Saturday, June 3, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक, श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ आणि भारतीय अर्थ व राज्यशास्त्राचे जनक असणा-या दादाभाई नौरोजी यांचा जीवनपरिचय

Dadabhai Naoroji in Marathi 

भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची पायाभरणी करणाऱ्या दादाभाई नौरोजीना राजनीती मधील पितामह म्हंटल्या जातं. दादाभाई एक राजकीय नेता होते, त्यांच्या आदर्श आणि महान विचारांनी प्रभावित झालेल्या देशवासीयांनी त्यांना राष्ट्र पितामहाची उपाधी दिली. दादाभाई नौरोजीना ग्रैंड ओल्ड मैन, भारतीय अर्थशास्त्राचे जनक आणि आर्थिक राष्ट्रवादाचे जनक देखील म्हंटल्या जातं. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं शिवाय ते राष्ट्रीय काँग्रेसचे तीन वेळेस अध्यक्ष देखील राहिले आहेत.

दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्याची मागणी लावून धरली होती. त्यांना वास्तुकार आणि शिल्पकार म्हणून देखील ओळखलं जातं. देशभक्तीची भावना त्यांच्यात ओतप्रोत भरलेली होती, आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी देशसेवेकरता समर्पित केलं आणि राष्ट्रहिताची बरीच कामं केली. या लेखातून या महान व्यक्तिमत्वा बद्दल आपण अधिक जाणून घेऊया.

दादाभाई नौरोजी यांचा जीवनपरिचय – Dadabhai Naoroji Information in Marathi

Dadabhai Naoroji Information in Marathi
Dadabhai Naoroji Information in Marathi

दादाभाई नौरोजींचा अल्पपरिचय- Dadabhai Naoroji Biography in Marathi

नाव (Name) दादाभाई नौरोजी
जन्म (Birthday)4 सप्टेंबर 1825 मुंबई, महाराष्ट्र
पत्नी (Wife Name)गुलबाई
शिक्षण (Education)एल्फिन्स्टन इंस्टीट्युट, मुंबई
संस्थापक (Founder)इंडियन नेशनल काँग्रेस
मृत्यू (Death)30 जून 1917 मुंबई, महाराष्ट्र

दादाभाई नौरोजी याचं प्रारंभिक जीवन – Dadabhai Naoroji History in Marathi

भारताचे ग्रैंड ओल्ड मैन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादाभाई नौरोजींचा जन्म 4 सप्टेंबर 1825 ला मुंबईतील एका गरीब पारशी पुरोहित कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव नौरोजो पलांजी डोरडी असे होते. दादाभाई अवघे 4 वर्षांचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. पुढे त्यांच्या आई मनेखबाईंनी आई आणि वडिलांची जवाबदारी उचलून दादाभाईंचा उत्तम सांभाळ केला. आर्थिक परिस्थिती बेताची असून देखील त्यांनी दादाभाई नौरोजींना उच्च विद्या विभूषित केले.

दादाभाई नौरोजींचा विवाह – Dadabhai Naoroji Marriage

11 वर्षांचे असतांना दादाभाईंचा विवाह 7 वर्षांच्या गुलबाईंशी झाला. त्या सुमारास बालविवाहाची प्रथा होती परंतु पुढे ही प्रथा बंद करण्यात आली. या विवाहापासून दादाभाईंना तीन मुलं झाली.

दादाभाई नौरोजींचे शिक्षण – Dadabhai Naoroji Education

त्यांचे प्राथमिक शिक्षण नेटिव एज्यूकेशन सोसायटी च्या शाळेतून झाले. त्यापुढचे शिक्षण त्यांनी मुंबईतील एलफिन्स्टन महाविद्यालयातून पूर्ण केले. सुरुवातीपासून त्यांना शिक्षणाची फार आवड होती. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांना स्कॉलरशिप देखील मिळाली होती. त्यांची बुद्धिमत्ता, कौशल्य, साधेपणा, विनम्रता पाहून त्यांच्या मुख्याध्यापकांनी त्यांना इंग्लंड ला जाऊन शिक्षण घेण्याकरता मदत देऊ केली होती. परंतु ते इंग्लंड ला जाऊ शकले नाहीत.

दादाभाई नौरोजींची कारकीर्द – Dadabhai Naoroji Career

  • पारशी परिवारातील दादाभाईंनी 1 ऑगस्ट 1851 साली पारशी समुदायाला एकत्र आणण्यासाठी रहनुमाई मज्दायास्त्री सभेचे आयोजन केले. आता ही सोसायटी मुंबईतून चालविल्या जाते.
  • गणित आणि इंग्रजी विषयावर प्रभुत्व असल्याने दादाभाई वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी 1855 साली एलफिन्स्टन महाविद्यालयात गणित आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले.
  • 1859 साली त्यांनी स्वतःची कॉटन ट्रेडिंग कंपनी सुरु केली “नौरोजी एंड कंपनी” या नावाने ही कंपनी ओळखल्या गेली.
  • इंग्रज भारतात राहून भारतीयांवर कश्या प्रकारे अत्याचार करतायेत, भारतातील संपत्तीचा स्वतःकरता उपयोग करून त्याचा लाभ भारतीयांना कसा मिळू देत नाहीत या करीता दादाभाई नौरोजीनी “ड्रेन थेअरी” सादर केली.
  • त्यांच्या या थेअरी मुळे इंग्रजांच्या पायाखालची वाळू सरकली होती. इंग्रज दादाभाईंच्या नावाने घाबरू लागले होते.
  • 1874 दरम्यान तिसरे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या साम्राज्यात दादाभाई नौरोजीनी दिवाण म्हणून देखील कारभार सांभाळला आणि येथूनच त्यांच्या सामाजिक जीवनाची खरी सुरुवात झाली.
  • 1885 ते 1888 दरम्यान दादाभाई मुंबईच्या विधान परिषदेचे सदस्य देखील होते. 1886 साली त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष बनविण्यात आले.

