“बेटी बचाओ बेटी पढाओ” वर घोषवाक्य

Beti Bachao Beti Padhao Slogans in Marathi

आज समाजात सतत कमी होत जाणारी मुलींची संख्या आणि समोर येणारे कन्या भ्रृण हत्येचे गुन्हे आपल्या भारतिय संस्कृतीला हादरवणारे ठरतायेत. या घटनांमुळे संपुर्ण विश्वात आपल्या देशाची प्रतिमा डागाळली जाते आहे. मुलींचे कमी होत जाणारे प्रमाण हा एक गंभीर चिंतेचा विषय आहे यावर उपाय आणि या समस्येचे निराकरण होणे अत्यंत आवश्यक आहे.

समाजातील मुलींची स्थिती ही केवळ शिक्षणाने सुधारल्या जाऊ शकते. म्हणुन मुलींच्या सुरक्षेकरीता आणि शिक्षणाकरीता माननीय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदींनी 2015 साली बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला सुरूवात केली होती जेणेकरून भारतिय समाजात महिलांची स्थिती बदलली जावी, त्यांना सन्मान मिळावा, पुरूषांबरोबरीचे अधिकार मिळावेत व त्यांना त्यांच्या जीवनाशी निगडीत निर्णय स्वतः घेता यावे आपल्या आयुष्यात त्यांना पुढे जाता यावं आणि देशाच्या विकासात त्यांनी आपलं महत्वपुर्ण योगदान द्यावं.

या आर्टिकल मधुन आम्ही आपल्याकरता प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या अत्यंत महत्वाकांक्षी आणि प्रमुख योजना “बेटी बचाओ बेटी पढाओ” करीता लेटेस्ट स्लोगन्स् उपलब्ध करून देत आहोत याचा उपयोग आपण मुलींच्या सुरक्षेकरता आणि शिक्षणा संबंधीत जोडलेल्या सर्वच कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याकरता करू शकता.

या व्यतिरीक्त आपण “बेटी बचाओ बेटी पढाओ” यावर आधारीत या स्लोग्नस् ला फेसबुक, व्हाॅटस्अप किंवा अन्य सोशल मिडीयावर शेअर करू शकता त्यामुळे समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे संदेश पोहोचतील ते लोक देखील मुलींना शिकविण्याकरता जागरूक होतील त्यामुळे आपल्या देशाची आणखीन प्रगती होईल.

“बेटी बचाओ बेटी पढाओ” वर घोषवाक्य – Beti Bachao Beti Padhao Slogans in Marathi

Save Girl Child Slogan in Marathi

“आनंदी आनंद गडे जेव्हां मुलगी अंगणात बागडे.

Save Girl Child Slogan

“भ्रृणहत्या करून पापाचे भागिदार होऊ नका.

Slogan on Save Girl Child in Marathi

“जीच्या उदरात नवी सृष्टी जन्म घेते तीलाच नाकारता, स्त्री जन्माचे स्वागत करा तीचा आदर करा.

Save Girl Child Slogan in Marathi Language

“आई आजी आत्या ताई मावशी काकु पाहिजे नं! मं मुलगी का नको? जरा विचार करा! आपलं जीवन अंधकारमय करूं नका.

Mulgi Vachava Mulgi Shikva Marathi

“उद्याची जिजाबाई, सावित्रीबाई, आनंदीबाई तिच्याच पाहुया, तिला कल्पना चावला, सुनिता विल्यम्स्, सायना नेहवाल बनवुया.

Kanya Bhrun Hatya par Slogan

“कन्या! हे तर परमेश्वराकडून मिळालेले वरदान, हीचा आपण सगळे मिळुन करूया सन्मान.

Stri Bhrun Hatya Slogan in Marathi

“मुलींना शिकवुन स्वयंसिध्दा बनवुया, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायला शिकवुया.

Mulgi Vachava Ghosh Vakya

“मुलीचा गर्भातच करताय नाश, अटळ आहे सर्वांचा विनाश.

Beti Bachao Beti Padhao Slogans in Marathi

“तिच्या अस्तित्वाने घराला शोभा येते तिच्या असण्याने घराचे अंगण हसते.

Stree Shakti Slogans in Marathi

“मोकळया आकाशात तिला उंच झेप घेऊ द्या, तिची झेप तिची प्रगती डोळे भरून पाहुया.

Slogan on Save Girl Child

“स्त्री माता मुलगी या आपल्या संस्कृतीच्या रक्षक आहेत, त्यांचं रक्षण हे आपलं आद्यंकर्तव्य आहे.

Stree Shakti Slogans

“मुलासारखेच मुलीलाही शिक्षीत करू, दोघांमधला भेदाभेद दुर सारू.

Stri Bhrun Hatya Slogan

“मुली कधीच नसतात आई वडिलांवर भार, त्या तर जगण्याचा खरा आधार.

Save Girl Child Slogan in Marathi

भारतीय समाजातील महिलांच्या स्थितीत पुर्वीपेक्षा बराच बदल झाला आहे. कित्येक क्षेत्रात स्त्रिया पुरूषाच्या खांद्याला खांदा लावुन प्रगती करतायेत, आपल्यातील प्रतिभेने सर्वांना अचंभीत करत आहे देशाचे नाव गर्वाने मोठे करतायेत.

हे चित्र जरी सुखावह असलं तरी देखील मुलींची संख्या सतत कमी होत आहे शिवाय बलात्कार, गॅंगरेप, कन्या भ्रृण हत्या, हुंडाबळी सारख्या क्रुर गुन्हयांमध्ये वाढ होते आहे.

या घटनांमुळे आज आपल्या भारत देशाला विकसीत देशांसारखी प्रगती साधता आलेली नाही कारण खऱ्या अर्थाने देशाचा विकास तेव्हांच शक्य होतो जेव्हां देशातील अर्धी लोकसंख्या म्हणजेच महिला आणि मुली समान स्वरूपात देशाच्या विकासात आपलं योगदान देतात.

जर तुम्हाला मनापासुन वाटतय की आपल्या भारत देशाने यशाचे नवनवे किर्तीमान स्थापीत करावेत तर “बेटी बचाओ बेटी पढाओ” वर लिहीलेल्या स्लोगन्स् ना नक्की वाचा आणि मुलींना त्यांचे अधिकार मिळवुन देण्याकरता पुढाकार घ्या शिवाय अश्या प्रकारच्या स्लोगनस् च्या माध्यमातुन अन्य लोकांना देखील जागरूक करण्यात आपली मोलाची भुमीका पार पाडा.

शिक्षीत स्त्रियां फक्त आपले कुटुंब उत्तमरितीने सांभाळतात असे नाही तर आपल्या मुलांच्या भविष्याला देखील उज्वल बनवितात. एक सभ्य आणि शिक्षीत समाज निर्माण करतात म्हणुन मुलींचे शिक्षण त्यांना आत्मनिर्भर बनविण्याकरता आणि त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्याकरता आवश्यक आहे.

“बेटी बचाओ बेटी पढाओ” स्लोगन्स् च्या माध्यमातुन लोकांमधे आपल्या मुलींना शिक्षीत करण्याकरीता जागरूकता निर्माण होईल आणि समाज मोठया प्रमाणात आपल्या मुलींना शिक्षीत करण्याकरता पुढाकार घेईल आणि त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमी सतर्क राहील.

Beti Bachao Beti Padhao Yojana Slogan

“सरला तो काळ गेले ते पारतंत्र्य, आता स्त्रीयांना जगण्याचे पुर्ण स्वातंत्र्य….

Mulgi Vachava Mulgi Shikva

“मुलांना शिकवले तरी मुले उपकार विसरतात, मुली तर आजन्म आईबापाच्या ऋणी राहातात.

Beti Bachao Beti Padhao Slogans

“मुली आई वडिलांजवळ मागतात तरी काय? मान सन्मान आणि थोडेसे प्रेम.

Save Girl Status in Marathi

“स्त्रीभ्रृण हत्या थांबवा लेक वाचवा!

Kanya Bhrun Hatya Par Slogan in Hindi

“तिच्या शिकण्याने दोन घरांचा उध्दार होणार आहे तीला शिकुद्या दोन घरं उजळु द्या.

Marathi Slogans on Girl Education

“तिच्या शिक्षणाकरता आता सरकार पुढे आलंय!, ती तुमच्यावर भार नाही! आता तरी तिला शिकु द्या.

Mulgi Vachava Ghosh Vakya Marathi

“आपल्या मुलीच्या शिक्षणाला मुला एवढेच महत्व द्या, मुला मुलीत भेद करण्याचे दिवस केव्हांच संपले हे लक्षात घ्या.

Mulgi Vachava Mulgi Shikwa

“मुलीला शिकवुयां तिला स्वयंपुर्ण बनवुया.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Beti Bachao Beti Padhao Slogans In Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top