भारतीय राजकारणात नवा अध्याय लिहिणाऱ्या नरेंद्र मोदींची जीवनगाथा

Narendra Modi chi Mahiti

नरेंद्र दामोदरदास मोदी भारतीय राजकारणातील तो चेहरा आहे ज्यांनी अवघ्या काही वर्षांमध्ये देशातील राजकारणाची अवघी परिभाषाच बदलून टाकली. त्यांच्या राजकीय रणनीती पुढे सारा विपक्ष धारातीर्थी पडला शिवाय जगापुढे ग्लोबल लीडर म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यात देखील ते यशस्वी झाले. यामुळेच आज जनता मोदींकडे एका नायकाच्या रूपाने पहाते आहे केवळ मोदीच असे राजकीय नेता आहेत ज्यांना विदेशात देखील मोठ्या प्रमाणात सन्मान दिला जातो.

वैश्विकस्तरावर नरेंद्र मोदींनी संबंध उत्तम रीतीने जोपासले आहेत आणि मैत्री देखील सांभाळलीये. त्यामुळे संपूर्ण जग त्यांच्या कुटनीतीची प्रशंसा करतांना थकत नाही. आज जरी मोदिजिंनी आकाशाला गवसणी घातलीये तरीसुद्धा त्यांचे पाय कायम जमिनीवर स्थिरावलेले आहेत. समाजातील निम्न स्तरात राहणाऱ्या गरीब कुटुंबीयांच्या आयुष्यात आनंद आणण्याकरता ते सतत प्रयत्नशील असतात.

केंद्र सरकारच्या उज्वला योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या योजनांचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांच्या आणि मुलींच्या जीवनाचा स्तर उंचावणे हाच आहे मोदिजींचे प्रत्येक पाऊल राष्ट्रपिता महात्मा गांधीजीनी दाखविलेल्या मार्गावरून जात एक उज्वल भारत बनविणे आहे. भारताच्या सगळ्यात शक्तिशाली आणि प्रभावशाली राजकीय नेते नरेंद्र दामोदरदास मोदींबद्दल या लेखातून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

 नरेंद्र मोदी यांच्या विषयी रोचक माहिती – Narendra Modi Information in Marathi

Narendra Modi Information in Marathi   नरेंद्र मोदी यांचा अल्प परिचय – Narendra Modi Biography in Marathi

संपूर्ण नाव (Name) नरेंद्र दामोदरदास मोदी
जन्म (Birthday) 17 सप्टेंबर 1950 वडनगर, गुजरात
वडील (Father Name) दामोदरदास मुलचंद मोदी
आई (Mother Name) हीराबेन मोदी
विवाह (Wife Name)

जसोदा बेन चिमनलाल मोदी, शिक्षिका

(आपल्या पत्नीसमवेत ते राहात नाहीत.

विवाहापश्चात सामंजस्य राखत ते वेगळे झाले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांनी स्वतःला सहभागी करून घेतलं)

शिक्षण (Education) राज्यशास्त्रात बीए आणि एमए

अत्यंत संघर्षपूर्ण आणि गरिबीत गेले नरेंद्र मोदींचे बालपण.. चहा विकून काढले दिवस – Narendra Modi Life Story

भारतातील सर्वात सशक्त आणि प्रभावशाली नेत्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या नरेंद्र मोदींचा जन्म गुजरात मधील महसाणा जिल्ह्यातील वडनगर या लहानश्या गावी झाला.

पूर्वी वडनगर बॉम्बे स्टेट मध्ये येत असे. त्यांच्या आईचे नाव हीराबेन आणि वडिलांचे नाव दामोदरदास मुलचंद असे आहे. लहानपणी मोदींना नरीया म्हणून हाक मारल्या जाई.

त्यांचे वडील चहा विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असत. नरेंद्र मोदींनी देखील आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवत आपल्या वडील आणि भावंडांसमवेत रेल्वे स्टेशन वर चहा विकून कुटुंबाला हातभार लावला.

लहानपणी आलेल्या अनंत अडचणी आणि कठीण संघर्षा पश्चात देखील मोदीजी कधी निराश झाले नाहीत.

एका महापुरुषाप्रमाणे आपल्या दृढनिश्चयाने कर्तव्य पथावर ते पुढे जात राहीले. आणि म्हणूनच त्यांची गणना आज जगातील सर्वात शक्तिशाली पुरुषांमध्ये करण्यात येते व आज प्रधानमंत्री होऊन आपल्या सकारात्मक दृष्टीकोनाने भारताचे ते प्रतिनिधित्व करतायेत.

लग्नानंतर काही वर्षांमध्येच घेतला सन्यास…घर देखील त्यागले – Narendra Modi Marriage

मोधघांची या आर्थिक कमकुवत परिवारात जन्माला आलेले नरेंद्र मोदी आपल्या आई-वडिलांचे तिसरे अपत्य. लहान वयातच त्यांचा विवाह जशोदाबेन यांच्यासमवेत करून देण्यात आला.

त्या वेळी मोदींनी नुकतेच उच्चमाध्यमिक शालेय जीवन पूर्ण केले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या विवाहाला अस्वीकृती दर्शवली.

पुढे काही वर्षांनी मोदींनी गृहत्याग केला व ज्ञानाच्या शोधात भारतातील विविध भागांची त्यांनी भ्रमंती केली.

जशोदाबेन पूर्वी सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, आता त्या निवृत्त झाल्या आहेत. काही रिपोर्ट्स नुसार मोदींचा विवाह झाला होता परंतु ते दोघे कधीही सोबत राहीले नाहीत.

सैनिकी शाळेत शिकण्याचे स्वप्नं आर्थिक परिस्थितीमुळे राहीले अपूर्ण – Narendra Modi Education

बालपणापासून नरेंद्र मोदी हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि प्रतिभावान व्यक्ती आहेत  लहानपणापासून त्यांना लिहिण्या-वाचण्याची खूप आवड. सुरुवातीपासून स्वामी विवेकानंदाना ते आपला आदर्श मानत आले आहेत आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत आले आहेत.

अगदी लहानग्या वयापासून त्यांच्यात देशभक्ती ओतप्रोत भरली होती. आणि म्हणून आर्मी शाळेत शिक्षण घेऊन त्यांना इंडियन आर्मीत प्रवेश घेण्याची तीव्र ईच्छा होती आणि त्याकरता त्यांनी भरपूर प्रयत्न देखील केलेत.

परंतु आर्थिक परिस्थिती त्यांच्या स्वप्नांच्या आड आली आणि आर्मी स्कूल मधे शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्नं अपूर्ण राहीले. गुजरात मधील वडनगर ला आपले प्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यांच्या वक्तृत्व कलेचं कौतुक सुरुवातीपासूनच केलं जातं.

आपल्या वक्तृत्वाने प्रत्येकाचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यात ते वाकबगार आहेतदिल्ली विद्यापीठातून मोदींनी राज्यशास्त्रात बी.ए ची पदवी मिळविली आणि त्यानंतर 1980 साली अहमदाबाद येथून गुजरात विश्वविद्यालयातून राज्यशास्त्रात एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून (RSS) झाली नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात – Narendra Modi in RSS

अगदी सुरुवातीपासूनच नरेंद्र मोदींमध्ये राष्ट्रप्रेमाची आणि देशभक्तीची भावना रुजलेली होती, आणि म्हणून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रचारक म्हणून हिंदू राष्ट्रवादी राजकीय संघासमवेत अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) ते जोडल्या गेले.

पुढे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशातील वेग-वेगळ्या प्रांतांमध्ये संघाची महत्वपूर्ण जवाबदारी सांभाळली.

1975-1977 मध्ये जेंव्हा माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी देशभरात आणीबाणी लागू केली होती त्या दरम्यान RSS वर देखील निर्बंध लावण्यात आले. त्यावेळी नरेंद्र मोदींना अटक होण्यापासून वाचण्यासाठी वेश बदलून यात्रा करावी लागत असे.

मोदींनी त्यावेळी देशात आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाचा प्रखर विरोध देखील केला होता. त्यानंतर मोदींना स्वयंसेवक संघा तर्फे भारतीय जनता पक्षात सहभागी होण्यासाठी देखील पाठवण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची राजकीय कारकीर्द – Narendra Modi Political Career

1987 मध्ये भारतीय जनता पक्षात सहभागी झाल्यानंतर पक्षाचा जनाधार मजबूत करण्याकरता नरेंद्र मोदींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय भाजप ला आपल्या कौशल्यपूर्ण रणनीतीने यशाच्या नव्या उंचीवर पोहोचवले आणि नंतर भाजप तर्फे निवडणूक लढवून स्वतः देशाच्या प्रधानमंत्री पदावर विराजमान झाले.

भारतीय जनता पक्षात सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदा मोदींनी अहमदाबाद येथे झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप च्या अभियानाला तीव्र करण्याकरता सक्रीय सहभाग घेतला, यात भारतीय जनता पक्षाचा विजय झाला.

या दरम्यान मोदींनी आपल्या कुशल रणनीतीच्या आधारावर लहान सरकारी उद्योगांच्या खाजगीकरणाला प्रोत्साहन दिले.

पुढे 1988 साली पक्षाला मोदींच्या कौशल्याचा अंदाज आल्याने त्यांना गुजरात ब्रांच च्या आयोजक सचिव पदावर नियुक्त केले. 1990 मध्ये मोदींनी भाजप चे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या अयोध्या रथ यात्रेच्या संचलनात आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करून सक्रीय सहभाग नोंदवला आणि संयुक्त सरकार बनविले.

येथूनच पक्षाचे लक्ष त्यांनी स्वतःकडे आकर्षित केले.या दरम्यान भारतीय जनता पक्षाला मोदींच्या अद्भुत कार्य क्षमतेची जाणीव झाली होती.

त्यानंतर 1991-1992 साली जेंव्हा भाजप चे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची एकता यात्रा निघाली त्या सुमारास पक्षाला बळकटी प्रदान करण्यात नरेंद्र मोदींनी महत्वपूर्ण योगदान दिले.

पुढे मोदींचे महत्व पक्षात दिवसेंदिवस वाढत गेले. 1995 मध्ये गुजरात येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप च्या 121 जागा निवडून आल्याने सत्ता त्यांच्या हाती आली.

या दरम्यान शंकरलाल वाघेला आणि मोदींमध्ये मतभेद झाल्यामुळे शंकरलाल वाघेलांनी पक्षाचा राजीनामा दिला, नंतर गुजरात च्या केशुभाई पटेल यांना गुजरात चे मुख्यमंत्री बनविण्यात आले आणि नरेंद्र मोदींना हिमाचल प्रदेश आणि हरियाणा पार्टीची धुरा सांभाळण्या करता राष्ट्रीय सचिव पदाची जवाबदारी सोपविण्यात आली.

नव्याने मिळालेल्या या जवाबदारीला पूर्णतः प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने पार पाडण्यासाठी त्यांनी आपला मोर्चा दिल्लीकडे वळविला व येथे देखील कुशल रणनीतीने व कार्यक्षमतेने प्रत्येकाला प्रभावित केले.

पुढे 1998 ला मोदींना भाजप पक्षाचा महासचिव नियुक्त केल्या गेले, या पदावर असतांना सुद्धा मोदींनी आपली जवाबदारी खूप चांगल्या तऱ्हेने निभावली. या पदावर विराजमान असतांना वेग-वेगळ्या राज्यातील पक्ष संघटन मजबूत करण्याचे कार्य केले.

गुजरात च्या मुख्यमंत्री पदावर पीएम मोदी – Narendra Modi as Gujrat CM

2001 मध्ये ज्यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची धुरा केशुभाई पटेल सांभाळत होते त्या दरम्यान त्यांचे स्वास्थ्य नीट राहात नसल्याने त्याचा परिणाम तेथे झालेल्या निवडणुकांवर पडला. या निवडणुकीत पक्षाच्या कमकुवत संचालनामुळे भाजप पक्षाला प्रदेशातील अनेक विधानसभा जागा हातच्या गमवाव्या लागल्या.

त्यानंतर गुजरात मधे भाजप ची स्थिती मजबूत करण्याकरता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप च्या मुख्यमंत्री पदासाठी नरेंद्र मोदींच्या रुपात एका नव्या आणि सशक्त उमेदवाराची निवड केली आणि मोदींना मुख्यमंत्री पदाची जवाबदारी सोपविली.

परंतु त्या दरम्यान मोदींना राजकारणाचा तितकासा अनुभव नव्हता त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी त्यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जवाबदारी देण्याचा विचार करत होती आणि मोदींवर पूर्णपणे मुख्यमंत्री पदाचा भार सोपविण्याच्या मतात नव्हती.

