महाराष्ट्रातील या ठिकाणांना आपण भेट दिली आहे का?

Best Places in Maharashtra

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा..

महाराष्ट्रा सारख्या पावन भूमीवर आपला जन्म झालेला आहे या पेक्षा अधिक भाग्याची गोष्ट कोणतीच नाही, कारण याच महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूर आणि संभाजी महाराजांसारखे पराक्रमी योद्धे जन्माला आले,

इतकेच नाही तर हि तीच भूमी आहे, ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आणि थोर कवियत्री बहिणाबाई चौधरी जन्माला आल्या.

या महान संतांनी आणि योध्यांनी घडवलाय हा महाराष्ट्र. याच महाराष्ट्रात पाहण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत, कि त्यांच्या विषयी माहिती झाल्यावर आपल्याला त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरणार नाही.

तर आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील काही निवळक ठिकाणे जिथे गेल्यावर आपल्याला एक वेगळी अनुभूती येते, आणि आपल्याला त्या ठिकाणावर परत परत जावे असे वाटते.

तर इथे आहेत महाराष्ट्रातील काही ठिकाण (Maharashtratil Paryatan Sthal)

महाराष्ट्रातील या ठिकाणांना आपण भेट दिली आहे का? – Maharashtratil Paryatan Sthal

Best Places In Maharashtra
Maharashtratil Paryatan Sthal

१) माथेरान – Matheran

सगळीकडे पसरलेली गवताची हिरवी चादर, जिकडे तिकडे धुक्यांचे साम्राज्य, घाटांचा रस्ता, किती मस्त ठिकाण आहे ना माथेरान?

माथेरान हे महाराष्ट्रातील छोटस थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण. निसर्गाचे अप्रतिम दर्शन आपल्याला येथे पाहायला मिळते, सोबतच येथील थंडगार वातावरण मनाला मोहून सोडते, आपणही कधी ना कधी या ठिकाणाला भेट दिलीच असणार ना.

दिली नसेलही तर जीवनात एकदा या ठिकाणी जाऊन येथील वातावरणाचा आनंद घ्यायला विसरू नका.

२) लोणावळाLonavala

उंचावरून पडणारा धबधबा, २ हजार फुटांच्या उंचीवर असलेल पुणे शहरातील एक ठिकाण ज्याला लोक लोणावळा म्हणून ओळखतात, या ठिकाणाला न ओळखणारी लोक खूप कमी असतील, कारण हे ठिकाणच एवढ आकर्षक आहे कि ते लोकांना येथे भेट देण्यास भाग पाडते.

येथे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला घाटाच्या रस्त्यातून प्रवास करून जावे लागते, पोहचल्यावर बरेचशे ठिकाण आहेत पाहण्यासारखे. मग त्यामध्ये टायगर पॉइंट, धबधबा, आणि तेथील बरेचशे वाटर पार्क.

जर आपणही या ठिकाणाला भेट दिली असेल तर आपला अनुभव आमच्या सोबत शेयर करा. आणि नसेल भेट दिली तर एक वेळ जा आणि भेट द्या. मज्जा येईल.

३) ताडोबा राष्ट्रीय उद्यान – Tadoba National Park

पक्षांचा किलकिलाट सोबतच वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज, खूप साऱ्या वाघोबांचे राहते घर म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा उद्यान. या उद्यानात आपल्याला जवळ जवळ जंगलातील सर्वच प्राणी पहायला मिळतात.

पिसारा फुलविणारा मोर असो कि वेगाने पळणारे हरीण, या सर्व प्राण्यांचे जवळून दर्शन या उद्यानात होते. आपल्याला जर जंगल सफारी करणे आवडत असेल तर आपण या उद्यानाला भेट देऊ शकता. जंगलातील प्राण्यांना आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहण्याचा अनुभव या उद्यानात येतो. प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी हे ठिकाण पाहण्याजोगे ठरते.

४) चिखलदरा – Chikhaldara

नागमोडी वळणाचे रस्ते, धुक्याने भरलेले वातावरण, उंचच्या उंच पवनचक्क्यांचा नजारा. धबधबे, आणि भव्य शिवमंदिराचे दर्शन करून देणारे विदर्भाचे नंदनवन म्हणजे चिखलदरा. अमरावती पासून अवघ्या अडीच ते तीन तासाचा रस्ता असलेले विदर्भातील थंड हवेच्या ठिकाणाला आपण भेट दिली असेल किंवा नसेलही.

पण जर आपण एकदा या ठिकाणाला भेट दिली तर आपण पुन्हा या ठिकाणाला भेट देण्यासाठी नक्की जाणार. थंड हवा थंड वातावरण असलेले हे नंदनवन आपल्याला निसर्ग सौंदर्याची भूल पाडून स्वतःकडे आकर्षित करते.

५) औरंगाबाद शहर – Aurangabad

या शहराची किमया बाकी शहरांपेक्षा थोडीशी वेगळीच आहे, पुरातन काळातील अनेक ठिकाणे, राजे महराजांचे किल्ले, सोबतच असलेल्या अंधेरी गुफा, दगडांवर काढलेले शिल्पकलेचे काम, दगडांवर काढलेले काही चित्रे आपल्याला ज्या शहरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात ते म्हणजे औरंगाबाद शहर.

याच औरंगाबाद शहरात आपल्याला बीबी का मकबरा नावाची वास्तू पाहायला मिळते, इतकच नाही तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्या आपल्याला याच शहराच्या नजीक पाहायला मिळतात. येथील वास्तुकलेचे आपण चाहते होणार अशी कित्येक वर्षापूर्वीच्या वास्तुकला आपल्याला येथे पाहायला मिळतात.

या जिल्ह्यात आपल्याला अनेक आकर्षक ठिकाणे पहायला मिळतील, जसे आपण औरंगाबाद जवळून दूर गेले असता आपल्याला बारा जोतिर्लिंगांपैकी एका जोतिर्लिंगाचे दर्शन होते, इतकेच नाही तर येथून दीड तासाच्या अंतरावर वेरूळची लेणी पाहायला मिळते, देवगिरी किल्ला सुद्धा आपल्याला याच जिल्ह्यात पहायला मिळतो,

मराठवाड्याची राजधानी असलेला हा जिल्हा बऱ्याच पर्यटन स्थळांनी भरलेला आहे. ऐतिहासिक गोष्टीची आवड ज्या व्यक्तीला असेल त्याने या जिल्ह्याला जीवनात एकवेळ तरी भेट द्यावी.

महाराष्ट्रात असे बरेचशे ठिकाणं आहेत त्यांचा विषयी या लेखात उल्लेख केला गेला नाही पण आपल्याला महाराष्ट्रातील नवनवीन ठिकाणां विषयी जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला कळवा आम्ही आपल्याला त्या ठिकाणांविषयी माहिती पोहोचवू.

वरील काही ठिकाणांपैकी आपण किती ठिकाणांना भेट दिली आहे ते सांगू शकता, सोबतच अशी आशा करतो कि आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here