देशाच्या राष्ट्रगीताचे “‘जन गन मन'” चे रचनाकार…… रवींद्रनाथ टागोर यांचे जीवन

Rabindranath Tagore Mahiti Marathi

प्रत्येकाच्या हृदयात आपला अमिट ठसा उमटविणाऱ्या रवींद्रनाथ टागोर यांचा परिचय आपल्या देशातील सर्वांनाच आहे. एक महान कवीच्या रुपात त्यांची ख्याती संपूर्ण विश्वात पसरली आहे. रवींद्रनाथ टागोर केवळ कवी नव्हते तर थोर साहित्यिक, कथाकार, गीतकार, संगीतकार, नाटककार, निबंधकार, चित्रकार, थोर विचारक, आणि मार्गदर्शक देखील होते. ते विलक्षण प्रतिभेचे धनी होते, त्यांना गुरुदेव संबोधण्यात येत असे.

भारताचं राष्ट्रगान हे आपल्याला रवींद्रनाथ टागोरांचं देणं आहे. बालपणापासून कविता, गोष्टी, लिहिण्याची त्यांना विलक्षण आवड होती. निसर्गाविषयी प्रचंड ओढ होती, कित्येकदा निसर्गाचे अवलोकन करतांना ते इतके तल्लीन होऊन जात व आपल्या कल्पना विश्वात रममाण होत असत. भारताच्या या महान साहित्यिकाने स्वातंत्र्य समरात राष्ट्रीय चेतनेला आकार देण्यात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली.

1913 साली रवींद्रनाथ टागोर यांना आपल्या ‘गीतांजली’ या काव्य संग्रहासाठी साहित्यातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारे एशियातील ते पहिले व्यक्ती ठरले. पश्चिमी संस्कृतीचा भारताला परिचय आणि भारताची सर्वोत्कृष्ट प्रतिमा पश्चिमी देशांपुढे मांडण्यात टागोरांचा मोठा वाटा आहे. त्यांना भारतातील असामान्य सृजनशील कलाकार देखील मानल्या जातं.

आज या लेखात आपण थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्म, शिक्षण, त्यांच्या रचना, त्यांच्या हातून घडलेली महत्वपूर्ण कार्य, आणि जीवनाविषयी जाणून घेऊया. त्यांच्या व्यक्तीमत्वातून जर प्रत्येकाने  प्रेरणा घेतली आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालण्याचा दृढनिर्धार केला तर आपल्या जीवनात निश्चित यश प्राप्त करू शकू.

 रवींद्रनाथ टागोर यांचा जीवनपरिचय – Rabindranath Tagore Information in Marathi

Rabindranath Tagore Information in Marathi
Rabindranath Tagore Information in Marathi

रवींद्रनाथ टागोर यांच्या अल्पपरिचय – Rabindranath Tagore Biography in Marathi

नांव (Name) रवींद्रनाथ टागोर
जन्म (Birthday) 7 मे 1861 कोलकाता येथील जोडासाको मधील ठाकूरबाडी
वडील (Father Name) श्री देवेंद्रनाथ टागोर
आई (Mother Name) श्रीमती शारदादेवी
पत्नी (Wife Name) मृणालिनी देवी
धर्म (Religion) हिंदू
राष्ट्रीयता (Nationality) भारतीय
भाषा (Language) बंगाली, इंग्लिश
उपाधी (Occupation) लेखक आणि चित्रकार
प्रमुख रचना (Notable works)  गीतांजली
पुरस्कार (Awards) नोबेल पुरस्कार
मृत्यू (Death) 7 ऑगस्ट 1941

रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी सविस्तर माहिती – Rabindranath Tagore History in Marathi

थोर विचारक आणि मार्गदर्शक रवींद्रनाथ टागोर विलक्षण प्रतिभेचे धनी होते. कोलकाता येथील ठाकुरवाडीत एका प्रसिद्ध आणि समृद्ध कुटुंबात 7 मे 1861 ला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर ब्रम्हा समाजाचे वरिष्ठ नेता होते. 

कुटुंब प्रमुख आणि रवींद्रनाथ यांचे वडील अत्यंत प्रामाणिक आणि चांगल्या तऱ्हेने सामाजिक जीवन जगणारे व्यक्तिमत्व होते. त्यांची आई शारदादेवी ह्या  गृहिणी होत्या. रवींद्रनाथ टागोर हे आपल्या आई-वडिलांचे सर्वात धाकटे सुपुत्र होते.

रवींद्रनाथ टागोर यांचे शिक्षण – Rabindranath Tagore Education

रवींद्रनाथ टागोर बालपणापासून बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हे घरीच झाले आणि पुढचं शिक्षण त्यांनी कोलकाता येथील प्रसिद्ध सेंट जेवियर शाळेतून पूर्ण केलं. त्यांचे वडील थोर समाजसेवक होते आणि सतत समाजकार्यात मग्न असत. आपले चिरंजीव रवींद्रनाथ यांना बैरिस्टर बनविण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी रवींद्रनाथ यांना कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडन येथील विश्वविद्यालयात पाठवलं.

पण रवींद्रनाथ टागोर यांना सुरुवातीपासून साहित्याची आवड असल्याने पदवी न मिळवताच ते भारतात परतले. बालपणापासून रवींद्रनाथांना गोष्टी, कविता लिहिण्याची आवड होती अर्थात  मनातल्या भावनांना कागदावर उतरवणं त्यांना खूप आवडायचं. त्यामुळे साहित्य प्रतिभा त्यांच्यात फार लवकरच विकसित झाली. त्यामुळे एक महान कवी, विचारक, आणि लेखक म्हणून त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं.

रवींद्रनाथांचं साहित्यातील योगदान आणि त्यांच्या रचना – Rabindranath Tagore Books

बालपणापासून साहित्याकडे कल असल्याने ते एक महान कवी आणि प्रसिद्ध साहित्यकार म्हणून उदयाला आले. फार कमी वयात त्यांना साहित्याची उत्तम  समज आली होती. वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी त्यांनी आपली पहिली कविता लिहिली आणि जेंव्हा ते 16 वर्षांचे होते त्यावेळी 1877 साली त्यांनी लघुकथा लिहिली होती.

रवींद्रनाथांनी जवळ-जवळ 2 हजार 230 गीतरचना केल्या शिवाय भारतीय संस्कृतीत विशेषतः बंगाली साहित्यात आपलं अमुल्य योगदान दिलं. साहित्यातील आपल्या अतुलनीय योगदाना करता 1913 साली त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. रवींद्रनाथ यांच्या रचनांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नव्या गद्य आणि छंदा समवेत आपल्या कवितांमध्ये लोकभाषांचा चांगला उपयोग केला. रचना अत्यंत साध्या सरळ सोप्या असल्याने रसिकांना फार आवडल्या.

1880 साली रवींद्रनाथ टागोरांच्या अनेक रचना प्रकाशित झाल्या, पुढे 1890  मधे त्यांची मानसी ही रचना प्रकाशित झाली. त्यांच्या या रचनेतून त्यांच्यातील विलक्षण प्रतिभा आणि परिपक्वतेचा सर्वांना परिचय झाला. अवघ्या विश्वातील ते एकमेव असे साहित्यिक आहेत की ज्यांच्या दोन रचना दोन देशांच्या राष्ट्रगान झाल्या.

भारताचे राष्ट्रगान ‘जन गन मन‘ आणि बांगलादेशाचे राष्ट्रीय गान ‘आमार सोनार बांग्ला’ या गुरुदेव यांच्या रचना आहेत. या व्यतिरिक्त गुरुदेव रवींद्रनाथ यांची सर्वात लोकप्रिय रचना ‘गीतांजली’ होती . या करता त्यांना नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. गीतांजली या रचनेची लोकप्रियता एवढी वाढली होती की पुढे त्याचे इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी, रूसी, याशिवाय जगातील सगळ्या प्रमुख भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला. त्यामुळे रवींद्रनाथांची ख्याती संपूर्ण विश्वात पसरली आणि सर्वदूर ते प्रसिद्ध झाले.

त्यांच्या कथांमध्ये काबुलीवाला, मास्टर साहब, आणि पोस्टमास्टर खूप प्रसिद्ध झाल्या. लोक आज देखील या कथा मोठ्या उत्साहाने वाचतांना पहायला मिळतात. रवींद्रनाथ टागोर हे एक अनुभवी आणि उत्तम चित्रकार देखील होते. त्यांच्या चित्रकलेचा प्रकार फार अद्भुत असं होता, त्यांच्या चित्रकलेतून त्यांचे महान विचार प्रगट होत असत.

शांतीनिकेतनची स्थापना – Shantiniketan Established

निसर्गाप्रती अत्यंत प्रेम असणाऱ्या रवीन्द्रनाथांनी 1901 साली पश्चिम बंगाल मधील ग्रामीण क्षेत्रात असलेल्या शांतीनिकेतन मधे प्रायोगिक स्वरुपात एक शाळा सुरु केली. याठिकाणी त्यांनी भारतातील आणि पश्चिमी संस्कृतीला एकत्र आणण्याचा अद्भुत प्रयत्न केला. विद्यार्थी निसर्गाच्या सान्निध्यात शिकावा, त्याला शिकण्याकरता चांगलं वातावरण मिळावं ही रविन्द्रनाथांची इच्छा होती. पुढे रवींद्रनाथ त्या शाळेत वास्तव्य देखील करू लागले. 1921 साली शांतीनिकेतन विश्व भारती विद्यालय झाले.

रवींद्रनाथ टागोर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान – Rabindranath Tagore Awards

भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार आणि महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या जीवनात अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आलंय.

त्यांच्या गीतांजली या रचनेकरता 1913 साली त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. रवींद्रनाथ टागोर यांनी भारत आणि बांग्लादेशाचे राष्ट्रगान लिहिले,

त्यामुळे त्यांची ख्याती संपूर्ण जगभर पसरली आहे आणि आज देखील यासाठी त्यांचं स्मरण केलं जातं.

रवींद्रनाथ टागोरांचा मृत्यू – Rabindranath Tagore Death

आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये गुरूदेवांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना शांतीनिकेतन मधून कोलकाता येथे नेण्यात आलं.

याठिकाणी 7 ऑगस्ट 1941 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आपल्या व्यक्तिमत्वातील प्रकाशाने रवीन्द्रनाथांनी सर्वदूर चैतन्य निर्माण केलं  ते भारताची अनमोल संपत्ती होते,

साहित्यातील प्रत्येक शाखेत आज त्यांची रचना आपल्याला पाहायला मिळते.

एक कवी, लेखक, आणि नेता म्हणून त्यांची व्याख्या शब्दात करणं शक्य होणार नाही.

साहित्यातील योगदानामुळे त्याचं कायम स्मरण केलं जातं. रविंद्रनाथांना माझी मराठीचा आदरपूर्वक प्रणाम…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top