Friday, June 2, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

भारतीय संविधानाशी संबंधित महत्वपूर्ण माहिती

Bhartiya Samvidhan in Marathi

देशाचा कारभार कसा चालवावा? एक आदर्श शासन कसे असावे? देशातील नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये काय? प्रत्येक राष्ट्राची काही मार्गदर्शक तत्वे असतात. प्रत्येक देश चालविण्यासाठी काही नियम आणि कायद्यांची गरज भासत असते. या सर्व नियम आणि कायद्यांच्या पुस्तिकेला संविधान किंवा राज्यघटना असे म्हटल्या जाते. भारताने २६ नोव्हेंबर १९४९ साली भारतीय संविधान स्विकारले आणि २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आणले.

आपण एक भारतीय नागरिक असल्याने आपणास आपल्या देशातील संविधानाबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना काही मुलभूत अधिकार व हक्क दिले आहेत. ज्यामुळे आपण त्या अधिकारांचा वापर करून आपले अधिकार मिळवू शकतो. आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपाचे संविधान आहे. त्या संविधानात नमूद विविध कलामांचा वापर करून आपण आपले अधिकार गाजवू शकतो.

संविधानांत नमूद विविध कलमामुळे कोणतीही व्यक्ती आपल्यावर हक्क गाजवू शकत नाही. आपल्या देशांत विविध जाती धर्माचे लोक वास्तव्य करतात. त्यामुळे भारतीय संविधनांच्या समितीने देशांतील विविध समस्यांचा व्यवस्थित अभ्यास करून केली आहे. चला तर मग जाणून घेवूया या आपल्या संविधानाबद्दल महत्वपूर्ण माहिती

भारताच्या संविधानाविषयी मराठी माहिती – Bhartiya Samvidhan in Marathi

Bhartiya Samvidhan in Marathi
Bhartiya Samvidhan in Marathi

भारतीय संविधानाचे निर्माता – Makers of Indian Constitution

इंग्रज सरकारने भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सदस्यांनी  देशांत स्वदेश निर्मित संविधान निर्माण करण्याची योजना आखली. भारत पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती केल्यानंतर इंग्रजांची देशांतील हुकुमत संपेल आणि इंग्रज आपला भारत देश सोडून निघून जातील, अशी घोषण केल्यानंतर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपल्या देशांतील प्रशासन व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी संविधान निर्माण करण्याची योजना आखली.

त्याकरिता एक घटना समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीच्या अध्यक्ष पदाकरिता सन १९४६ साली निवडणुका घेण्यात आल्या. सन ९ डिसेंबर १९४६ साली घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली येथे पार पडले. त्या समितीचे हंगामी अध्यक्ष हे डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे होते. सन ११ डिसेंबर १९४६ साली घटना समितीच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. या घटना समितीचे सल्लागार हे बी. एन. राव होते. तसचं, या घटना समितीच्या एकूण ११ उपसमित्या होत्या.

सन २९ ऑगस्ट १९४७ साली घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. या घटना समितीचे कामकाज सुमारे १०८२ दिवस म्हणजे २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवस चालले.  प्रदीर्घकाळ चाललेल्या कामकाजामुळे आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. सन ९ डिसेंबर १९४६ ते १४ ऑगस्ट १९४७ सालापर्यंत घटना समितीचे सुमारे ५ अधिवेशने झाली. या अधिवेशनाचे सुमारे सात सदस्य होते. यानंतर सन २२ जानेवारी १९४८ साली पं. जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीच्या उद्दिष्टांबाबत मांडलेला ठराव मंजूर झाला.

सन २६ नोव्हेंबर १९४९ साली घटना समितीने भारताचे संविधान स्वीकार केले. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यावर स्वाक्षरी केली. यानंतर सन २४ जानेवारी १९५० साली संविधान समितीची अखेरची बैठक पार पडली आणि सन २६ जानेवारी १९५० साली भारतीय संविधान आमलात आणले गेलं. सुरुवातीला संविधानात ३९५ कलम, २२ प्रकारणे आणि ८ परिशिष्टे समाविष्ट होते. सध्या संविधानात एकूण ४४८ कलम, २४ प्रकरणे आणि १२ परिशिष्टे समाविष्ट आहेत.

परंतु, सन १९५१ च्या पहिल्या घटना दुरुस्तीनुसार त्या संविधानात आता ९ वे परिशिष्ट, सन १९८५ च्या ५२ व्या घटना दुरुस्तीनुसार १० वे परिशिष्ट, सन १९९३ च्या ७४ व्या घटना दुरुस्तीनुसार १२ वे परिशिष्ट घटनेत अंतर्भूत करण्यात आले आहेत. त्यामुळे आता घटनेतील परिशिष्टांची संख्या एकूण १२ झाली आहे. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून भारतीय संविधानाचा उल्लेख केला जातो. १९४६ सालच्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली.

भारतीय संविधान हे २६ जानेवारी १९५० सालीच का आमलात आणल्या गेले? – Why was the Indian Constitution enacted on January 26, 1950

भारतीय संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ साली बनून तयार असतांना आणि त्या संविधानाला घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मान्यता दिल्यानंतर देखील ते संविधान सन २६ जानेवारी १९५० साली आमलात आणण्यात आले. कारण, सन २६ जानेवारी १९३० साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सदस्यांनी स्वातंत्र्य प्राप्त करण्याची शपथ घेतली होती.

याबद्दल आणखी सांगायचं म्हणजे संविधान लागू झाल्याच्या दहा मिनिटानंतर घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होण्याचा मान मिळविला. त्यांनी सन २६ जानेवारी १९५० साली दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.

भारतीय संविधानातील नागरिकांचे मुलभूत अधिकार – Fundamental Rights of Indian Constitution

भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना सहा प्रकारचे विशेष मुलभूत अधिकार बहाल केले आहेत.

  • व्यक्तीचा आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास करून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधूता या लोकशाही मुल्यांची जोपासना करणे हा मुलभूत अधिकार बहाल करण्यामागील महत्वपूर्ण उद्देश आहे.
  • व्यक्तींच्या मुलभूत अधिकारावर आक्रमण झाल्यास त्याविरुद्ध व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. आणि न्यायालयाचा त्यावरील निर्णय बंधनकारक असतो.
  • थोडक्यात मुलभूत हक्कांच्या घटनेत समावेश केल्याने कोणत्याही बहुमत प्राप्त पक्षाची हुकुमशाही नष्ट होत नाही.
  • व्यापक समाजहित लक्षात घेवून मुलभूत हक्कांवर काही बंधने लादली जातात.
  • भारतीय राज्यघटनेतील तिसऱ्या भागात कलम १२ ते ३५ दरम्यान मुलभूत हक्कांची तरतूद करण्यात आलेली आहे.
  • सुरुवातीला हे अधिकार सात प्रकारचे होते परंतु, सन १९७८ सालच्या ४४ व्या घटना दुरुस्तीनंतर संपत्तीचा हक्क हा मुलभूत हक्क हा मुलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मुलभूत हक्कांची संख्या सात वरून सहा झाली आहे.
  • अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि फ्रान्सच्या जनतेने मिळवलेली स्वातंत्र्याची सनद यांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेतील मुलभूत अधिकारांवर दिसून येतो.

याव्यतिरिक्त, भरतीय संविधानात पंचवार्षिक योजनांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे, त्या पंचवार्षिक योजनेची प्रेरणा रुस देशाकडून घेण्यात आली होती.  तसचं, आपला भारत देश एक धर्म निरपेक्ष देश आहे. कारण, आपल्या देशांत अनके धर्मांचे लोक राहतात, त्यामुळे आपल्या देशात कोणत्याही प्रकारचा विशेष असा धर्म नाही आहे.

भारतीय संविधान निर्मिती वेळी कोणत्या देशाकडून काय घेतले – What is Borrowed From the Other Countries in the Constitution of India

सर्व देशांतील संविधानांचा अभ्यास करून भारताचे संविधान निर्माण करण्यात आले आहे. काही महत्वाच्या गोष्टी ज्या भारतीय संविधानात बाहेरील देशाकडून घेण्यात आलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे :

अमेरिका (America)मुलभूत हक्क (Fundamental Rights)
इंग्लंड (यु.के.) (England (U.K.)) संसदीय शासन प्रणाली (Parliamentary Government)
कॅनडा (Canada) केंद्राची सत्ता राज्याच्या सत्तेपेक्षा प्रभावी
ऑस्ट्रेलिया (Australia) लोकसभा आणि राज्यसभेचे संयुक्त अधिवेशन (Joint sitting of Loksabha and Rajyasabha )
द. आफ्रिका (South Africa) घटना दुरुस्ती (Amendment of the Constitution)
आयर्लंड (Ireland) मार्गदर्शक तत्वे (Directive Principles)

भारतीय संविधानाशी संबंधित काही महत्वपूर्ण गोष्टी – Important facts of Indian Constitution

  • सन २०१६ सालापर्यंत भारतीय संविधानात सुमारे ९२ घटना दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या. यातील पहिली घटना दुरुस्ती ही सन १९५१ साली करण्यात आली.
  • भारतीय संविधानात नमूद विविध घटना या रशिया, फ्रांस, कॅनडा, आयर्लंड आणि अमेरिका इत्यादी देशांच्या संविधानाचा अभ्यास करून घेण्यात आल्या आहेत.
  • भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करण्याचा अधिकार केवळ पंतप्रधानांना आणि प्रजासत्ताक दिनी जनतेला संबोधित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना देण्यात आला आहे.
  • संविधानानुसार भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न, पद्मभूषण, आणि कीर्ती चक्र हे प्रजासत्ताक दिनीच प्रदान करण्यात यावे.
  • भारतीय राष्ट्रगीत ‘जन गण मन ‘ हे संविधान लागू होण्याच्या दोन दिवसापूर्वीच अंगीकारण्यात आलं होत. या राष्ट्रगीताची निर्मिती रवींद्रनाथ टागोर यांनी केली आहे.