स्वातंत्र्य संग्रामात दादाभाई नौरोजींचे योगदान आणि काँग्रेसची स्थापना –  Congress party Founded

  • एक सच्चा देशभक्त आणि सदैव राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या दादाभाई नौरोजीना इंग्रजांची रणनीती बऱ्याच प्रमाणात आवडत असे. नौरोजीना इंग्रजांच्या न्यायप्रियतेवर देखील पूर्ण विश्वास होता. त्यामुळे त्यांना अनेकदा इतरांच्या रोषाचा देखील सामना करावा लागत असे, परंतु यातून त्यांची विशाल वैचारिकता प्रगट होत असे.
  • दादाभाई नौरोजीनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करून भारतीयांची मदत करण्याचा आणि त्यांच्या स्थितीत बदल करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना एक शिक्षित आणि सभ्य समाज निर्माण करायचा होता. भारतात पसरलेल्या गरिबीला आणि असाक्षरतेला त्यांनी ब्रिटीशांना जवाबदार ठरवले.
  • 1885 साली दादाभाई नौरोजीनी ए ओ ह्यूम आणि दिन्शाव एदुल्जी यांच्या समवेत मिळून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. त्यामुळे त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना-पुरुष देखील मानल्या जातं.
  • कायम राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या दादाभाईंनी आपल्या कार्यकाळात उग्र विचार करणाऱ्या आणि शांततापूर्वक विचार करणाऱ्यांमध्ये होत असलेल्या विभाजनाला थांबवले. आणि 1906 साली अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्वराज्याची मागणी केली.
  • 1892 साली लंडन इथं झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाग घेतला आणि लिबरल पार्टी कडून निवडणूक लढली. आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते प्रथम ब्रिटीश भारतीय सांसद म्हणून निवडून आले.
  • दादाभाई नौरोजीना शांततापूर्वक मार्गाने भारताचे स्वातंत्र्य हवे होते, विरोधाचे स्वरूप अहिंसक आणि संवैधानिक असावे यावर त्यांचा विश्वास होता.
  • त्यांनी भारतीयांना पटवून दिले की “भारतातील धन इंग्रजांकरवी भारताबाहेर जाऊन पुन्हा तेच धन आपल्याला कर्ज म्हणून दिल्या जात आहे” हे एक दृष्टचक्र आहे.
  • महादेव गोविंद रानडे यांनी देखील ही बाब लक्षात आणून दिली होती की “राष्ट्रीय संपत्ती मधील एक तृतीयांश हिस्सा कोणत्या न कोणत्या रुपात ब्रिटीशां करवी भारता बाहेर नेल्या जात आहे.

दादाभाई नौरोजींचे निधन – Dadabhai Naoroji Death

आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये दादाभाई इंग्रजां करवी निरपराध लोकांवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांवर लेख लिहित असत आणि या विषयावर भाषण देखील देत असत. 30 जून 1917 ला वयाच्या 91 व्या वर्षी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दादाभाई नौरोजीनी अखेरचा श्वास घेतला. दादाभाई नौरोजींचे निधन मुंबई येथे झाले. ते भारतात राष्ट्रीय भावनांचे जनक होते.

भारतात स्वराज्याची मागणी करणाऱ्या दादाभाईनीच स्वातंत्र्य संग्रामाची  सुरुवात केली होती. भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी दादाभाई नौरोजीना स्वातंत्र्य समरातील महत्वपूर्ण भारतीयांपैकी एक मानल्या जातं. देशसेवेत त्यांनी केलेल्या कार्यासाठी व त्यांच्या बलिदानाचे स्मरण राहावे याकरता त्यांच्या सन्मानार्थ एका मार्गाचे नाव दादाभाई नौरोजी रोड ठेवण्यात आले आहे.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ दादाभाई नौरोजींबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Previous Post

प्रेमाच्या नात्यातील प्रत्येक भावना व्यक्त करणारे काही सुंदर मराठी स्टेटस

Next Post

बुलढाण्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी 2020 जाहीर, देशावर आर्थिक संकट येणार असल्याचे भाकीत.

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू जन्म 20 जून 1958 उपरबेडा, जि. मयूरभंज (ओडिशा राज्य) राजकीय कारकीर्द 1997 ते...

by Editorial team
July 13, 2022
Next Post
Buldhana Bhendwal Bhavishyavani

बुलढाण्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी 2020 जाहीर, देशावर आर्थिक संकट येणार असल्याचे भाकीत.

28 April History Information in Marathi

जाणून घ्या २८ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

Ramayana Story in Marathi

या श्रापामुळे रावणाचा वध प्रभू श्रीराम यांच्या हातून झाला! जाणून घ्या या लेखातून.

Difference Between CNG and LPG

सी.एन.जी आणि एल.पी.जी गॅस मध्ये काय फरक असतो?

Darubandi Sathi Anokhe Niyam

ही गोष्ट केल्यास पूर्ण गावाला द्यावी लागते मटणाची पार्टी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved