भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे जीवनचरित्र

Dr Rajendra Prasad Information in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनचरित्राबद्दल महत्वपूर्ण माहिती.

भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे जीवनचरित्र – Dr. Rajendra Prasad Information in Marathi

Dr Rajendra Prasad Information in Marathi
Dr. Rajendra Prasad Information in Marathi

डॉ. राजेंद्र प्रसाद हे वकील, लेखक, भारतीय राजनैतिक, एक थोर स्वातंत्र्यसैनिक, महान राष्ट्रभक्त होते. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती (१९५० – १९६२) होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल माहिती – Dr Rajendra Prasad Biography in Marathi

नाव (Name) डॉ. राजेंद्र प्रसाद
जन्म (Birthday) ३ डिसेंबर १८८४
जन्मस्थान (Birthplace) जीरादेई (बिहार)
वडील (Father Name) महादेव सहाय
आई (Mother Name) कामलेश्वरी देवी
पत्नी (Wife Name) राजवंशी देवी
पुरस्कार (Awards) भारतरत्न (भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार)
पुस्तके (Books) इंडिया डीवायडेड, आत्मकथा, डॉ. राजेंद्र प्रसाद अॅट द फिट ऑफ महात्मा गांधी इ.
अध्यक्ष घटना समितीचे अध्यक्ष
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मृत्यु (Death) २८ फेब्रुवारी १९६३
मृत्यु स्थान पटना (बिहार)

डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा इतिहास – Dr Rajendra Prasad History in Marathi

३ डिसेंबर १८८४ रोजी बिहार येथील सिवान जिल्ह्यातील जीरादेई या गावी डॉ. प्रसाद यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महादेव सहाय तर आईचे नाव कामलेश्वरीदेवी होते. त्यांचे वडील संकृत व पारशी भाषेचे विद्वान होते तर आई धार्मिक स्वभावाची होती. आईकडून रामायनाच्या गोष्टींमधून मधून त्यांच्यावर संस्कार करण्यात आले होते.

डॉ. प्रसाद यांच्यावर आपल्या पालकांच्या संस्कार व व्यक्तिमत्वाचा विशेष प्रभाव पडलेला होता. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी बालविवाहाच्या प्रथेनुसार त्यांचे लग्न राजवंशी देवी सोबत करण्यात आले होते.

डॉ. प्रसाद याचे प्रारंभिक शिक्षण – Rajendra Prasad Education

डॉ. प्रसाद बालपणापासूनच अतिशय हुशार व बुद्धिमान होते. त्यांची शिकण्याची व समजून घेण्याची क्षमता खुप उत्तम होती. अगदी ५ वर्षांचे असताना त्यांना हिंदी, उर्दू, आणि पारशी भाषेचे चांगलेच ज्ञान अवगत झाले होते.

प्राथमिक शिक्षण जीरादेई येथून पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते कलकत्ता येथे गेले. कलकत्ता विद्यापीठाची प्रवेश परीक्षेमध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ज्यानंतर त्यांना विद्यापीठामध्ये ३० रू. प्रती मास अशी शिष्यवृत्ती देण्यात आली.

उच्च शिक्षण:

कलकत्ता येथे त्यांनी अगोदर विज्ञान विषयात पदवीचे शिक्षण घेतले. नंतर अर्थशास्त्र विषयात एम.ए. चे शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले. पुढे विधी (Law) मध्ये पद्युत्तर शिक्षण घेउन नंतर त्याच विषयात Ph. D. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

डॉ. राजेंद्र प्रसाद: वकिली पेशा

विधीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पटना येथे वकिली सुरु केली. हळूहळू एक हुशार वकील म्हणून त्यांची ओळख लोकांना होत गेली. याच दरम्यान त्यांना भारताच्या स्वातंत्र्य चळवळी बद्दल माहिती झाली आणि नंतर त्यांनी स्वतःला या चळवळीत झोकून दिले व आपले जीवन देशाच्या सेवेत समर्पित केले.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा स्वातंत्र्य चळवळतील सहभाग – Freedom Fighter Dr Rajendra Prasad

डॉ. प्रसाद स्वातंत्र्य चळवळीत एक वकील म्हणून सामील झाले. महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडलेला होता. १९२० मध्ये वकीली पेशा सोडून त्यांनी गांधीजींसोबत असहकार आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला. १९१७ मध्ये ‘चम्पारण सत्याग्रह’, ‘मिठाचा सत्याग्रह’ (१९३०) तसेच १९४२ ची ‘चले जाव’ चळवळीत ते गांधीजींसोबत सहभागी झाले होते. यावेळी अनेकदा त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला.

Freedom Fighter Dr Rajendra Prasad
Freedom Fighter Dr Rajendra Prasad

१९११ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या कलकत्ता येथील अधिवेशनात त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. पुढे १९३४, १९३९ आणि १९४७ असे तीनदा राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. १९४६ सालच्या काळजीवाहू सरकारमध्ये त्यांना अन्न व कृषीमंत्री पद देण्यात आले. ११ डिसेंबर १९४६ साली संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. पुढे १९४९ पर्यंत त्यांनी हे अध्यक्षस्थान भूषविले.

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती: डॉ. राजेंद्र प्रसाद – First President of India Dr Rajendra Prasad

First President of India Dr Rajendra Prasad
First President of India Dr Rajendra Prasad

२६ जानेवारी १९५० मध्ये भारतीय संविधान लागू करण्यात आल्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता, राष्ट्रभक्ती आणि देशसेवेच्या जोरावर त्यांनी देशातील या सर्वोच्च पदाचा कारभार अतिशय उत्तम प्रकारे संभाळला. जवळपास १२ वर्षे ते देशाचे राष्ट्रपती म्हणून विराजमान होते.

डॉ. राजेंद्र प्रसाद : लेखक – Dr Rajendra Prasad as a Writer

एक थोर स्वातंत्र्यसैनिक, उत्तम राजनैतिक, ख्यातनाम वकील, यासोबतच एक दृष्टा लेखक म्हणून सुद्धा डॉ. राजेंद्र प्रसाद ओळखले जातात. यांच्याद्वारे लिहण्यात आलेल्या पुस्तकांपैकी काही महत्वाची पुस्तके खालीलप्रमाणे :

  • इंडिया डीव्हायडेड
  • भारतीय शिक्षा
  • आत्मकथा
  • डॉ. राजेंद्र प्रसाद एट द फीट ऑफ महात्मा गांधी
  • महात्मा गांधी आणि बिहार
  • चम्पारण मधील सत्याग्रह
  • द युनिटी ऑफ इंडिया
  • संकृत आणि संकृती इ.

भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद – Rajendra Prasad Got Bharat Ratna Award

राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना १९६२ मध्ये राजनैतिक आणि सामाजिक क्षेत्रा मधील आपल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल भारताचा सर्वोच्च नागरी सम्मान ‘भारतरत्न‘ देऊन गौरविण्यात आले.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा मृत्यू – Rajendra Prasad Death

अनेकवर्षे देशाची निस्वार्थ सेवा व राष्ट्रपती म्हणून देशाचे नेतृत्व केल्यानंतर शेवटी शेवटी त्यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून दिले. अखेर २८ फेब्रुवारी १९६३ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी पटना येथे अखेरचा श्वास घेतला. आपल्या अंतिम श्वासापर्यंत त्यांनी लोकांची सेवा केली.

काही महत्वाची वारंवार विचारल्या जाणारी प्रश्न:

१. काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनात डॉ. राजेंद्र प्रसाद हे पहिल्यांदा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले?

उत्तर : १९३४ चे मुंबई अधिवेशन.

२. डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न सन्मान जीवित असताना देण्यात आला कि मरणोत्तर?

उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद यांना जीवित असताना भारतरत्न देऊन गौरविण्यात आले.

३. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या मुलाचे नाव काय होते?

उत्तर : मृत्युंजय प्रसाद.

४. डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे जन्मस्थान कोणते आहे?

उत्तर : जीरादाई, जि. सिवान, बिहार येथे डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्म झाला.

५. डॉ. राजेंद्र प्रसाद किती वेळा राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष म्हणून निवडून आले?

उत्तर : १९३४, १९३९, आणि १९४७ असे एकूण ३ वेळा डॉ. राजेंद्र प्रसाद काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

६. डॉ. प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या साली देण्यात आला?

उत्तर : १९६२ साली.

७. भारताचा पहिला नागरिक कोण असतो ?

उत्तर : भारताचे राष्ट्रपती.

८. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?

उत्तर : प्रतिभाताई पाटील.

९. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर : श्रीमती इंदिरा गांधी.

१०. स्वंतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

उत्तर : पं. जवाहरलाल नेहरू.

११. भारताच्या तीनही सैन्याचा प्रमुख कोण असतो?

उत्तर : भारताचे राष्ट्रपती.

१२. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top