Home / History / पुण्यातील शनिवारवाडयाची रहस्यमय कहाणी

पुण्यातील शनिवारवाडयाची रहस्यमय कहाणी

Shaniwar Wada Information in Marathi

गड, किल्ले, वाडे, राजपाट मिळवणं आणि मिळाल्यानंतर त्या आपल्या ताब्यात ठेवण्याकरता राजनिती, कुटनिती, षडयंत्र रचणं या गोष्टी इतिहासाच्या पानांमधे दडलेल्या आपल्याला आढळतात.

त्या पाहुन, वाचुन असं वाटतं की खरच ही षडयंत्र घडली असतील? कशी रचली गेली असतील? काय काय घडले असेल? कोण कोण सहभागी असेल?
या विचारांनी आपण बैचेन होतो आणि उत्कंठा वाढते त्या घटना जाणुन घेण्यासंबधीची.

पुण्यातील पेशव्यांचा शनिवारवाडा हा ऐतिहासीक तर आहेच शिवाय अनेक गुढ रहस्य, घटना आणि आपल्या अजोड बांधकामामुळे आज देखील कुतुहलाचा आणि आश्चर्याचा विषय बनला आहे.

या लेखात शनिवारवाडया संबधी काही खास गोष्टी जाणुन घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

Shaniwar Wada Information in Marathi

पुण्यातील शनिवारवाडयाची रहस्यमय कहाणी – Shaniwar Wada in Marathi

या शनिवारवाडयाची मुहूर्तमेढ 10 जानेवारी 1730 ला शनिवारी रोवण्यात आली म्हणुन त्याला नाव पडले शनिवारवाडा. त्यानंतर 22 जानेवारी 1732 रोजी प्रचंड मोठया उत्साहात आणि दिमाखात वास्तुशांत करण्यात आली. त्या काळात 16,110 ईतका खर्च हा वाडा बांधण्याकरता आला.

या महालात एकाच वेळी 1000 लोक राहु शकत होते अश्या प्रकारची सोय या वाडयात करण्यात आली होती.

27 फेब्रुवारी 1828 ला या वाडयाला आग लागली आणि ती आग विझवण्याकरता त्यावेळी तब्बल 7 दिवस लागले. पण ही आग कशी लागली हे आज देखील एक गुढ आणि रहस्य बनुन राहीले आहे.

राघोबादादा आणि आनंदीबाई यांचे आपला पुतण्या नारायण रावाशी संबंध चांगले राहिले नव्हते त्याचे मुख्य कारण असे की फार लहान वयात नारायण रावांना पेशवा बनविलेले या पतीपत्नींना अजिबात रूचले नव्हते.

त्यामुळे संबंध ईतके ताणले गेले होते की काका पुतण्यांमधुन विस्तव देखील जात नव्हतां आणि मध्यस्थी प्रकरण मिटवण्यापेक्षा आगीत तेल ओतण्याचेच काम करीत होते.

मारेक.यांकरवी रघुनाथरावांनी “नारायणरावाला धरा” असा आदेश निर्गमीत केला पण तो आदेश आनंदीबाईंच्या हाती लागला आणि त्यांनी कुट कारस्थान रचले नारायणरावाला धरा ऐवेजी “नारायणरावाला मारा” असे करण्यात आले आणि “ध चा मा” करणारी आनंदीबाई या एकाच गोष्टीमुळे इतिहासात प्रसिध्दीला आली.

आज देखील या एका घटनेमुळे “ध चा मा नको करूस” हा वाक्प्रचार प्रचलीत झाला आहे.

(काही जाणकारांच्या मते हे खरे नाही, नारायणरावाला मारण्याचे आदेश खुद्द रघुनाथरावांनीच दिले आणि त्यांच्या डोळयासमोरच नारायणरावाला मारण्यात आले आणि त्यांचे तुकडे करून त्याच रात्री नदीत सोडण्यात आले)

नारायणराव आपल्या कक्षातुन संपुर्ण वाडयात “काका मला वाचवा” असे जोरात ओरडत धावत होते पण मारेक.यांनी कुठलीही दयामाया न दाखवता आनंदीबाईंच्या निर्णयामुळे नारायणरावाची अतिशय क्रुरपणे हत्या केली आणि त्यांच्या आरोळया या शनिवार वाडयात घुमत राहिल्या

नारायणरावांच्या या किंकाळया त्यांच्या मृत्युबरोबरच आसमंतात विरणा.या नव्हत्या, या आरोळया त्यांच्या मृत्युपश्चात देखील शनिवार वाडयात आजही ऐकु येतात असे कित्येकांचे म्हणणे आहे.

आजही पिशाच्च बाधीत स्थळांच्या कुठल्याही यादीत पुण्याच्या या शनिवारवाडयाचा उल्लेख आपल्याला आढळतोच.

शनिवारवाडयाचे नाव घेताच ओठावर येते ते बाजीराव पेशव्यांचे नाव आणि त्यांचे नाव आठवताच स्मरते ती लावण्यवती मस्तानी. छत्रसाल राजाची ही कन्या (काहींच्या मते ही छत्रसाल राजाच्या दरबारातील नर्तकी होती) युध्दात विजय मिळवुन दिल्याबद्दल छत्रसाल राजाने मस्तानीचा हात बाजीराव पेशव्यांच्या हातात दिला.

अतिशय आरसपानी सौंदर्याची धनी मस्तानी पाहुन बाजीराव पेशवे तिच्या प्रेमात पडले आणि तिला पुण्यात घेउन आले.

बाजीराव पेशवे हे उच्चकोटीचे ब्राम्हण असल्याने ब्राम्हण समुदायाने, हिंदु समाजाने त्यांच्या या नात्याला त्या काळी कडाडुन विरोध केला, त्यांच्या परिवाराने आणि पत्नी काशीबाईने मस्तानीचा कधीही स्विकार केला नाही आणि त्यामुळेच तिला कधीही रितसर आणि परंपरागत असा प्रवेश शनिवारवाडयात कधीही मिळाला नाही.

शनिवारवाडया नजिकच बाजीरावांनी मस्तानीकरता अतिशय देखणा असा आईनामहल बनविला होता. देखण्या मस्तानीकरता तेवढाच देखणा आईनामहल ज्याला मस्तानीमहल म्हणुन देखील ओळखल्या जायचे.

28 एप्रील 1740 ला नर्मदेच्या तिरावर रावेरखेडी येथे बाजीराव पेशव्यांचा विषमज्वराने मृत्यु झाला, ही बातमी समजताच हिरा गिळुन मस्तानीने देखील या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर एका भिषण अग्निकांडात मस्तानीचा आईनामहल जळुन खाक झाला.

काही इतिहासकारांच्या मते हा आईना महल कट कारस्थानाच्या भक्ष्यस्थानी पडला.

नक्की वाचा:

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी पुण्यातील शनिवारवाडया बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा पुण्यातील शनिवारवाडयाची रहस्यमय कहाणी  – Shaniwar Wada Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुध्दा.

नोट: Shaniwar Wada History – पुण्यातील शनिवारवाडया या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Junagarh Fort History in Marathi

जुनागढ किल्ल्याचा इतिहास – Junagarh Fort History in Marathi

Junagarh Fort History in Marathi जुनागढ किल्ला भारतातल्या राजस्थान राज्यातील बिकानेर शहरात स्थित आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *