शिक्षणाचे महत्त्व सांगणारे सुंदर भाषण

Shikshanachya Mahatva var Bhashan

आधुनिक काळातील विद्येच्या आराध्य दैवत महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी स्त्री शिक्षणाला विरोध असताना सुध्दा समाजातील मुलींसाठी पुण्याच्या शनिवारवाड्यात पहिली शाळा उघडली. अश्या महान आत्म्याला साष्टांग वंदन करून, आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी या भाषणाची सुरुवात करतो,

  “ विद्येविना गती गेली

   गती विना मती गेली,

   मती विना शूद्र खचले

   इतके अनर्थ एका अविद्येने केले.”

माणसाचं जीवन हे दिव्यासारखं असत आणि विद्या त्या दिव्यातील पेटणाऱ्या वातीसारखी असते, जर माणसाच्या दिव्यासारख्या जीवनात पेटलेली वात नसेल तर ते मानवी जीवन अंधकारमय आहे.  विद्येचे महत्व सांगताना संत महात्मे सांगून गेलेले आहे, त्यापैकी काहींच वर्णन मी खाली करणार आहे.

शिक्षणाचे महत्त्व सांगणारे सुंदर भाषण – Speech on Importance of Education in Marathi

Speech on Education in Marathi
Speech on Education in Marathi

जसे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की ,

”शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि जो हे दूध पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.”

म्हणजे आपण विचार करू शकता की ज्या व्यक्तीने संपुर्ण देशाचा कारभार कसा असायला हवा यामध्ये आपले मोलाचे योगदान दिले, आणि तीच व्यक्ती समाजाला शिक्षणाचे महत्त्व सांगताना शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा देते, म्हणजेच शिक्षणात काहीतरी विशेष असेलच ना, हो शिक्षण आहेच विशेष कारण शिक्षणाच्या बळावर आज व्यक्ती काहीही करू शकतो.

या आधीच्या काळात फारश्या लोकांना शिक्षणाचा लाभ घेता येत नव्हता. आणि त्यामुळे ज्यांच्या कडे शिक्षण नव्हतं त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता दिसून येत होती. त्यामुळे जास्त लोक आपल्या मालकाची चाकरी करत आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असत. माहिलांना तर फक्त “चूल आणि मूल” या नियमात समाजाने बांधले होते.

एका विशिष्ट रेषेच्या बाहेर विचार करणे म्हणजे तेव्हाच्या काळात गुन्हा समजल्या जात असे. पण म्हणतात ना जेव्हाही समाजात अनीती किंवा अत्याचार किंवा काही लोक आपल्या हक्कांपासून वंचित राहतात तेव्हा समाजात एक असा व्यक्ती जन्माला येतो जो त्या समाजात क्रांती घडवून आणतो, आणि समाजाला एका मोठ्या दरीतून बाहेर काढतो. तसेच या कालियुगाच्या समाजाला दरीतून बाहेर काढण्याचे काम क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांनी केले. सर्वदूर शिक्षणाचा अंधकार पसरलेला असताना लोकांचे दगड, धोंडे, शेण आपल्या शरीरावर घेऊन त्यांनी समाजात शिक्षणाच्या प्रकाशाची ज्योत पेटवली.

शिक्षणाचे महत्व माणसाच्या जीवनात खूप मोठे आहे. संत गाडगे बाबा यांनी सुध्दा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की लोकहो एक वेळ उपाशी राहिले तरी चालेल पण लेकराला शाळेत घाला. थोर महात्म्यांनी शिक्षणाचे महत्व लोकांना, समाजाला पटवून देत देत आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले.

शिक्षणाला माणसाचा तिसरा डोळा म्हटलं जातं. जेव्हा माणसाचा तिसरा डोळा उघडतो त्याला सर्व गोष्टींच ज्ञान झालेलं असत, तो प्रत्येक गोष्टीला अनुभवू शकतो. त्याच प्रमाणे शिक्षण मनुष्याच्या बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचे काम करते.

नेल्सन मंडेला यांनी सुध्दा शिक्षणाचे महत्व सांगताना आपले विचार मांडले. ते म्हणाले होते,

“शिक्षण हे एक प्रभावी शस्त्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता.”

दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती ज्यांनी संपूर्ण जगाला शिक्षणाचे महत्त्व सांगताना हे उच्चार काढले. की तुम्ही शिक्षणाच्या बळावर संपूर्ण जगाला जिंकू शकता एवढी ताकद शिक्षणात आहे. शिक्षण हे त्या कुऱ्हाडीसारखे आहे जी कुऱ्हाड तुम्हाला जीवनाच्या जंगलातून प्रवास करताना आपल्या उपयोगी पडेल. आणि येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्यास मदत करेल.

जिवशास्त्राचे जनक महान अरस्तु यांनी सुध्दा शिक्षणाचे महत्व सांगताना सांगितले आहे की,

”शिक्षणाचे मूळ कडू असू शकतात पण त्यावर येणारे फळे हे गोड असतात.”

शिक्षण माणसाला हुशार बनवते आणि माणसातील क्षमतांना बाहेर काढण्यास मदत करते. ज्या क्षमतांच्या बळावर तो संपूर्ण विश्वाला जिंकण्याची धमक ठेवतो.

अमेरिकेचे महान विचारक जॉन डेव्हे यांनी शिक्षणाचे महत्व स्पष्ट करताना सांगितले की,

”शिक्षण जीवनाची सुरुवात नसून शिक्षणच जीवन आहे.”

याचा अर्थ असा की जीवनात शिक्षण नसेल तर त्या जीवनाचा अर्थ कवडीमोल आहे. आणि असे कवडीमोल जीवन निरर्थक ठरते, शिक्षण घेण्यासाठी विशिष्ट वय असण्याची गरज नसते. की आता तर शिक्षण घेऊच शकत नाही आता तर वय झाले, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की ‘‘माणूस हा मरेपर्यंत एक विध्यार्थीच असतो.” म्हणजेच कोणत्याच व्यक्तीला शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नाही.

फक्त मनात शिकण्याची जिद्द आणि स्वतःवर आत्मविश्वास असणे गरजेचे आहे, शिक्षण म्हणजे फक्त वह्या पुस्तकांची घोकणपट्टी करणे नाही तर त्या पुस्तकांचा आधार घेऊन चांगल्या आणि वाईट गोष्टींमधील फरक जाणून घेणे आहे.

भगवान गौतम बुद्ध यांनी सुध्दा स्पष्ट शब्दात सांगितले आहे की

‘दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हावयास जे शिकवते तेच खरे शिक्षण होय.”

शिक्षण मनुष्याला आतून आणि बाहेरून शिक्षित करण्याचे काम करत असते. सोबतच माणसाला नम्र बनविण्याचे काम शिक्षणच करते. आणि विद्या सुध्दा नम्र असलेल्या व्यक्तीवर शोभून दिसते. म्हणून म्हणतात न

“विद्या विनयेन शोभते.”

जसे एखाद्या झाडाला अनेक फळं लागलेले असतात ते झाड कसे नम्रपणे खाली झुकलेलं आपल्याला दिसते त्याच प्रमाणे विद्या माणसाला त्याच्या जीवनात नम्र बनविण्याचे कार्य करते. म्हणून म्हणेल

“एकवेळ हे वाघिणीचे दूध पिऊन तर पहा मग अंगामध्ये कसे भिनभिनत ते लक्षात येईल.”

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

आशा करतो लिहिलेले हे भाषण आपल्याला शिक्षणाचे महत्व समजण्यासाठी उपयोगी येतील. अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top