परंतु मोदींनी उपमुख्यमंत्री होण्याकरता पूर्णतः हे सांगून नकार दिला की जर मी गुजरात ची जवाबदारी घेईल तर पूर्णपणे घेईल अन्यथा अश्या तऱ्हेने सत्तेवर शासन करण्याची आपली अजिबात इच्छा नाही.

7 ऑक्टोबर 2001 साली नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या नशिबाने त्यांची साथ कधीही सोडली नाही व त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.

पहिल्यांदा त्यांनी राजकोट च्या दुसऱ्या निर्वाचन क्षेत्रासाठी निवडणूक लढली आणि यानिवडणुकीत त्यांनी कॉंग्रेस चे उमेदवार अश्विन मेहतांना 14 हजार 728 मतांनी पराभूत केले आणि मग ते गुजरात च्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. या पदावर असतांना मोदींनी गुजरात चा अभूतपूर्व विकास घडवून आणला आणि ते जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होत गेले.

उपनिवडणुकां जिंकल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी मोदींचे नाव 2002 साली गुजरात येथे झालेल्या गोध्रा हत्याकांडाशी ( Godhra Kand ) जोडल्या गेले.

त्यांच्यावर गुजरात मधील सांप्रदायिक दंगल भडकवण्याचे आरोप लावण्यात आले. या आरोपांमुळे अन्य पक्षाच्या आणि कॉंग्रेस च्या वाढत्या दबावामुळे मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

परिणामी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ हा औटघटकेचा ठरला.

त्यानंतर चौकशी समितीच्या तपासानंतर मोदींवरील सगळे आरोप निराधार ठरविण्यात आले आणि या प्रकरणात न्यायालयाने देखील त्यांना निरपराध ठरविले. तेंव्हा पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना त्यांच्या गृहराज्य गुजरातचे मुख्यमंत्री बनविण्यात आले.

About Narendra Modi

आपल्या या कार्यकाळात मोदींनी गुजरातचा पूर्णतः कायापालट केला. गुजरात ला आपल्या स्वप्नातील राज्य बनविण्यासाठी त्यांनी अपार प्रयत्न केले आणि तळागाळापर्यंत सर्व सुविधा पोहोचविण्याच्या उद्देशाने अनेक विकास कामं केलीत.

गुजरात मधील प्रत्येक गाव-कस्ब्यापर्यंत वीज पोहोचविली, गुजरात पर्यटनाला नवी दिशा दिली, इतकेच नव्हे तर पाण्याच्या समस्येने त्रासलेल्या प्रदेशातील लोकांची समस्या कायमची निकाली लावली.

सर्व नद्यांना एकमेकींशी जोडणारे भारतातील गुजरात हे पहिले राज्य ठरले. मोदींनी या दरम्यान गुजरात मध्ये टेक्नोलॉजी आणि आर्थिक पार्क्स ची देखील निर्मिती केली.

इतकेच नव्हे तर गुजरात मधील आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या द्वितीय कार्यकाळात मोदींनी वाईब्रेंट गुजरात शिखर संमेलनात गुजरात येथे अरबो रुपयांच्या रियल स्टेट मध्ये गुंतवणुक करारावर हस्ताक्षर केलेत.

एकीकडे 2007 साली गुजरात च्या राजकीय इतिहासात सर्वाधिक काळापर्यंत सेवा प्रदान करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले. गुजरात करता नरेंद्र मोदींनी केलेल्या विकास कामांमुळे ते जनतेच्या नजरेत भरले होते आणि त्यांचे सर्वात आवडते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय झाले होते.

2007 साली गुजरात मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी पुन्हा विजयश्री प्राप्त केली आणि सलग तिसऱ्यांदा गुजरात चे मुख्यमंत्री झाले.

आपल्या मुख्यमंत्री पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात प्रदेशाच्या आर्थिक विकासावर आणि खाजगीकरणावर  विशेष भर दिला. या दरम्यान गुजरात राज्यातील कृषी क्षेत्रातील स्थितीत देखील अभूतपूर्व सुधारणा झाली.

इतकेच नव्हे तर गुजरात मधे महाद्विपातील सर्वात मोठ्या सोलर सिस्टम ची निर्मिती करण्यात आली. अश्या तऱ्हेने गुजरात प्रत्येक क्षेत्रात भारताच्या अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक विकसनशील राज्य झाले.

याशिवाय मोदींनी गुजरात मधे शांतता आणि सदभाव प्रस्थापित होण्यासाठी ग्रामीण क्षेत्रात 2011-2012 ला सदभावना/गुडविल मिशन ची सुरुवात केली.

पुढे 2012 ला गुजरात राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र दामोदरदास मोदींनी 182 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आणि सलग चौथ्यांदा प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. 

नरेंद्र मोदींनी आपल्या या कार्यकाळात देखील एक आदर्श सीएम म्हणून प्रदेशातील विकासाच्या प्रत्येक बाबीवर लक्ष देऊन कठीण समस्यांशी सामना करणाऱ्या गुजरात ला जगातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वश्रेष्ठ आणि आयडियल राज्य बनविले आणि सक्षम शासकाच्या रूपाने स्वतःची ओळख विकसित केली.

मोदींचा मुख्यमंत्री ते प्रधानमंत्री पदापर्यंतचा रोमांचक प्रवास – Narendra Modi as a Prime Minister

2014 सालच्या निवडणुकीत पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला मिळाले पूर्ण बहुमत:

गुजरात येथे सलग 4 वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर नरेंद्र मोदींची जादू लोकांच्यात अक्षरशः भिनलेली पाहायला मिळत होती. त्यांच्या लोकप्रियतेला बघता भाजप च्या वरिष्ठ नेत्यांनी नरेंद्र मोदींवर पक्षाच्या अध्यक्ष पदाची जवाबदारी सोपविली, आणि अश्या तऱ्हेने 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जाऊ लागले.

खरंतर त्या दरम्यान लालकृष्ण आडवाणी सहीत पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी मोदींच्या पीएम उमेदवारीवर असहमती दर्शविली होती, पण मोदींनी त्या दरम्यान वडोदरा आणि वाराणसी च्या दोन्ही जागांवर विजय प्राप्त करून पुन्हा एकवार सिद्ध केले की पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी ते एक चांगला पर्याय आहेत.

या नंतर मोदींनी देशातील जनतेच्या मनातील बरेच मुद्दे घेऊन 15 सप्टेंबर 2013 ला संपूर्ण देशात आपल्या प्रचारसभा आरंभल्या. यावेळी त्यांनी देशभरात 437 प्रचारसभा केल्यात.

या सभांच्या माध्यमातून मोदींनी देशातील जनतेला अनेक आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय मुद्द्यांप्रती जागरूक केले.

निम्नस्तरावर जनतेशी संबंधित समस्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या सोबतच मोदींनी या झंजावाती दौऱ्यादरम्यान समस्त देशवासियांमध्ये एक नवी चेतना निर्माण केली.

या सुमारास मोदी सोशल मिडीयावर देखील फार सक्रीय राहीले आणि या प्लेटफॉर्म  च्या माध्यमातून आपले विचार ते जनमानसापर्यंत पोहोचवू शकले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान मोदींद्वारे सुरु केला गेलेला “चाय पर चर्चा” (Chai par Charcha ) हा कार्यक्रम देखील खूप लोकप्रिय ठरला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी जनसामान्यापर्यंत पोहोचण्यात आणि त्यांच्या समस्यांना जवळून  जाणून घेण्यात यशस्वी झाले.

या नंतर तर जशी सगळीकडे मोदी लहर आली, लोकांना मोदीजींच्या विचारांनी आणि रणनीतिंनी इतके प्रभावित केले की जनतेने त्यांना भरपूर मतांनी विजयी केले.

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप ने 534 जागांपैकी 282 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला.

अश्या तऱ्हेने नरेंद्र मोदी भारताचे प्रधानमंत्री या रुपात एक नवा चेहरा बनले.

देशाचे प्रधानमंत्री या रुपात नरेंद्र मोदी – Narendra Modi as a Prime Minister Of India:

2014 साली झालेल्या निवडणुकीत आपल्या कौशल्यपूर्ण रणनीतीने पक्षाला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर नरेंद्र मोदींनी 26 मे 2014 ला भारताचे 15 वे पंतप्रधान म्हणून गोपनीयतेची शपथ घेतली.

प्रधानमंत्री पदाची जवाबदारी नरेंद्र मोदींनी उत्कृष्टपणे सांभाळली.

या दरम्यान केवळ त्यांनी देशाच्या आर्थिकस्थितीला बळकटी दिली असे नव्हे तर देशातून गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार दूर करण्याकरता विशेष प्रयत्न केले.

मोदींनी महिला, मुलं, ज्येष्ठ नागरीक, व्यापारी, शेतकरी, युवा या सर्व वर्गांच्या हीताला समोर ठेऊन अनेक योजनांची सुरुवात केली.

भारतात स्वच्छता अभियानाची सुरुवात करून लोकांमध्ये स्वच्छते प्रती जागरूकता निर्माण केली.

पीएम पदाची जवाबदारी सांभाळल्या नंतर नरेंद्र मोदींनी एका मागोमाग एक विदेश दौरे करत भारताचे संबंध इतर देशांशी मजबूत करण्याचे प्रयत्न केले.

सोबतच विदेशी व्यवसायांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केलं.

शिक्षण, स्वास्थ्य, सुरक्षा, परिवहन, रस्ते, मनोरंजन, यांसारख्या क्षेत्रात मोदींनी अनेक कामं केलीत.

या व्यतिरिक्त मेक इन इंडिया आणि डिजीटल इंडिया सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना जागरूक केलं.

आपल्या सकारात्मक विचारांनी आणि विकसनशील कार्याने त्यांनी जनतेच्या मनात आवडता प्रधानमंत्री म्हणून आपली छाप सोडली

आणि याचा परिणाम त्यांना 2019 च्या निवडणुकांमध्ये मिळाला.

2019 च्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवून बनले दुसऱ्यांदा पंतप्रधान-Narendra Modi Prime Minister 2019:

एक सक्षम आणि सशक्त प्रधानमंत्री म्हणून आपली छाप सोडणाऱ्या नरेंद्र मोदींनी 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पीएम पदाच्या उमेदवारी सोबत निवडणूक लढली आणि या वेळी त्यांची जादू कमाल करून गेली.

542 जागांपैकी 353 जागांवर विजयश्री मिळवून त्यांनी 70 वर्ष जुन्या कॉंग्रेस पार्टीला धारातीर्थी पाडले

आणि आपल्या रणनीतीने 2019 च्या निवडणुकीत इतिहास रचला आणि अश्या तऱ्हेने भारताला नरेंद्र मोदींच्या रुपात प्रधानमंत्री नव्हे तर प्रधानसेवक मिळाला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करून दुसऱ्यांदा पीएम पद प्राप्त केलं,

आणि ते सतत देशातील जनतेच्या विकासाकरता कार्यरत आहेत.

एक ग्लोबल लीडर रुपात नरेंद्र मोदी – Narendra Modi Global Leader:

आपल्या दमदार विदेशनिती ला धरून मोदींनी धडाकेबाज विदेश दौरे करून विश्वस्तरावर भारताची एक वेगळी ओळख निर्माण केलीये.

आणि त्यामुळे आज आपला भारत विश्वसमूहा समवेत पाऊलावर पाऊल ठेवत वाटचाल करतोय.

हा परिणाम पूर्णतः मोदींच्या रणनीतीचा आणि कुटनीतीचाच म्हणावा लागेल.

ज्या देशांच्या नजरेत एकेकाळी आपला भारत सलायचा, आज तेच देश भारताशी मैत्री करण्याकरता धडपडतायेत.

नरेंद्र मोदींनी ब्रिक्स, सार्क, संयुक्त राष्ट्र आणि जी-20 शिखर सम्मेलनात भाग घेऊन त्याठिकाणी आपल्या भारताला मजबूत राष्ट्राच्या रुपात सर्वांसमोर ठेवलं.

त्यामुळे मोदिजींच्या विचारांचे, दूरदृष्टीचे, फार कौतुक झाले.

दुसरीकडे मोदींच्या जापान यात्रे नंतर भारत-जापान संबंधाना एक नवा आयाम मिळाला.

या शिवाय नरेंद्र मोदी मंगोलिया ची यात्रा करणारे देशाचे पहीले प्रधानमंत्री आहेत.

सोबतच पीएम मोदींच्या चीन आणि दक्षिण कोरियाच्या यात्रा सुद्धा भारतात गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने फार यशस्वी ठरल्या.

नरेंद्र मोदींद्वारे करण्यात आलेली अतुलनीय कार्य- Narendra Modi Work

भ्रष्टाचाराला संपविण्यासाठी देशात नोटबंदी लागू केली:

मोदींनी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बंद करून त्या जागी 2000 आणि 500 च्या नव्या नोटा चलनात आणल्या.

गुड्स एंड सर्विस टैक्स (GST) :

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशात लावण्यात येणाऱ्या सर्व वेगवेगळ्या टैक्स ला एकत्र करून जीएसटी टैक्स लागू केला.

उरी हल्ल्याचे प्रतीउत्तर सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानची उडविली झोप :

नरेंद्र मोदींनी 2016 साली झालेल्या उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.

पुलवामा हल्ल्या नंतर एयर स्ट्राईक करण्याचा ऐतिहासिक निर्णय :

फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात अनेक भारतीय सैनिक शहीद झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी देशातील सर्व सुरक्षा बलांना कोणतीही कारवाई करण्याची मोकळीक देण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर वायुसेने द्वारे एयरस्ट्राईक करण्यात आली.

गुजरात मध्ये स्टेच्यु ऑफ युनिटी ची निर्मिती :

भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाच्या रूपाने स्टेच्यु ऑफ युनिटी (Statue of Unity) ची निर्मिती केली.

गुजरात राज्यातील अहमदाबाद पासून 200 किमी अंतरावर नर्मदेच्या सरदार सरोवर या धरणा नजीक हे स्मारक उभारण्यात आले आहे.

याची आधारशीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ठेवली होती स्टेच्यु ऑफ युनिटी हे अन्य स्मारकाप्रमाणे केवळ मूक स्मारक नाही.

तर सामाजिक-आर्थिक विकासाला योग्य कनेक्टीविटी देण्यासोबतच स्वास्थ्य आणि शिक्षणाच्या मूळ स्वरूपावर कार्य करेल शिवाय कृषीविकासाकरता अनुसंधान केंद्र देखील विकसित करेल

आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात:

योगाला प्राथमिकता देण्यासाठी आणि त्याच्या प्रती लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने नरेंद्र मोदींनी प्रत्येक वर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 पासून सुरु करण्यात आलाय.

राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती :

नई दिल्ली येथे सशस्त्र बलाला सन्मानित करण्याकरता राष्ट्रीय युद्ध स्मारकाची (National War Memorial) निर्मिती करण्यात आली.

त्याचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.

भारतात बुलेट ट्रेन आणण्याची योजना :

आपल्या भारतात 2022-2023 पर्यंत बुलेट ट्रेन सुरु करण्यात येईल,

याची भारत सरकारचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा देखील केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनांमधील ही एक महत्वपूर्ण योजना आहे.

या व्यतिरिक्त सुद्धा नरेंद्र मोदींनी अनेक महत्वाची कार्य केली आहेत ज्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळाली आहे

नरेंद्र मोदींद्वारा सुरु करण्यात आलेल्या योजना- Narendra Modi Scheme

 • प्रधानमंत्री जण-धन योजना
 • Pradhan Mantri Awas Yojana
 • प्रधानमंत्री उज्वला योजन
 • सुकन्या समृद्धी योजना
 • डिजिटल इंडिय
 • प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना
 • Pradhan Mantri Fasal Bima Yojana
 • प्रधानमंत्री कौशल विकास योजना
 • मेक इन इंडिया
 • गरीब कल्याण योजना
 • स्टैड अप इंडिया
 • प्रधानमंत्री मुद्रा बैंक योजना
 • Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana
 • प्रधानमंत्री सांसद ग्राम योजना
 • Pradhan Mantri Suraksha Bima Yojana
 • दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना
 • अटल पेंशन योजना
 • उडान योजन
 • स्कील इंडिया (कौशल भारत योजना)
 • स्वच्छ भारत योजना
 • बेटी बचाओ- बेटी पढाओ योजना
 • स्मार्ट सिटी योजना

या शिवाय देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अन्य बऱ्याच योजनांची सुरुवात केली ज्याचा लाभ देशाच्या कानाकोपऱ्या पर्यंत पोहोचतो आहे.

नरेंद्र मोदीजींच्या विशेष बाबी – Narendra Modi Facts

 • मोदीजी स्वामी विवेकानंदांचे अनुयायी आहेत
 • प्रधानमंत्री मोदींनी आजतागायत आपल्या कार्यकाळात आपल्या कोणत्याही नातेवाईकांना आपल्या सरकारी निवासात राहण्याकरता आणलेले नाही. ते एकटेच येथे वास्तव्याला असतात.
 • नरेंद्र मोदींनी गुजरात चे मुख्यमंत्री असतांना 13 वर्षांच्या कार्यकाळात एकदा सुद्धा सुट्टी घेतली नाही.
 • प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना इंडियन ट्रेडीशनल ड्रेसेस फार आवडतात. स्टाइल आयकॉन म्हणून देखील त्यांना ओळखल्या जातं.

   नरेंद्र मोदींना मिळालेले सन्मान – Narendra Modi Award

 • 2005 साली मोदींना भारताच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभागा द्वारे एलीटेक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • 2007 मध्ये मोदींना इंडिया टुडे मैगजीन तर्फे देशातील सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री म्हणून गौरविण्यात आलंय.
 • 2009 या वर्षी नरेंद्र मोदींना FDI मैगजीन तर्फे पर्सनालिटी ऑफ द ईयर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • 2014 ला फोर्ब्स च्या यादीत मोदींचे नाव विश्वातील सर्वात शक्तिशाली लोकांमध्ये 15 व्या स्थानावर होते
 • सन 2014 लाच टाइम पत्रिके द्वारे नरेंद्र मोदींना 100 सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत शामिल करण्यात आले.
 • 2014, 2015, आणि 2017 ला टाइम मैग्जीन तर्फे मोदींना जगातील 100 सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये सहभागी करण्यात आले आहे.
 • फोर्ब्स मैग्जीन ने 2015, 2016, 2018 ला देखील नरेंद्र मोदींना 9 सगळ्यात शक्तिशाली लोकांमध्ये सहभागी केले.
 • सप्टेंबर 2018 ला मोदींना युनाइटेड नेशन चा सर्वोच्च पर्यावरण सन्मान चैम्पियंस ऑफ अर्थ अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला
 • 24 ऑक्टोबर 2018 ला आंतरराष्ट्रीय सहयोग आणि ग्लोबल आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याकरता मोदींना सिओल शांती पुरस्कार देण्यात आला.
 • 2018 साली मोदींना भारत आणि फिलीस्तीन यांच्यातील नातं मजबूत केल्याबद्दल सर्वोच्च फिलीस्तिनी सन्मान “फिलीस्तिनी राज्याचे ग्रेंड कॉलर” ने गौरविण्यात आलं.
 • 22 फेब्रुवारी 2019 मध्ये मोदींना प्रतिष्ठित सिओल शांती पुरस्कार 2018 बहाल करण्यात आला.
 • या शिवाय जगातील सर्वात मोठी स्वास्थ्य योजना सुरु करण्याकरता मोदींचे नाव नोबेल शांतता पुरस्काराकरता देखील नामांकित करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदींवर आधारीत चित्रपट नमो‘ – Narendra Modi Movie

नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारीत चित्रपट ‘नमो’ 24 मे 2019 ला प्रदर्शित करण्यात आला.

या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदींच्या भूमिकेत पहायला मिळाला.

या चित्रपटाचे दिग्दर्शन उमंग कुमार यांनी केले होते.

नरेंद्र मोदींनी लिहिलेली पुस्तकं – Narendra Modi Book in Marathi

 • प्रेमतीर्थ
 • ज्योतीपुंज
 • सामाजिक समरसत
 • केल्वे ते केलावणी
 • साक्षीभाव
 • एबोड ऑफ लव

नरेंद्र मोदींवर लिहिल्या गेलेली प्रसिद्ध पुस्तकं – Book on Narendra Modi in Marathi

 • मोदी : मेकिंग ऑफ अ प्राइम मिनिस्टर : लीडरशिप, गवर्नेंस एंड परफोरमेंस
 • सेंटरस्टेज इनसाइड द नरेंद्र मोदी मॉडल ऑफ गवर्नेंस
 • नरेंद्र मोदी- अ पॉलिटिकल बायोग्राफी
 • द मैन ऑफ द मोमेंट : नरेंद्र मोदी
 • द नमो स्टोरी – अ पॉलिटीकल लाइफ
 • नरेंद्र मोदी : द गेमचेंजर

खरंच… भारतीय राजकारणात मोदी आपल्या कुशल नेतृत्वाने देशवासीयांच्या नजरेत हिरो नं. 1 ठरले आहेत. त्यांच्या उज्वल भविष्या करता माझी मराठी ची संपूर्ण टीम सदिच्छा व्यक्त करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here