“पानी वाचवा’ या विषयी काही घोषवाक्ये”

Pani Vachava Ghosh Vakya

पृथ्वीवरील जीवन हे पाण्यामुळे अस्तित्वास आले आहे, सर्वात आधी एकपेशीय प्राणी मग पाठोपाठ सरपटणारे असे करता करता सर्व जीवसृष्टीची निर्मिती झाली. आपल्या जीवनात पाण्याचे खूप मोठे महत्व आहे. पाणी हेच आपले जीवन आहे. पाण्याविना पृथ्वीवरील जीवन हे कवडीमोल आहे. त्या जीवनाला कोणताही अर्थ उरत नाही.

आज पाण्याविषयी काही घोषवाक्ये पाहणार आहोत जे आपल्याला पाण्याचा कमी वापर करण्यासाठी मदत करतील.

“पानी वाचवा’ या विषयी काही घोषवाक्ये”- Save Water Slogans in Marathi

Save Water Slogans in Marathi

Pani Vachava Ghosh Vakya

 1. “पाणी अडवा, पाणी जिरवा.”
 2. “पाण्याविना जीव होतो बेजार, जगण्याला पाण्याचाच आधार.”
 3. “पिण्यासाठी वापरा शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी.”
 4. “पाणी देते जीवनदान, करू त्याला वाचविण्याचे श्रेष्ठ काम.”|
 5. “पाण्याला वाचवा ते तुमच जीवन वाचवेल.”
 6. “वाणी आणि पाणी जपून वापरा. वाणी जपली तर वर्तमान काळ चांगला राहील आणि पाणी जपले तर भविष्यकाळ.”
 7. “सांडपाणी वापरत चला, भाजीपाला पिकवत चला.”
 8. “धरती, हवा, पाणी ठेवा साफ,  नाहीतरी येणारी पिढी करणार नाही माफ.”
 9. “गरज काळाची, बचत पाण्याची.”
 10. “करा पाणी वाचवण्याची नीती, टळेल दुष्काळाची भीती.”
 11. “पाणी वाचविण्याचा ठेवा ध्यास, मगच होईल आपला विकास.”
 12. “स्वच्छ पाण्यामुळे राहील सुंदर परिसर, त्यामुळे जीवन होईल आरोग्य निरंतर.”
 13. “सांडपाण्याची लाऊ योग्य विल्हेवाट, मगच निघेल आरोग्याची पहाट.”
 14. “प्रत्येकाचा एकच नारा, पाण्याची काटकसर करा.”
 15. “पाण्याविना नाहीत प्राण, पाण्याचे तू महत्व जाण.”
 16. “पाण्याची राखा शुद्धता, जीवनाला मिळेल आरोग्यता.”
 17. “पाण्याचे थोडेसे नियोजन, फुलवून देईल आपले जीवन.”
 18. “वाचवू प्रत्येक थेंब पाण्याचा, हाच एकमेव मार्ग सुखाकडे जाण्याचा.”
 19. “ठिबक सिंचनाची किमया न्यारी, कमी पाण्यात उत्पन्न भारी.”
 20. “वाचविल्यास जलसंपदा, सिंचनास होईल फायदा.”

Marathi Slogan On Water

आपल्या प्रत्येकाला ही जाणीव आहे की पाणी म्हणजे जीवन पाण्याशिवाय मनुष्याच्या अस्तित्वाचा विचार देखील होऊ शकत नाही निसर्गानं बहाल केलेलं पृथ्वीवरचं अमृत म्हणजे पाणी आज चोहिकडे पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवायला लागलं आहे

वेळ असतांनाच जर या पाण्याची बचत आणि त्याचं संवर्धन करण्याकरता आपण पुढे आलो नाही तर येणारा काळ आणखीन कठीण असेल येथे पाणी वाचवण्यासंदर्भात काही घोषवाक्य देत आहोत. या वाक्यांमुळे आपल्यात पाणी वाचवण्याची प्रेरणा नक्कीच जागृत होईल

 1. जीवनाचे दुसरे नाव पाणी, पर्यावरणाचे संरक्षक पाणी पाण्यामुळेच पृथ्वी, या पाण्यामुळेच आपलं अस्तित्व!”
 2. सृष्टीची करूण हाक ऐका, पाणी वाचवा’’
 3. तुम्हाला सर्वदुर वाळवंट पहायला आवडेल की हिरवळ? वेळीच जागे व्हा! पाणी वाचवा
 4. धरणी आई तर जल पिता! यांचे संरक्षण आपलं आद्यकर्तव्य!
 5. चार महिने धो धो कोसळणारा पाऊस जेमतेम महिनाभर पडत विचार करा! आपलं काही चुकतय का
 6. नळांना तोटया लावा, वाया जाणारे पाणी थांबवा!
 7. पाण्याचा थेंब न् थेंब वाचवुन निसर्गाचे ऋण फेडुया, पाणी वाचवुया!
 8. पाऊसाचा थेंब न् थेंब साठवा! रेनवाटर हार्वेस्टिंग करीता पुढाकार घ्या.
 9. पावसाचा प्रत्येक थेंब अनमोल आहे, त्याला अडवा, त्याला जिरवा
 10. पाणी खोल, खोल, खोल, शोधावं लागतंय सावधान!
 11. पाण्याचा काळजीपुर्वक वापर ही काळाची गरज.

पाणी घोषवाक्य मराठी

एका सर्वेक्षणानुसार ग्रामिण भागातील स्त्रियांचा दिवसातील अर्धाअधिक वेळ पाणी भरण्याकरता जातो, लांबवर पायपिट करून त्यांना पाणी आणावं लागतयं. पाणी साठवणुकीकरता आज आपण वेळीच जागरूक झालो नाही तर येणारा काळ भयावह असेल आणि त्याचे जवाबदार आपणच असु.

या ठिकाणी पाणी साठवणुकीचे घोषवाक्य देऊन आम्ही लोकांना जागरूक करू ईच्छितो जेणेकरून नागरिक आपापल्या परीने पाणी वाचवण्याचे प्रयत्न करतील.

 1. खळाळते झरे आता केवळ स्वप्नातच दिसतात! नाही तर कविच्या कवितांमधुन डोकावतात
 2. हे झरे वास्तवात वाहायला हवेत सतत!
 3. या माऊलीच्या डोळयातील पाणी सांगतय! पाणी वाचवा पाणी साठवा!
 4. चराचरातील पाणी आटत चाललयं जागे व्हा! पेटुन उठा पाण्याकरता एकत्र या!
 5. पाणीच आहे जीवनाचे अमुल्य धन त्याचे मुल्य आपण ओळखायलाच हवे!
 6. रस्त्याने वाहणारे पाणी उघडया डोळयांनी केवळ बघत बसु नका ते रोखण्याकरता पाऊलं उचला
 7. हिरवीगार वनराई जिथे, समृध्दी नांदते तिथे जिथे मुबलक पाणी ऋतु गातो तिथेच गाणी वृक्षाचे संगोपन करा पाणी अडवा पाणी जिरवा
 8. भगिरथाने प्रयत्न करून ही गंगा धरतीवर आणलीये,
 9. हीच्या संरक्षणार्थ आपले प्रयत्न कमी पडायला नको चला भगिरथ प्रयत्न करूया, पाणी वाचवुया!
 10. पाण्याशिवाय जगण्याची कल्पनाच होऊ शकत नाही पाण्याच्या अद्भुत मुल्याला ओळखा आजपासुनच जलसंरक्षण करण्याचा निश्चय करा.
 11. कोणतेही कार्य सुरूवातीला छोटेच असते प्रत्येक जीव पाण्याला वाचवुन महान बनु शकतो!
 12. आवश्यक तेवढाच पाण्याचा करा उपयोग पाणी वाचवण्यात मिळेल आपला सहयोग!
 13. पाण्याचे मुल्य सोन्यासमान करू नका त्याचा अवमान!

Paani Marathi Slogans

आज मनुष्य आपल्या स्वार्थाकरता नैसर्गिक साधनसंपत्तीचा नको तितका वापर करतो आहे पुढच्या पिढयांकरता आपण मागे काही ठेवणार आहोत की नाही हा प्रश्न आज निर्माण झाला आहे.

आपल्या अधाशीपणामुळे निसर्गचक्र बिघडले आहे. आज एकाच वेळी कुठेतरी प्रचंड उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात आणि त्याच क्षणाला दुसरीकडे महापुराची परिस्थीती निर्माण झालेली असते या ऋतुचक्राच्या असमतोलाला आपणच जवाबदार आहोत.

पाणी वाचविण्याच्या या घोषवाक्यांनी आपण प्रेरणा घेउन एक मोहिम सुरू करायला हवी आणि त्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. तेव्हांच या भयावह परिस्थीतीवर आपण मात करू शकु!

 1. कधीही होऊ नको देऊस विस्मरण पाणी हेच जिवन!
 2. एक गोष्ट कधीही विसरू नका पाणी वाया घालवु नका!
 3. आपल्या सर्वांचे आता एकच स्वप्नं पाण्याच्या थेंबा थेंबांचे रक्षण करणं
 4. भविष्याची तरतुद केवळ पैशाचीच नव्हे तर पाण्याची देखील करा!
 5. आपल्या उद्याला सुरक्षित करूया पाणी जपुया जीवन वाचवुया!

तर हे होते काही घोषवाक्ये जे पाण्याविषयी समाजात जागरुकता पसरविण्याची मदत करतील या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करून जागरुकता पसरविण्यासाठी मदत करा.

धन्यवाद!

पाण्याविना जर रहायचे म्हटले तर आपण जास्तीत जास्त ३ दिवस विना पाण्याचे राहू शकतो, त्यानंतर विना पाण्याचे राहणे शक्यच नाही. म्हणून पाण्याला जपून वापरा, आज आपण पाण्याची जपवणूक केली तर येणाऱ्या पिढीला हि एक नैसर्गिक संपत्ती आपण देऊन जाऊ

तसेच जमिनीमध्ये पिण्याच्या पाण्याची पातळी हि खालावत आहे, त्यामुळे पाण्याची जपवणूक करणे काळाची गरजच झाली आहे.

वरील घोषवाक्य आपल्याला मदत करतील पाण्याचा योग्य वापर करण्याचा संदेश देण्यासाठी आणि लोकांमध्ये पाण्याविषयी जागरुकता पसरविण्यासाठी,

आशा करतो आजचा लेख आपल्याला आवडला असेल, खरोखरच आपल्याला आजचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांमध्ये शेयर करून पाण्याविषयी जागरुकता पसरविण्यास मदत करा जेणेकरून आपल्या अवती-भोवती पाण्याचा योग्य वापर होईल.

तसेच या लेखावर आपला अभिप्राय द्यायला विसरू नका, आपला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.

अभिप्राय आंमच्या माझी मराठी वर जाऊन दया.

2 thoughts on ““पानी वाचवा’ या विषयी काही घोषवाक्ये””

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top