भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भाषण

Pandit Jawaharlal Nehru Bhashan

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. ते एक उत्तम वक्ते आणि अभ्यासक होते. त्यांच्या भारताच्या इतिहासावर लिहीलेले “द डिस्कवरी ऑफ इंडिया” हे पुस्तक प्रसिध्द आहे. त्यांचे १४ ऑगस्ट १९४७ रोजी केलेल्या ऐतिहासीक राष्ट्राच्या नामे भाषणास सर्व देशवासी आजही नमन करतात.

चला तर मग त्यांच्या पूर्ण भाषणा विषयी (Pandit Jawaharlal Nehru Speech in Marathi) माहिती घेऊया.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भाषण – Pandit Jawaharlal Nehru Speech in Marathi

Pandit Jawaharlal Nehru Speech in Marathi
Pandit Jawaharlal Nehru Speech in Marathi

कित्येक वर्षांपासून आपण आज आपल्या भाग्याशी दिलेल्या वचनास पूर्ण करण्याची वेळ आली आहे. आपण ते वचन पाळू या पूर्णपणे तर नाही पण बऱ्याच अंशी आपण ते पाळू या.

मध्यरात्री सर्व जग झोपी गेले असतांना भारताच्या स्वातंत्र्याची पहाट होणार आहे तेव्हा या क्षणासाठी जागे व्हा.असे क्षण फार महत्वाचे आहेत कारण असे फार कमी क्षण असतात.

आता आपण जून्या दृष्ट काळातून निघून नवीन काळात प्रवेश करीत आहोत.

एक युग संपूर्ण एका देशाची बऱ्याच काळापासून आसुसलेली आत्मा मुक्त होते हा एक संयोगच आहे की या पवित्र मुहूर्तावर आम्ही भारत आणि त्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी तसेच सर्वात महत्वाचे मानवतेची सेवा करण्यास समर्पित होण्याची प्रतिज्ञा करत आहोत.

इतिहासाच्या हस्ताक्षरातच भारताच्या आपल्या अंतहीन शोधमोहीम सूरू केली आहे. भारताच्या असंख्य पिढयांच्या संघर्षाचा आणि यशाचा तसेच अपयशाने भरली आहे.

चांगल्या आणि वाईट समयी भारताने स्वतःच्या शोधाची दृष्टी हरवली नाही, न त्याने त्याच्या आदर्शांना ताकद देणार्यांना कधीच विसरला नाही.

आज आपले दुर्भाग्य संपले आहे. त्यामूळे भारत आपला शोध खऱ्या अर्थाने करण्यास अग्रेसर होईल. आजचा हा क्षण एक महत्वाचे पाउल आहे जो भारताचे खरे रूप समोर येण्यासाठी आज आपण टाकत आहोत.

आपल्या यशाची आणखी अनेक शिखरे वाट बघत आहेत. आपण आज इतके मजबूत आणि सक्षम आहोत की आपले भविष्य आपण संरक्षित करू शकतो. स्वतंत्रता आणि शासनाची जबाबदारी एकाच वेळी येते.

Jawaharlal Nehru Speech in Marathi

या स्वतंत्रतेच्या जन्माआधी सर्व देशवासीयांनी अपमान कष्ट आणि वेदना सहन केल्या आहेत.त्या केलेल्या बलीदानांचा आम्हाला अभिमान आहे सोबतच गर्व ही आहे.

त्या सर्व गोष्टीची आठवण झाल्यानंतर आपण सर्वांचे मन दुःखाने असहय्य होऊन  तडफते आहे.

काही जखमा आजही हिरव्या आहेत. परंतु  दुःखद भूतकाळ संपूर्ण आज उज्वल भविष्य आपल्या दारी आले आहे. जे आपणा सर्वांसाठी फार आशावादी आहे .

हे भविष्य आराम करण्यास आणि चैनीने बसून राहण्यासाठी नाही. आपण सर्वांना अथक परिश्रम करावे लागतील आपण जो उज्वल भविष्याचा प्रण घेतला आहे तो पूर्ण करण्यास आपणांस झटावे लागणार आहे.

लाखो करोडो भारतीयांची सेवा करणे म्हणजे पारतंत्र्यानी पिडीत लोकांची सेवा करण्यासारखेच आहे.

त्यामूळे गरिबी, अज्ञानता, आजारपण, आणि बेरोजगारीशी आपण सर्वांना लढायचे आहे.

सर्वत्र समानतेचे बीज अंकूरीत करायचे आहे. आपल्या पिढीच्या सर्व लोकांना या देशातील प्रत्येक पिडीत व्यक्तीच्या डोळयातून एक एक आसवांना पुसायचे आहे.

जोपर्यंत सर्वांचे दुःख दूर होत नाही तोवर चैनीत बसायचे नाही. तर आपल्या सर्व स्वप्नांना आपल्याला अथक प्रयत्नाने पूर्ण करण्यासाठी फार काम करावे लागेल.

जे स्वप्न आपल्या भारताचे आहे तेच स्वप्न या जगाचे सूध्दा आहे.

जगात स्वतःचा विकास करण्यासाठी जे राष्ट्र झटत आहेत त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे कारण ज्या समस्या त्यांच्या आपआपल्या देशात आहेत त्या सर्व जगातल्या मुख्य समस्या आहेत शांती ही एक महत्वाची शक्ती आहे, जी प्रत्येक राष्ट्राजवळ असावी,

आपल्या प्रयत्नाने आपल्या देशाची समृध्दी आहे तसेच विनाशही आपल्याच कर्माने मिळते.

या जगाला एकत्रच ठेवून आपल्याला एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हावे लागेल.

भारतीयांसाठी आपण सर्व प्रतिनिधी आहोत.

तर आपल्या सर्व अनुयायींसोबत आपणांस एक राहून या विशेष ध्येयप्राप्तीसाठी सिध्द व्हायचे आहे.

एकमेकांवर आलोचनात्मक टिका आणि व्देष करण्याची ही वेळ नाही.

मनात दुर्भावना ठेवून दुसऱ्यांना आरोप करण्याची ही वेळ नाही. आपण सर्वात महान भारताची निर्मिती करायची आहे. ज्यात विविधतेत एकता आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू भाषण

आज ठरवलेला दिवस येवू पाहात आहे ज्या पाहाटेची आपले पूर्वज वाट पाहात आलेले आहेत. हा दिवस भारताच्या भाग्याने आधिच ठरला होता.

विशाल संघर्ष आणि कष्टाच्या निद्रेनंतर एक बाल भारत आज आपल्या पायांवर उभा राहातो आहे.

याच्या पूढे सुंदर भविष्य आहे. जोडीला अमुल्य स्वतंत्र आणि जागृत इतिहास आहे त्यामूळे याची वाटचाल करतांना आपल्याला आपल्या सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.

आता एका नव्या इतिहासाचे पर्व आपणांस सुरू करायचे आहे.

त्यामुळे आपल्या इतिहासास न विसरता नविन विविध ध्येयांना पूर्ण करायचे आहे.

आपल्या इतिहासाच्या काही गोष्टी आजही आपल्या सोबत आहेत त्यामूळे त्यास आपल्याला सोबत घेवून जायचे आहे.

हा आजचा क्षण सर्व भारतीय संपूर्ण आशिया आणि तसेच सर्व जगासाठी अमूल्य मानण्यास हरकत नाही कारण भारत जगाचा एक महत्वाचा भाग असून आज भारताचे एक नवे पर्व येथून सूरू होत आहे.

या स्वातंत्र्याचा आनंद आपण नक्कीच घेवू. पण तो घेतांना आपल्या देशाच्या आकाशात जमा झालेल्या काळया ढगांबाबत आपणांस सचेत राहायचे आहे.

स्वातंत्र्यासोबत एक मोठी जवाबदारी आपल्या खांदयावर येवून ठेपली आहे.

