“हे आहेत भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार”

List of Highest Civilian Award of India

भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. भारताची आंतरराष्ट्रीय ओळख म्हणजे विवेधतेतून एकता हि आहे. जिथे अनेक जाती-धर्माचे लोक सलोख्याने राहतात. भारत अशी एक भूमी आहे जिच्या कुशीत हजारो वीर जन्माला आले आहेत. आणि भारत मातेच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान सुद्धा दिले आहे.

जेव्हाही भारत मातेवर शत्रूने आक्रमण केले होते त्यावेळेस आपल्या मातृभूमी ला वाचविण्यासाठी येथील भूमिपुत्रांनी आपले प्राण देऊन आपल्या मातृभूमी चे रक्षण केले होते. आजही या मातृभूमी वर कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यास आपले सैनिक कधीही सज्ज आहेत.

भारत देशाने कधीही शांततेला अधिक महत्व दिले आहे. आपल्या देशाची परंपरा खूप महान आहे. प्रत्येकाला अभिमान वाटेल असा आपला भारत देश आहे.

म्हणूनच आठवले जेव्हा राकेश शर्मा अवकाशात गेले होते तेव्हा तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारले कि अवकाशातून आपला देश कसा दिसतो तर त्यांनी सांगितले होते, “सारे जहा से अच्छा हिन्दोस्तां हमारा”

तर आपण विचार करू शकतो आपला देश कश्या प्रकारे असेल. ह्याच देशात अनेक पुरस्कार दिल्या जातात.

जेव्हा एखादी व्यक्ती राष्ट्राच्या हितासाठी आपले मौल्यवान योगदान देते तेव्हा त्या व्यक्तीच्या कामगिरीबद्दल भारत सरकार त्या व्यक्तीला विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करते.

त्या विशेष पुरस्कारांमध्ये चार असे मोठे पुरस्कार समाविष्ट आहेत. जे व्यक्तीची कामगिरी पाहून त्यांच्या नुसार त्यांना दिले जातात. त्यामध्ये भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री इत्यादींचा समावेश आहे.

या पुरस्कारांची सुरुवात हि इ.स. १९५४ साली झाली होती. तसेच हे सर्व पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती द्वारे प्रदान केल्या जातात. आणि सर्व पुरस्कारांची घोषणा दरवर्षी २६ जानेवारी ला केल्या जाते.

तर आजच्या लेखात आपण त्या सर्व पुरस्कारांविषयी जाणून घेऊया. जे भारतातील प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्तुत्वाच्या बळावर आपल्या देशाचे नाव आंतराष्ट्रीय पातळीवर उंचावून तसेच एखाद्या क्षेत्रात असामान्य कमगिरी करून त्या पुरस्कारांना आपल्या नावावर करू शकतो.

“हे आहेत भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार” – List of Highest Civilian Award of India

List of Highest Civilian Award of India
List of Highest Civilian Award of India

१) भारतरत्न – Bharat Ratna

भारतरत्न हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ज्या व्यक्तींनी कला, विज्ञान, साहित्य, तसेच जनसेवा या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली असल्यास त्या व्यक्तींना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिल्या जातो. आणि २०१३ पासून या पुरस्कारासाठी आणखी एका क्षेत्राला यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ते म्हणजे क्रीडा क्षेत्र.

पुरस्काराचे स्वरूप :

या पुरस्काराचे स्वरूप एका पिंपळाच्या आकाराचे पदक असतं, ज्यावर एका बाजूला सूर्य बनलेला असतो, सोबतच खालच्या बाजूला चांदी मध्ये तसेच देवनागरी भाषेत “भारतरत्न” असे लिहिलेले असतं. तसेच त्याच्या दुसऱ्या बाजूला भारतीय मुद्रे सोबत आपल्या देशाचे ब्रीदवाक्य “सत्यमेव जयते.” लिहिलेले असतं. आणि या पदकाला पांढऱ्या लेस सोबत दिल्या जातं.

  • सर्वात प्रथम १९५४ मध्ये हा पुरस्कार चक्रवर्ती राजगोपालाचारी, सी. व्ही. रमण, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन. यांना देण्यात आला होता.
  • या पुरस्काराला माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना सुद्धा दिल्या गेला आहे, सांगायचे कारण हेच कि ते हा पुरस्कार मिळवणारे सर्वात पहिले प्रधानमंत्री होते.
  • २०१४ मध्ये सचिन तेंदुलकर यांना सुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ते हा पुरस्कार मिळवणारे भारतातील सर्वात युवा व्यक्ती आहेत.

