Road Safety Slogans and Posters
आवर वेगाला सावर जीवाला..आजचे युग हे यंत्र युग असल्याने वाहतुकीच्या प्रमाणात मोठया संख्येने वाढ झाल्याचे आपल्या निर्देक्षणात येत असेलचं. पूर्वीपेक्षा वाहतुकीचे प्रमाण वाढले असल्याने दळणवळण करणे जरी सोपे असले तरी यातून दुर्घटनेची एक मोठी समस्या निर्माण झाली आहे असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी आपण आज मोटार वाहनाचा वापर करत असतो. त्यामुळे दळणवळण करणे सोपे झाले, परंतु काही लोक गाडी चालविताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लघन करतात परिणामी दुर्घटना ही घडते.
रस्ता वाहतुकीच्या संबंधित असलेली प्रमुख समस्या, शहरातील रहवासी व शहरात कामानिमित्त ये जा करणाऱ्या व्यक्तींमुळे वाहतुकीची समस्या उद्भवते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:ची गाडी असणे खूप गरजेचे झाले आहे. परंतु गाडी चालविताना खबरदारी बाळगणे खूप आवश्यक आहे. पालकांनी लहान मुलांना वाहन हाताळायला देता कामा नये. त्यांना वाहतुकीचे नियम योग्य पणे समजावून सांगणे अती आवश्यक आहे.
२६+ सुरक्षा घोषवाक्य मराठी – Road Safety Slogans in Marathi
वेग कमी जीवनाची हमी.
वाहन जोऱ्यात चालवण्याची करू नका घाई हा मानव जन्म पुन्हा नाही.
Road Safety Quotes
आवर वेगाला सावरा जीवाला.
गाडी हाकण्याची करू नका घाई घरी वाट पाही आपली आई.
विकसित देशांत व्यक्तिगत गतिशीलता व प्रवासाची इच्छा यांत भरपूर प्रमाणत वाढ झाली असल्याने रस्त्यांची मागणी पुरवठ्याच्या तुलनेने दिवसांदिवस वाढतचं आहे. परिणाम गर्दी व सतत बिघडत चालेल्या सार्वजनिक सुविधांच्या स्वरुपात यांची जाणीव आपल्याला होतचं असेलं. वाहतुकीच्या असणाऱ्या अपुऱ्या सुविधांमुळे देखील दुर्घटना होतचं असतात.
रस्ता सुरक्षा घोषवाक्य – Marathi Slogans on Road Safety
जो चुकला नियमाला तो मुकला जीवनाला.
दारू पिऊन गाडी चालविण्याची करू नका हिम्मत नाहीतर मोजावी लागेल फार मोठी किमत.
Suraksha Ghosh Vakya
सुरक्षामध्ये आहे आपली भलाई, समोर जाण्यात कोणती आहे भलाई.
दारू पिऊन गाडी चालविण्यात कोणत आलं शहाणपण ते तर आहे मृत्यूला आमंत्रण.
Road Safety Messages
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक.
आपली सुरक्षा हीच आपल्या परिवाराची सुरक्षा.
मराठी सुरक्षा घोषवाक्य – Safety Slogans in Marathi
एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मालाचे दळणवळण करण्यासाठी तसेच प्रवास करण्यासाठी रेल्वे आणि हवाई मार्गाच्या तुलनेने महामार्गाचा वापर जास्त प्रमाणत वाढला आहे. शिवाय मालाची दळणवळण करण्यासाठी रोड वाहतुकीला रेल्वे आणि विमानाच्या वाह्तुकीच्या तुलनेने खूप मागणी असल्याने लोक याचा मोठया प्रमाणात वापर करतात. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचे प्रमाण मोठया संख्येने वाढले आहे. यामुळे महामार्गांवर आपल्याला जास्त दुर्घटना घडतांना दिसतात. महामार्गावर वाहन चालवितांना नेहमीच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
दारू पिऊन गाडी चालविण्याचा करू नका प्रयत्न जीवना इतक दुसर कशाला नाही महत्व.
संयम पाळा अपघात टाळा.
Road Safety Ghosh Vakya
हेल्मेटचा वापर करा, नियम पालनात सहयोग करा.
शुद्ध हवा मुलांना तर ब्रेक आपल्या वाहनाला.
रस्ता सुरक्षा घोषवाक्य – Best Slogans On Safety
सर्व देश आपापल्या देशातील रस्त्यांवर होणाऱ्या वाहतुकीच्या नियमांचे नियोजन करीत असतात. आपल्या देशात १८ वर्षावरील मुलांना गाडी शिकण्याचा परवाना दिला जाण्याचा नियम आहे. तरी सुद्धा काही पालक या नियमांचे उल्लघन करतात व आपल्या मुलांना गाडी चालविण्यापासून रोखत नाहीत. परिणामी त्यांना वाहतुकीचे नियम पूर्ण माहित नसल्याने त्यामुलांकडून नकळत नियम मोडले जातात.
वाहतुकीचे नियम पाळण्यातच आहे आपली समजदारी नाही तर करावी लागेल यमराजांच्या द्वारी स्वारी.
वाहन चालविण्याची करू नका घाई आपले जीवन व्यर्थ नाही.
Rasta Suraksha Marathi Ghosh Vakya
वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा.
दारू पिऊन गाडी चालवूनी आमंत्रण देती मृत्यूला.
Vahatuk Suraksha Ghosh Vakya in Marathi
गाडी चालविता मनी विचार करी घरी वाट पाहत आहे आपली छोटीशी परी.
गाडी चालवणार वेगावर तर नाही भरवसा जीवावर.
Safety Slogan in Marathi Images
शहरातील वाहतुकीची तर समस्या सर्वसामान्य आहे अपुऱ्या सुविधांमुळे आणि नियमांचे उल्लघन केल्याने ती होत असते. यासाठी तर आपण स्वत:च कारणीभूत आहोत. याची जाणीव आपण राखली तर काही प्रमाणात का असेना आपण होणाऱ्या दुर्घटनेचे प्रमाण कमी करू शकतो. आपला जीव हा खूप मौल्यवान आहे त्यामुळे आपण स्वत: एक जबाबदार नागरिक म्हणून आपले वाहन हळू चालवावे.
आपली गाडी आपला वेग प्रवास होईल मंगलमय.
ज्याचा आहे आपल्या वाहनावर ताबा तोच आहे वाहक खरा.
Suraksha Ghosh Vakya
गर्दीत वाहन जोरात चालविण्यात कसली आली समजदारी ती तर आहे आपली सर्वांची जबाबदारी.
वाहतुकीचे नियम पाळूया दुर्घटना टाळूया.
Road Safety Slogans and Posters
आपला प्रवास सुखाचा प्रवास.
आपला प्रवास आपल्या हाती आहे नाहीतर मृत्यूचे दार उघडे आहे.
महामार्गावरील वाहतूकीचे प्रमाण दळणवळण दृष्ट्या वाढतच चालले आहे त्या अनुषंगाने वाहतुकीची समस्या देखील तितकीच भेडसावत आहे. महामार्गांवर जागोजागी वाहतुकी संबंधी नियम लिहिलेल्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. जेणेकरून वाहकाला वाहन चालवितांना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही. रात्रीच्या वेळेला वाहकाला रस्त्यावरील वळण कोणत्या दिशेला आहे ते समजण्यासाठी रेडियमच्या साह्याने बनविलेल्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. अश्या तऱ्हेच्या अनेक सुविधा महामार्गावर असतांना सुद्धा दुर्घटना या घडतातचं.
यावर एकचं उत्तम उपाय म्हणजे आपण सर्वांनी मिळून वाहतुकीचे नियम योग्य प्रकारे आमलात आणले तर दुर्घटनेचे प्रमाण काही प्रमाणत कमी होईल.