भारतीय संविधानाने आपल्या भारतीय जनतेला अश्या स्वरूपाचे मुलभूत हक्क दिले आहेत. ज्यामुळे आपण आपल्या देशांत मुक्तपणे संचार करू शकतो.  एक चांगले आणि आनंदी जीवन जगू शकतो. त्यामुळे आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपणास आपल्या देशाच्या संविधानाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. धन्यवाद. मित्रांनो, जर आपणास भारतीय संविधानाबद्दल अजून माहिती पाहिजे असल्यास आपण खालील लिंकवर भेट द्या.

https://www.india.gov.in/my-government/constitution-india

भारतीय संविधानातील ६ मुलभूत हक्क: 6 Fundamental Rights in the Constitution of India

  1. शिक्षणाचा आणि सांस्कृतिक हक्क
  2. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
  3. समानतेचा हक्क
  4. शोषणा विरुद्धचा हक्क
  5. स्वातंत्र्याचा हक्क
  6. घटनात्मक उपायांचा हक्क

४४ व्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क हा मुलभूत हक्कांमधून वगळण्यात आला आहे.

भारतीय संविधानाबद्दल काही रंजक तथ्य – Interesting Facts About Constitution of India

  • भारतीय संविधानाची मूळ प्रत हि पूर्णतः हस्तलिखित आहे.
  • भारतीय संविधानाची प्रेम बिहारी नारायण रायझादा यांच्या हस्ते लिहण्यात आले आहे.
  • संविधान लिहायला २ वर्षे, ११ महिने, १८ दिवसांचा कालावधी लागला.
  • भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर संविधान समितीच्या एकूण २८४ सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत.
  • संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे शब्द फ्रांसच्या संविधानातून घेण्यात आलेले आहेत.
  • ४२ व्या घटना दुरुस्तीला ‘लघु-राज्यघटना’ असे देखील म्हटल्या जाते.

भारतीय संविधान काही महत्वाचे प्रश्न – Questions Related to Indian Constitution

१. भारतीय संविधान कधी स्वीकारण्यात आले?

उत्तर : २६ नोव्हेंबर १९४९.

२. भारतीय संविधान कधी अंमलात आणले गेले?

उत्तर : २६ जानेवारी १९५०.

३. भारतीय संविधानात किती मुलभूत हक्क आणि कर्तव्यांचा समावेश आहे?

उत्तर : मुलभूत हक्क, ६ आणि मुलभूत कर्तव्ये : ११

४. लोकशाही म्हणजे काय?

उत्तर : लोकांचे, लोकांसाठी, लोकांद्वारे चालविण्यात येणारे शासन म्हणजे लोकशाही.

५. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत?

उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

६. भारतीय संविधाने हृदय किंवा आत्मा कशाला म्हणतात?

उत्तर : घटनात्मक उपायांचा हक्क किंवा कलम ३२ ला भारतीय संविधाने हृदय किंवा आत्मा म्हणतात.

७. भारतीय संविधानाचा सरनामा (उद्देशपत्रिका) कुणी तयार केली?

उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू

८. भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर किती सदस्यांच्या सह्या आहेत?

उत्तर : २८४ सदस्य.

९. संविधान दिन केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : २६ नोव्हेंबर.

Previous Post

महान संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

Next Post

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Devanand Ingle

Devanand Ingle

मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. माझ शिक्षण बि.सी.ए. कम्प्युटर क्षेत्रांत झालं असून, मला लिहिण्याची आणि वाचण्याची आवड असल्याने मी माझा छंद जोपासण्यासाठी या क्षेत्राकडे वळलो आहे. "माझी मराठी" या वेबसाईट च्या माध्यमातून लिखाण करून मी माझा छंद जोपासत आहे.

Related Posts

विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Mahashivratri Quotes in Marathi

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Fish Pond in Marathi

मराठी मधील काही मजेदार फिश पॉन्ड

Maharashtra Information in Marathi

महाराष्ट्राची संपूर्ण माहिती

Indian Scientists Information in Marathi

महान भारतीय शास्त्रज्ञांबद्दल माहिती

Ashok Stambh Information in Marathi

अशोक स्तंभाबद्दल संपूर्ण माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved