प्रबोधनकार ठाकरे यांचे जीवनचरित्र

Prabodhankar Thackeray

ज्यांना आपण प्रबोधनकार ठाकरे या नावाने चांगल्या तऱ्हेने जाणतो त्यांचे पुर्ण नाव केशव सीताराम ठाकरे.

एका आयुष्यात किती स्थानी विराजमान व्हायचे याची सिमारेषा यांच्यासाठी नव्हतीच जणु!

एका व्यक्तिमत्वात किती कार्य लपलेली होती याची साधी गणती करू जाता त्यांची कित्येक कार्य डोळयासमोर उभी राहातात.

एक विचारवंत लेखक,पत्रकार, नेता, संपादक, प्रकाशक, धर्म सुधारक, वक्ता, इतिहास संशोधक, समाज सुधारक, आंदोलनकारी, सिनेमा पटकथा संवाद लेखक, नाटककार, संगीतज्ञ, अभिनेता, शिक्षक, लघु उद्योजक, भाषाविव्दान, छायाचित्रकार, चित्रकार, टायपिस्ट ही विशेषण त्यांना देऊन देखील त्यांच्या व्यक्तित्वाची उंची यापेक्षा देखील फार मोठी होती.

खजुराच्या झाडाप्रमाणे उंच होण्यापेक्षा वटवृक्षाप्रमाणे ते विस्तारत गेले. जणु एका व्यक्तिने १०० लोकांचे आयुष्य जगण्याचा पुरूषार्थ केला होता.

प्रबोधनकार ठाकरे यांचे जीवनचरित्र – Prabodhankar Thackeray Information in Marathi

Prabodhankar Thackeray in Marathi

प्रबोधनकार ठाकरे यांचा अल्पपरिचय – Prabodhankar Thackeray Information

नाव:  केशव सीताराम ठाकरे
जन्म:  १७ सप्टेंबर १८८५
जन्मस्थान: पनवेल जि. रायगड
मृत्यु: २० नोव्हेंबर १९७३ मुंबई

प्रबोधनकार ठाकरे व्यक्तिगत जीवन – Prabodhankar Thackeray Biography in Marathi

प्रबोधनकार ठाकरे महात्मा ज्योतिबा फुलेंना आपला आदर्श मानीत. कट्टर सनातन्यांनी ज्यावेळी महात्मा फुलेंचा पुण्यात छळ केला त्यानंतर त्यांचा लढा पुढे सुरू ठेवण्याकरताच प्रबोधनकार ठाकरे पुण्यात आले.

विरोधकांनी कार्यात आणलेले अडथळे दुर सारत त्यांनी साऱ्यांनाच धुळ चारली.

समाजात बदल होणे, त्यात सुधारणा करणे हेच जणु त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनले होते आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता त्यांनी कसलीही तडजोड केली नाही.

विधवांच्या केशवपनाची अमानुष रूढी, बालविवाह, मंदीरातल्या ब्राम्हणांची अरेरावी, अस्पृश्यतेचा प्रश्न, हुकुमशाही, हुंडाप्रथा, या सर्वांविरूध्द प्रबोधनकारांनी आवाज उठविला.

त्यांच्या ध्येयापासुन त्यांना परावृत्त करण्याचा देखील प्रयत्न केला गेला पण त्यांनी कश्यालाही दाद दिली नाही आणि त्यांचा मार्ग देखील त्यांनी कुणाकरता सुध्दा बदलला नाही. सर्वच आघाडयांवर ते त्वेषाने आणि नेटाने लढले. समाजातली अस्पृश्यता, हुंडाप्रथा, जातिव्यवस्था दुर सारण्याकरीता त्यांनी त्यांच्या ज्वलंत लेखणीचा देखील वापर केला.

About Prabodhankar Thackeray

त्यांच्या वक्र्तृत्वाने, लिखाणाने व प्रत्यक्ष कृतीव्दारे जुन्या विचारधारेशी ते लढले. प्रबोधनकारांनी ‘संत एकनाथांच्या’ जीवनावर आधारीत ‘खरा ब्राम्हण’ हे नाटक समाजासमोर प्रस्तुत करून सच्चा ब्राम्हण कसा असावा यावर प्रकाश टाकला. समाजाला कोणकोणत्या मार्गाने जागे करता येईल ते सर्व मार्ग त्यांनी त्याकरीता अवलंबण्यास सुरूवात केली होती. त्यांच्या या समाजप्रबोधनाच्या कार्याची ख्यातील राजर्षी शाहु महाराजांच्या कानापर्यंत पोहोचली होती.

शाहु महाराज देखील महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचे पुरस्कर्ते असल्यामुळे ते प्रबोधनकारांच्या संपर्कात आले.

त्यांनी प्रबोधनकारांची परिक्षा देखील घेतली आणि समाधानी होऊन ते बोलले ‘लाच घेऊन त्या लाचेला बळी पडणार नाही आणि त्याला विकत देखील घेता येणार नाही असा एकमेव माणुस मी पाहिला आहे तो म्हणजे प्रबोधनकार!

ज्यावेळी प्रबोधनकार मुंबईला स्थायीक झाले त्या सुमारास त्यांनी हुंडाविरोधी प्रथेचा तिरस्कार केला.

या करीता एक जनआंदोलन उभे केले एवढेच नव्हें तर ज्या ज्या पित्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात हुंडा दिला होता त्यांना तो हुंडा परत करावयास भाग पाडले.

कर्मठ रूढी परंपरा असलेल्या त्या काळात हे करणे आज वाटते तेवढे सोपे मुळीच नव्हते २० व्या शतकातल्या त्या परंपरांची आज आपण केवळ कल्पनाच करू शकतो.

परंतु प्रबोधनकार त्या सर्व रूढी परंपरांविरूध्द उभे राहिले आणि आपल्या मार्गाने लढले देखील. प्रबोधनकार ठाकरे हे एक उत्तम लेखक तर होतेच शिवाय पत्रकार आणि इतिहास संशोधक सुध्दा होते.

‘सारथी’ ‘लोकहितवादी’ ‘प्रबोधन’ यांसारख्या नियतकालीकांच्या व्दारे प्रबोधनकारांनी जनसामान्यांपर्यंत नव्या विचारांना पोहोचविले.

प्रबोधनकारांची साहित्यसंपदा – Literature Of  Prabodhankar Thackeray 

भिक्षुकशाहीचे बंड, ग्रामधान्याचा इतिहास, कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, कुमारीकांचे शाप, देवांचा धर्म की धर्माची देवळे. वक्र्तृत्वशास्त्र, प्रबोधनकारानी लिहीलेली आत्मचरित्रे, समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, पंडिता रमाबाई, रंगो बापुजी, माझी जीवनगाथा. प्रबोधनकारांची ‘खरा ब्राम्हण’ आणि ‘टाकलेले पोर’ ही नाटकं समाजाच्या डोळयांमधे झणझणीत अंजन घालणारी आणि समाजाच्या सुधारणेकरता क्रांतीकारक ठरलीत.

त्यांच्या आयुष्यातील महत्वाची लढाई म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ!

कारण त्या दरम्यान त्यांचे बरेच वय देखील झाले होते

आणि वार्धक्यामुळे प्रकृतीच्या बऱ्याच मर्यादा आल्या असतांना देखील प्रबोधनकारांनी या चळवळीचे नेर्तृत्व केले.

एवढेच नव्हें तर त्यांना या दरम्यान काही काळ तुरूंगवास देखील भोगावा लागला.

कुशल संघटक असल्याने अनेक विचारांच्या व्यक्तिमत्वांना या चळवळीदरम्यान एकत्र बांधुन ठेवण्यात ते यशस्वी देखील झालेत.

प्रबोधनकार ठाकरे हे श्रीकांत ठाकरे आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे वडिल होते.

तर हि होती संपूर्ण माहिती प्रबोधनकार ठाकरे यांची हा लेख आवडल्यास आपला अभिप्राय देण्यास विसरू नका,

कारण आपला अभिप्राय हा आमच्याकरता मौल्यवान आहे. 

धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here