२) पद्म विभूषण – Padma Vibhushan

पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जातो. हा पुरस्कार भारतरत्न नंतर दिल्या जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
हा पुरस्कार त्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतो ज्यांनी कला, विज्ञान, सामाजिक कार्य, तसेच यामध्ये सरकारी कर्मच्यार्यांच्या द्वारा देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम सेवाही समाविष्ट आहेत.
या पुरस्काराची सुरुवात सुद्धा २ जानेवारी १९५४ रोजी करण्यात आली होती.

पुरस्काराचे स्वरूप :

या पुरस्काराचे पदक हे गोलाकार आकाराचे असून त्याच्या एका बाजूला कमळाचे फुल असतं. त्या कमळाच्या फुलाच्या वरच्या बाजूला “पद्म” आणि खालच्या बाजूला “विभूषण” देवनागरी भाषेत लिहिलेले असतं. गोलाकार आकाराच्या या पदकाला काही रेखाचा घेर असतो. या पदकाला तांबे आणि कथिल या दोहांचे मिश्रण करून बनविलेले असतं.

  • सर्वात प्रथम १९५४ मध्ये हा पुरस्कार सत्येंद्र नाथ बोस, नंदालाल बोस, बाळासाहेब गंगाधर खेर,वि.के कृष्ण मेनन, झाकीर हुसेन यांना देण्यात आला होता.
  • २००८ मध्ये सचिन तेंदुलकर यांना सुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ते हा पुरस्कार मिळवणारे भारतातील सर्वात युवा व्यक्ती आहेत.

३) पद्म भूषण – Padma Bhushan

पद्म भूषण हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जातो.
पद्मविभूषण नंतर दिल्या जाणारा हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार त्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतो ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात विलक्षण कामगिरी केली आहे, यामध्ये सरकारी कर्मच्यार्यांच्या द्वारा देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम सेवाही समाविष्ट असतात.

पुरस्काराचे स्वरूप :

या पुरस्काराचे पदक हे गोलाकर आकाराचे असून, या पदकाचे स्वरूप जवळजवळ पद्मविभूषण च्या पदकासारखे असतं. फक्त या पदकामध्ये फुलाच्या वरच्या बाजूला “पद्म” आणि खालच्या बाजूला “भूषण” असे लिहिलेले असतं. सोबतच पदकाला बाजूने कडा सुद्धा असतात. त्या कडा कथिल आणि तांबे यांच्या मिळून बनलेल्या असतात. या पदकाच्या मध्यभागी दोन्ही कडून चांगल्या प्रतीचे सोने वापरले असतं, ज्यामध्ये मुद्रा आणि फुलाचा समावेश असतो.

  • सर्वात प्रथम १९५४ मध्ये हा पुरस्कार होमी भाभा, शांती स्वरूप भटनागर, एम. एस. सुब्बुलक्ष्मी, सुकुमार सेन, रमेश राय हांडा, राधाकृष्ण गुप्ता, आणि अमरनाथ झा, यांना देण्यात आला होता.

४)पद्म श्री – Padma Shri

पद्मश्री हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, या पुरस्काराला पद्मभूषण नंतर भारतामध्ये सर्वोच्च स्थान मिळाले आहे. हा पुरस्कार त्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतो ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, यामध्ये सरकारी कर्मचारी आणि त्यांनी दिल्या गेलेल्या सेवेचा सुद्धा सामावेश आहे. हा असा पुरस्कार आहे ज्या पुरस्काराला फक्त भारतीय नागरिकांना देण्यात येतो.

पुरस्काराचे स्वरूप :

पद्मश्री पुरस्काराचे पदक हे गोलाकार आकारचे असून त्या पदकामध्ये अग्रभागी “पद्म” तसेच खालच्या बाजूला “श्री” लिहिलेले असतं. सोबतच बाकी पदाकांप्रमाणे या पदकांमध्ये सुद्धा कडा असतातच. त्यासुद्धा तांबे आणि कथिल यांच्या मिश्रणातून बनलेल्या.या पुरस्काराची सुरुवात सुद्धा १९५४ मध्येच झालेली आहे.

  • सर्वप्रथम हा पुरस्कार डॉ.मथुरा दास, डॉ के. आर.चक्रवर्ती, आणि अखिल चंद्र मिश्रा यांना देण्यात आला होता.

तर आपण आजच्या लेखात पाहिले आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्यांचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. आशा करतो आपल्याला लिहिलेला आजचा लेख आवडला असेल, आपल्याला आजचा माहितीपर लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here