स्वप्नांची नगरी मुंबई विषयी काही न ऐकलेल्या गोष्टी.!

Interesting Facts about Mumbai

मुंबई ला कोण ओळखत नाही? पूर्ण जगविख्यात असणारे शहर म्हणजे मुंबई. भारताची आर्थिक राजधानी असणारे शहर म्हणजे मुंबई. तसेच संपूर्ण भारतात स्वप्नांची नगरी म्हणून ओळखण्यात येणारे शहर म्हणजे मुंबई. सात बेट एकत्र येऊन बनलेलं शहर म्हणजे मुंबई. ज्या शहरामध्ये दररोज हजारो लोक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या शहारामध्ये उतरतात. ह्या शहरात काम करून लाखो लोग आपली उपजीविका भागवतात. असे शहर म्हणजे मुंबई!

या शहराची जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच! काही अश्याही गोष्टी आहेत मुंबई मध्ये ज्या विषयी बरेच जणांना माहिती नाही.

तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत काही अश्या रोचक गोष्टी !

स्वप्नांची नगरी मुंबई विषयी काही न ऐकलेल्या गोष्टी.! – Interesting Facts about Mumbai

Interesting Facts about Mumbai
Interesting Facts about Mumbai

१) भारतातील पहिली रेल्वे मुंबई येथेच धावली.

१६ एप्रिल १८५३ हि ती तारीख आहे ज्या दिवशी भारतामध्ये रेल्वेचे पदार्पण झाले होते. भारतातील पहिली रेल्वे हि मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली होती. ह्या रेल्वेने धावलेले एकूण अंतर ३४ किलोमीटर होते. ह्या पहिल्यांदा धावलेल्या रेल्वे च्या मागे इंग्रजांचा मोलाचा वाटा आहे. तेव्हापासूनच पूर्ण भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झाली आणि पूर्ण भारतात रेल्वेचे जाळे पसरले.

२) वडापाव.

वडापाव हे जगातील सर्वात्तम स्नॅक म्हणून ओळखले जाते. आपण जर कधी मुंबई ला गेले असाल तर आपण वडापाव हे स्नॅक नक्की खाऊन बघितले असेलच.मुंबईच्या धावपळीच्या जीवनात वेळेला खूप महत्व आहे. तिथे अल्पोहार म्हणून बरेच जन वडापावच खातात. जगात वडापावला एवढी ख्याती मुंबई मुळेच लाभली आहे. आज विदेशात सुद्धा वडापावला खूप जास्त मागणी मुंबई मुळेच आली आहे. अश्या या वडापावचा जन्म मुंबई मधेच झाला आहे.

३) पारंपारिक उत्सव.

गणेश चतुर्थी हा पारंपारिक उत्सव मुंबई मध्ये एखादा सन म्हणून साजरा केल्या जातो. ज्यामध्ये लाखो मुंबईकर स्वतःला सहभागी करून घेतात. मुंबई मध्ये गणेश चतुर्थी च्या नऊ दिवसही उत्सवाचे वातावरण असते. गणेश चतुर्थी च्या उत्साहात ढोल ताशे यांच्या सोबत आनंदात मिरवणुका काढल्या जातात.

तसेच लाखो भाविक या मिरवणुकीत सहभागी होऊन या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटतात.ती मजा बघण्यासारखी असते. त्या मिरवणुकीत मुंबईतील सर्वात श्रीमंत, तसेच सर्वात उंच गणपती पाहायला मिळतात. आपण जर कधी गणेश चतुर्थी च्या वेळेला मुंबई ला गेले तर या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायाला विसरू नका.

४) भारतात सर्वात पहिली बसची सुविधा मुंबई येथेच.

१५ जुलाई १९२६ रोजी सर्वात पहिल्यांदा मुंबई ला बस ची सुविधा लाभली. पहिली बस हि अफगान चर्च आणि क्राफोर्ड मार्केट यांच्या मध्ये धावली. ह्या दोन ठिकाणांचे अंतर जवळजवळ 5.7 किलोमीटर एवढे येते.

तेव्हापासून आजपर्यंत त्या बस ला मुंबई मध्ये “BEST” च्या नावाने ओळखल्या जाते.  “BEST” चा फुल फॉर्म “Brihanmumbai Electric Supply & Transport” असा होतो. ज्यामध्ये दरवर्षी जवळजवळ ६,००,००० लोक प्रवास करतात.

५) पर्यटन स्थळे.

मुंबई मध्ये बरेच ठिकाणे असे आहेत ज्या ठिकाणांना लाखो लोक भेट देत असतात. फक्त भारतातून नव्हे तर विदेशातून सुद्धा बरेच पर्यटक मुंबई ला भेट देत असतात. भारतामध्ये मुंबई असे शहर आहे कि ज्या शहराला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

मुंबई मध्ये बरेच ठिकाण पाहण्यासारखे आहेत. ज्यामध्ये गेट वे ऑफ इंडिया ,मरीन लाईन, झु चौपाटी, इत्यादींचा समावेश आहे. आपण जर भविष्यात मुंबई ला गेलात तर ह्या ठीकानांना भेट द्यायला विसरू नका.

६) सात बेटांपासून बनलेलं शहर.

मुंबई हे शहर सात बेटांपासून बनलेलं शहर आहे. मुंबई ला समुद्रावरती बसलेलं शहर सुद्धा म्हणतात. माहीम, वरळी, परेळ, माझगाव, कुलाबा, छोटा कुलाबा, आणि बॉम्बे हि सात बेटे एकत्र येऊन मुंबई हे शहर बनले आहे.

मुंबई मधील हि सगळी बेटे इतिहासकालीन च आहेत. या सगळ्या बेटांचा उल्लेख मौर्यकालीन इतिहासामध्ये मिळतो. हे सात बेटे जेव्हा एकत्र आले ना तेव्हा जाऊन कुठे मुंबई ची निर्मिती झाली.

७) मुंबई चा जीव लोकल.

ज्याप्रमाणे शरीरात प्राण नसला तर आपले शरीर असून नसल्यासारखे असते. त्याचप्रमाणे लोकल हि मुंबई चा जीव कि प्राणच झाला आहे. लोकल मुळे मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कमी वेळ तर लागतोच त्यासोबतच खर्चहि कमीच लागतो.
नाहीतर जर तुम्ही मुंबई मध्ये बस ने प्रवास करायचे म्हटलं तर खूप जास्त खर्च होतो. बसच्या तुलनेत लोकल कधीही स्वस्त आहे. हीच ती मुंबई ची लोकल आहे जी प्रत्येक वर्षाला जवळजवळ २५ लाख लोकांना घेऊन प्रवास करते. जर एखाद्या दिवशी मुंबई ची लोकल बंद राहिली तर जवळपास अर्ध्या मुंबई चे काम ठप्प राहू शकते. पण श्यक्यतोवर असे होतच नाही.

८) मुंबईचे डबेवाले.

मुंबई चे डबेवाले हि मुंबईची एक विशिष्टता दर्शवणारी संघटना आहे. या संघटनेची सुरुवात १८९० मध्ये झाली होती. स्व. लक्ष्मण तळेकर यांनी या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेमुळे दिवसाला २ लाख लोकांना जेवण पुरविल्या जाते. तेही फक्त ३ तासात. आपल्याला जेवण पुरवण्यासाठी हि संघटना एका महिन्याला फक्त ६०० रुपये खर्च घेते. डबे पोहचवण्यासाठी लोकल तसेच सायकलकची मदत घेतल्या जाते. ५००० डबेवाले रोज मुंबईला डबे पुरवितात.

९) संजय गांधी उद्यान.

संजय गांधी उद्यान हे जगातील मोठ्या उद्यानांपैकी एक आहे. आणि हे उद्यान मुंबई च्या बोरीवली मध्ये उपस्थित आहे. या उद्यानात वाघांची संख्या बऱ्यापैकी आहे. तसेच इथे २००० वर्ष जुनी बौद्धकालीन गुफा सुद्धा आहे. सोबतच दोन लांब तळे सुद्धा आहेत.या उद्यानाला “राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान” असे नाव देण्यात आले आहे.

आशा करतो कि या लेखात आपल्याला मुंबई विषयी काही वेगळ पाहायला मिळाल असेल. आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here