता.

याचबरोबर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी देखील आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली. चरण सिंग यांनी गांधीजींच्या “सविनय कायदेभंग चळवळ” आणि “दांडी यात्रेत” सुद्धा सहभाग घेतला होता.

७. श्री राजीव गांधी

राजनीतिक पक्षभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
कार्यकाल३१ ऑक्टोबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९
जन्म२० ऑगस्ट १९४४ मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू२१ मे १९९१
आई-वडिल
 • इंदिरा गांधी,
 • फिरोज गांधी
पत्नीसोनिया गांधी
मुलेप्रियंका गांधी, राहुल गांधी

पंतप्रधान पदावर सर्वात कमी वयात विराजमान होणारे “राजीव गांधी” हे सर्वात युवा नेता आहेत. ते ‘केवळ ४० वर्षाचे’ असतांना पंतप्रधान झाले होते.

राजीव गांधी हे भारतातील ‘नऊ नंबर’ चे पंतप्रधान होते. “त्यांनी आधुनिक आणि तंत्रज्ञान भारत निर्माण करण्यासाठी आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं होतं.”

राजीव गांधी यांनी ‘भारतात संगणक प्रणाली आणण्यासाठी खूपच सक्रियता दाखविली होती’, तसेच त्यांनी संचार क्रांतीला सुद्धा प्रोत्साहन दिल होतं.

याशिवाय त्यांनी भारतीय प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्याकरिता खूप प्रयत्न केले. अमेरिकेशी असलेल्या द्विपक्षीय संबंधात देखील त्यांनी बरीच सुधारणा केली होती.

राजीव गांधी यांनी देशात शिक्षणाचा मोठ्या जोमाने प्रचार आणि प्रसार केला होता. काश्मीर आणि पंजाब यांच्या अंतर्गत होत असलेला कलह नियंत्रित करण्यासाठी त्यांनी आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं.

त्याचबरोबर राजीव गांधी यांनी देशाच्या हिताकरता अनेक महत्वाची निर्णय घेतले होते. देशातील युवकांच्या विकासाकरता त्यांनी विशेष लक्ष दिलं होतं.

८. श्री वी.पी. सिंग (विश्वनाथ प्रताप सिंग)

राजनीतिक पक्षजनता दल
कार्यकाल2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990 (343 दिवस)
जन्म25 जून 1931, अलाहाबाद, उत्तर प्रदेश
मृत्यू२७ नोहेंबर २००८
वडिलराजा बहादुर राय गोपाल सिंग
पत्नीसीता कुमारी

वी.पी. सिंग हे भरताचे एक विश्वासू, निष्ठावंत, आणि मेहनती पंतप्रधान होते.

त्यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री म्हणून उत्तरप्रदेश राज्याचा कार्यभार सांभाळला होता.

देशातील गरिबांची अवस्था सुधारण्यासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण काम केली. दलित अल्पसंख्याक वर्गाच्या उन्नतीसाठी वी.पी. सिंग यांनी पुढाकार घेतला.

वी. पी. सिंग हे एक उत्कृष्ट प्रकारचे राजकारणी नेता होते. त्यांनी दलित आणि निम्न वर्गाच्या जातीतील लोकांना भारताच्या राजकारणात प्रवेश करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.

असे असले तरी, वी. पी. सिंग पंतप्रधान बनल्या नंतर त्यांची प्रतिमा इतकी विशेष राहली नाही. त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात देशात कश्मीरच्या मुद्द्यांना घेऊन असंतोष निर्माण झाला होता.

याच बरोबर त्यांनी घेतलेल्या काही चुकिंच्या निर्णयांमुळे संपूर्ण देशांत जातीवादाच्या समस्येने प्रचंड रूप धरण केले.

वी. पी. सिंग देशाचे पंतप्रधान म्हणून चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकले नाहीत.

९. श्री चंद्र शेखर

राजनीतिक पक्षसमाजवादी जनता पार्टी
कार्यकाल१० नोहेंबर १९९० ते २१ जून १९९१ (२२३ दिवस)
जन्म१ जुलै १९२७, इब्राहीमपट्टी, उत्तरप्रदेश
मृत्यू८ जुलै २००७, दिल्ली

श्री चंद्र शेखर यांनी स्वत: ची ओळख एक मजबूत पंतप्रधान रुपात बनवली आहे. भारत देश वाईट अवस्थेतून जात असतांना त्यांनी पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळली आणि योग्य प्रकारे निर्णय घेऊन देशाच्या कोलमडलेल्या विकासाल गती प्रदान करून दिली.

श्री चंद्र शेखर एक विश्वासू, कुशल, बुद्धिमान आणि दृढनिश्चयी राजकारणी होते. समाजवादी आंदोलना सोबत जुडल्यानंतर त्यांनी दलित आणि मागासवर्गीय जातींच्या लोकांकरता अनेक प्रकारची चांगली कामे केली.

त्याच बरोबर दलितांना त्यांचा अधिकार मिळून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.

पंतप्रधान श्री चंद्र शेखर हे एक स्पष्ट आणि प्रभावशाली वक्ता होते. त्यांनी आपल्या भाषणातून समाजात पसरलेल्या सामजिक असमानता, जातिवादी भेदभाव याच्या विरुद्ध आवाज उठवला.

त्याचप्रमाणे ग्रामीण क्षेत्राशी जोडल्यागेलेल्या समस्यांन बद्दल त्यांनी आपला आवाज उठवला होता.

१०. श्री पी.वी.नरसिम्हा राव – (पमुलापार्ती वेंकट नरसिम्हा राव)

राजनीतिक पक्षभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
कार्यकाल२१ जून १९९१ – १६ मे १९९६ (४ वर्ष ३३० दिवस)
जन्म२८ जून १९२१, करीम नगर गाव, हैदराबाद
मृत्यू२३ डिसेंबर २००४ दिल्ली
आई-वडिल
 • रुक्मणी अम्मा
 • पी रंगा राव
पत्नीसत्याम्मा राव

श्री पी. वी. नरसिम्हा राव हे भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी, प्रख्यात वकील आणि प्रसिद्ध राजकारणी होते. त्यांनी पंतप्रधान म्हणून देशात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले.

पी.वी. नरसिम्हा राव यांची प्रतिमा आदर्शवादी आणि धाडसी राजकारणी म्हणून प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अनेक प्रकारचे आर्थिक परिवर्तन केले, त्यामुळे त्यांना भारतातील आर्थिक सुधारणेचे जनक म्हणून देखील ओळखले जाते.

पी. वी. नरसिम्हा राव यांनी, बँकेत होत असलेले करोडो रुपयांचे घोटाळे कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी धोरण सुरु केले.

पी. वी. नरसिम्हा राव यांच्या द्वारा सुरु करण्यात आलेल्या अनेक आर्थिक योजनांना अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी सुद्धा लागू केल्या.

पी.वी. नरसिम्हा राव यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने देशाचे पूर्व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री बनवलं होतं.

याव्यतिरिक्त त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील सुरु असलेला लाइसेंस(परवाना) राज समाप्त करण्याबद्दल त्यांनी खूपच सक्रियता दाखवली.

पी.वी. नरसिम्हा राव हे हिंद भाषा बोलता न येणारे, दक्षिण क्षेत्रातील देशाचे पहिले पंतप्रधान होत. नरसिम्हा राव यांना संस्कृत भाषेचे चांगले ज्ञान होते.

याशिवाय त्यांना भारताची सभ्यता, संस्कृती, आध्यात्मिक आणि धार्मिक मुळांशी खूप प्रेम होतं.

११.अटल बिहारी वाजपेयी

राजनीतिक पक्षभारतीय जनता पार्टी (बीजेपी)
कार्यकाल
 • १६ मे १९९६ ते १ जून १९९६ (फक्त १६ दिवस)
 • दुसरा कार्यकाळ – १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ (६ वर्ष, ६४ दिवस)
जन्म२५ डिसेंबर १९२४, ग्वालियर, मध्यप्रदेश
मृत्यू१६ ऑगस्ट २०१८
आई-वडिल
 • कृष्ण देवी
 • कृष्ण बिहारी वाजपेयी
सन्मान२०१४ साली भारत रत्न, १९९२ साली पद्म भूषण

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे स्वातंत्र्य भारताच्या राजकारण क्षेत्रातील चमकणारे तारा होते. त्यांनी राजकारणाच्या प्रत्येक टप्यात उत्कृष्ट पणे काम केलं आहे.