अनुशासना सोबत राहून आपणांस हया समस्या दुर करायच्या आहेत. या दिवशी सर्व प्रथम या स्वातंत्र्याचे शिल्पकार आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीना मी मनस्वी नमन करतो.

ज्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी एक संग्राम घडविला.

भारतासाठी नाही तर जगासाठी एक गौरव स्थापीत केला. आपण त्यांच्या संदेशातून बरेचदा भटकतो आहे.

आजच्या पिढयाच नाहीतर पुढील सर्व पिढया त्यांच्या अतुल्य साहसाची आठवण ठेवतील.

Jawaharlal Nehru Marathi Speech

भारत या सपुताच्या अव्दितीय अशा पराक्रमास नमन करतो.

ज्याने आपल्या प्रयत्नाने सर्वांना विश्वास आणि शक्ति प्रदान केली.

आपण सर्व या स्वातंत्र्याची मशाल कधीच विझू देणार नाही.

मग कितीही जोराचा वारा असो वा मोठे वादळ असो आपण त्या अज्ञात स्वयंसेवकांचे आणि अमर सैनिकांना नमन करूया.

ज्यांनी कोणताही स्वार्थ न बाळगता आपले सर्वस्व देशाच्या उत्कर्षासाठी बलीदान केले.

आपण त्या महिलांचे अन् पुरूषांसाठी ही चिंतीत आहोत जे राजनितीच्या चक्रात पडून यातना सहन करत आहेत.

हे भविष्य आपल्याकडे बघत आहे.

ते फार आशादायी आहे त्यामुळे सर्व सामान्य व्यक्तींनी, शेतकर्यांच्या, श्रमिकांसाठी, लहान बालकांच्या सुंदर भविष्यासाठी आपण सर्वांना झटावे लागणार आहे.

त्यामुळे या देशातून गरिबी, अज्ञानता, आजारपण, आणि असमानतेशी आपणां सर्वांना लढावे लागणार आहे.

त्यामुळे स्वतःच्या कर्मांना सत्कर्मी बनवा.

एका समुध्द लोकतांत्रीक राष्ट्राच्या निर्मीतीसाठी आपण सर्वांना सामाजिक, आर्थिक, सामाजिक दृष्टया संपन्न संस्थांची निर्मिती करावी.

ज्याने सामान्य जनांच्या कुटूंबांचे रक्षण व विकासशील राष्ट्र म्हणून देशाची वाटचाल चांगल्या प्रकारे करण्यास मदत मिळेल.

आपल्या समोर समस्यांचे डोंगर आहेत. त्यामुळे राष्ट्राच्या विकासासाठी प्रत्येकास झटावे लागणार आहे.

थकुन चालणार नाही न थकता सतत लढत राहावे लागणार आहे. समस्यांचा बोजा कमी करण्यासाठी एकमेकांना साहाय्य करा.

भारत जगात आपले स्थान प्रथम पंक्तीत स्थापीत करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे.

कोणताही देश महान नसतो ज्याचे लोक कर्मात संकुचितपणा आणतात.

आपण जगातील लोकांसाठी शुभेच्छा देतो आहोत ज्यांच्या सोबत आपण सर्वांना सहयोग आणि शांती प्रस्थापित करायची आहे.

आपण त्यांच्या सोबत शांतीने स्वतंत्रता आणि लोकतंत्रासाठी पुढे जावू अशी प्रतिज्ञा घेत आहे,

आणि भारताचा प्राचीन, शाश्वत आणि नेहमी नव्या स्फूर्ति देणाऱ्या आपल्या अत्यंत प्रिय मातृभुमिस श्रध्देने नमन करतो.

आम्ही नव्या आशेने याची सेवा करण्याचा संकल्प घेत आहोत.

जय हिन्द !

तर हे होते भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे भाषण,

तर हे भाषण वाचून आपल्याला कसे वाटले आम्हाला कळवा,

कारण भाषण लिहायला बराच वेळ लागला तर यावर आपली प्रतिक्रिया कळवा, तसेच आवडल्यास याला शेयर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here