अटल बिहारी वाजपेयी हे अष्टपैलूपणाचे एक आदर्शवादी राजकारणी होते. ते त्यांची प्रत्येक गोष्ट परखड पणे मांडत असतं. तसचं, त्यांची भाषणं खूपच प्रभावशाली होती.

एक वेळ अशी होती की, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी भाषण करत असतं, तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू मंत्रमुग्ध होऊन त्यांचे भाषण ऐकत असतं.

साधारणपणे राजकारणात स्थायिक होण्याकरता लोक आपल्या आयुष्यातील जितकी वर्षे प्रयत्न करण्यात गमवतात तितकी वर्ष अटल बिहारी वाजपेयी यांनी राजनीती केलेली आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या ५० वर्षाच्या संसदीय राजनीतिक कारकिर्दीत बीजेपी (भारतीय जनता पक्ष) ची स्थापना केली. या पक्षातील सदस्यांची संख्या त्यांनी २ वरून २०० पर्यंत नेली.

अटल बिहारी वाजपेयी हे एकमेव असे नेता होते की, जे चार वेगवेगळया राज्यातून खासदार म्हणून निवडून आले होते.

देशाला स्वातंत्र्य मिळण्या आधीपासूनच ते राजकारणात चांगल्या प्रकारे सक्रीय झाले होते. त्यांनी महात्मा गांधीजींच्या “भारत छोडो आंदोलनात” भाग घेतला होता. तसेच त्यांना बऱ्याच वेळा जेल मध्ये पण जावं लागलं.

अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कारकिर्दीत देशात राजस्थान मधील पोखरण येथे ५ भूमिगत अणु चाचण्या घेऊन देशाला अणु ऊर्जा संपन्न राष्ट्र बनविण्यात आपली महत्वपूर्ण योगदान दिलं.

याशिवाय, अटल बिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प अंतर्गत देशातील चार मुख्य शहर दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि मुंबई यांना एकत्रित जोडण्याचे महत्वपूर्ण काम केलं. तसेच देशातील रस्त्यांची सुधारणा केली होती.

देशाची आर्थिक सुधारणा करण्यासाठी आणि ग्रामीण भारताच्या विकासाकरता अटल बिहारी वाजपेयी यांनी आपले योगदान दिले.

तसेच, कारगिल युद्धाच्या वेळेस आणि आतंकवाद्यांनी केलेल्या हल्या दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कुशल योजनेनुसार देशाचे नेतृत्व केलं होतं.

१२. श्री एच. डी. देवगौडा (हरदनहल्ली दोद्देगोव्डा देवगौड़ा)

राजनीतिक पक्षजनता दल( सेक्युलर)
कार्यकाल१ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७ (३२४ दिवस)
जन्म१८ मे १९३३, हरदनहल्ली, कर्नाटक
आई-वडिल
 • देवंमा
 • दोद्देगोव्दा
पत्नीचेत्रम्मा देवगौडा

एच डी देवगौडा हे जनता पक्षाचे असे राजकारणी नेता होते, त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून देश कुशलतेने सांभाळला होता. त्याच बरोबर त्यांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री पदी आपली सेवा दिली आहे.

एच डी देवगौडा यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक लाभदायक योजना राबविल्या आहेत. त्याच बरोबर त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी भरपूर आंदोलन केली होती.

एच डी देवगौडा यांनी शहरी रोजगार, अन्न प्रक्रिया, गृह मंत्रालय,कार्मिक पेट्रोलियम आणि रसायने यासारख्या अनेक मंत्रालयांवर अतिरिक्त कर आकारला होता.

१३. श्री इंद्र कुमार गुजराल

राजनीतिक पक्षजनता दल
कार्यकाल२१ एप्रिल १९९७ ते १९ मार्च १९९८ (३३२ दिवस)
जन्म४ डिसेंबर १९१९, झेलम पंजाब (वर्तमान पाकिस्तान)
मृत्यू३० नोहेंबर २०१२, गुडगांव, हरियाणा
आई-वडिल
 • पुष्पा गुजराल
 • अवतार नारायण
पत्नीशीला गुजराल

इंद्र कुमार गुजराल भारतातील धाडसी राजकारणी नेता होते. त्यांनी आपल्या यशस्वी आणि कार्यक्षम रणनीतीच्या बळावर देशाचे पंतप्रधान पद सांभाळले आहे.

राज्यसभेच्या सदस्यांमधून पंतप्रधान पदावर निवड होणारे ते तिसरे व्यक्ती होते. इंद्र कुमार गुजराल यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या आंदोलनात आपलं योगदान दिल होतं.

सन १९४२ साली झालेल्या “भारत छोडो आंदोलनात” भाग घेतला होता. तसचं, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना बऱ्याच वेळी जेलात सुद्धा जावं लागलं होतं.

त्यांनी सीटीबीटी वर हस्ताक्षर करण्यास विरोध केला होता. त्याच बरोबर त्यांनी पाकिस्तान सोबत नाते घट्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

१४. डॉ. मनमोहन सिंग

राजनीतिक पक्षभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
कार्यकाल२२ मे २००४ ते १६ मे २०१४
जन्म२६ सप्टेंबर १९३२, गाह, पाकिस्तान
आई-वडिल
 • अमृत कौर
 • गुरुमुख सिंग
पत्नीगुरुशरण कौर

मनमोहन सिंग यांनी देशाचे पंतप्रधान पद १० वर्षांपर्यंत सांभाळले असून, ते भारताच्या पंतप्रधान पदावर विराजमान होणारे पहिले सरदार आहेत.

त्यांनी आपल्या कारकिर्दीत देशाची आर्थिक व्यवस्था बळकट केली होती.

तसचं, त्यांनी मूल्यवर्धित कर (व्हॅट) लागू करून, उद्योग धोरणांबद्दल जोरदार कार्य केले होते.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशातील बँकिंग आणि आर्थिक क्षेत्राचा चागल्या प्रकारे विकास केला होता. म्हणूनच त्यांना भारताचे आर्थिक आर्किटेक्ट( रचनाकार) मानले जाते.

मनमोहन सिंग यांनी देशात आतंकवाद्यांकरिता अनेक कठीण कायदे बनविले. तसेच शिक्षण क्षेत्रात देखील त्यांनी भरपूर विकास केला होता. त्यांनी आपल्या राज्यात अनेक शिक्षण संस्था उघडल्या. मनमोहन सिंग विशेष करून आर्थिक आणि वित्तीय प्रकरणासाठी जास्त प्रसिद्ध आहेत.

१५. श्री नरेंद्र मोदी ( नरेंद्र दामोदरदास मोदी)

राजनीतिक पक्षभारतीय जनता पार्टी
कार्यकाल१६ मे २०१४ ते आता पर्यंत
जन्म१७ सप्टेंबर १९५०
आई-वडिलहिराबेन मोदी – दामोदरदास मुलचंद मोदी

नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात शक्तिशाली आणि लोकप्रिय राजकीय नेता आहेत. त्यांनी २०१४ साली आणि २०१९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला.

श्रीनरेंद्र मोदी हे एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यांची विशेष शैली म्हणजे मोदीजी आपलं मत निर्भीडपणे मांडत असतात. आपल्या भाषणाच्या साह्याने ते कोणालाही प्रभावित करू शकतात.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या जीवनात खूप मोठा संघर्ष केला आहे.

श्री नरेंद्र मोदी यांनी आपला राजनीतिक प्रवासाला राष्ट्रीय स्वतंत्र सेवक संघ (आर एस एस) पासून सुरवात केली होती. त्यांनी अंगिकारलेल्या कठीण दृढसंकल्पांमुळे आजरोजी ते देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान आहेत.

नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून देशाकरता अनेक महत्वाची कामे केली आहेत. देशातील सर्व सामाजिक वर्गाच्या लोकांना लक्षात घेऊन त्यांनी अनेक योजना सुरु केल्या आहेत.

देशातील गरिबी आणि भष्ट्राचार नष्ट करण्यासाठी त्यांनी “नोटबंधी आणि जी एस टी लागू” करण्यासारखे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले.

त्यांनी आपली ओळख एक ग्लोबल लीडर च्या रुपात विकसित केली. स्वातंत्र्य भारतात जन्मणारे नरेंद्र मोदी देशातील पहिले असे पंतप्रधान आहेत की ज्यांनी आपल्या कारकिर्दीत सर्वात जास्त विदेश प्रवास करून,

आपल्या भारत देशाचे अन्य देशांसोबत असलेले संबंध घट्ट करण्यात त्यांनी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली. याच मोदींच्या मुत्सद्दीपणाविषयी आज सर्व जगाला खात्री आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top