Home / Slogans / पृथ्वी वाचवा घोषवाक्य – Save Earth Slogans in Marathi

पृथ्वी वाचवा घोषवाक्य – Save Earth Slogans in Marathi

Save Earth Slogans in Marathi

पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन संभव आहे. या पृथ्वीवर मानवाच्या जगण्याकरीता पर्याप्त संसाधनं उपलब्ध आहेत. या पृथ्वीवर मनुष्याकरीता पशु पक्ष्यांकरीता तसच झाडा वेलींकरीता पाणी मिळतं. श्वास घेण्याकरीता प्राणवायु प्राप्त होतो या सोबतच पृथ्वीवर आपल्या जगण्यासाठी चांगले वातावरण देखील उपलब्ध आहे.

या धरतीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणुनच आपण सर्वांनी या धरतीचे रक्षण करावयास हवे. परंतु आज मनुष्य या पृथ्वीचे संरक्षण करण्या ऐवेजी तिच्या अस्तित्वालाच नष्ट करावयास निघाला आहे.

माणुस आज स्वतःच्या स्वार्थाकरीता आणि भौतिक सुखाच्या हव्यासापायी नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करायला निघाला आहे यामुळे ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्या उग्र रूप धारण करतायेत व पर्यावरणाचे प्रदुषण सतत वाढत आहे. यामुळे केवळ पृथ्वीचे जीवन नष्ट होण्याचा धोका वाढला आहे असे नव्हें तर संपुर्ण मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसते आहे.

आज पृथ्वीला संरक्षित करण्याकरीता लोकांना जागरूक करण्याची आवश्यकता आहे. आज या ठिकाणी पृथ्वीला सुरक्षित करण्यासाठी धरतीला संरक्षण देणारे काही स्लोगन्स् देत आहोत. याला वाचुन आपल्याला धरतीला संरक्षित करण्याकरीता नक्की प्रेरणा मिळेल सोबतच आपण जर या स्लोगनस् ला सोशल मिडीया साईट्वर शेयर कराल तर अन्य वाचकांना देखील आपल्या पृथ्वीला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रेरणा मिळेल.

धरतीला वाचवण्याकरीता आणि लोकांना जागरूक करण्याकरीता प्रत्येक वर्षी 22 एप्रील ला “वसुंधरा दिन” साजरा करण्यात येतो. या निमीत्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येतं.

पृथ्वीला वाचवण्याकरता या स्लोगन्स् च्या माध्यमातुन लोकांच्या मनात धरतीचे संरक्षण करण्याची भावना विकसीत केली जाते.

पृथ्वी वाचवा घोषवाक्य – Save Earth Slogans in Marathi

Save Earth Slogans and Posters

थोडी तरी लाज बाळगुया पृथ्वीचा होणारा विनाश थांबवुया.

Save Earth Images

वसुंधरेला वाचवा जीवन आनंदी बनवा.

Save Earth Slogans in Marathi

येणाऱ्या पिढीच्या डोळयात आपण केवळ अश्रुच ठेवुन जाणार आहोत का? नाही नां! चला तर मग आपण झाडे लावुया…. पृथ्वीला सजवुया.

Slogans on Save Earth in Marathi

आपण सर्व मिळुन पृथ्वीवरील प्राकृतिक सौंदर्याला जपुया… झाडे लावुया.

Poster on Save Earth with Slogan

पृथ्वीचे सौंदर्य तीला पुन्हा प्राप्त करून देऊया ही धरती हिरवीगार करूया.

Painting of Save Earth

निसर्गाचे आपण करत असलेले क्रुर शोषण वेळीच थांबविले नाही, तर येणारी पिढी आपल्याला जाब विचारल्या शिवाय राहाणार नाही.

Poster on Save Earth

वर्तमानातील समस्या भविष्यात आणखीन उग्ररूप धारण, करण्या अगोदर आपण धरतीला तीचा भुतकाळ पुन्हा परत द्यायला हवा.

Save Earth Pictures

या वसुंधरेचा ठेवा जतन करायचा असेल, पुढच्या पिढीला आनंदात ठेवायचे असेल, तर चला! आधुनिकीकरणाच्यानावावर होणारी झाडांची कत्तल आपण लगेच थांबवुया.

Save Earth Photos

अनर्थ होण्याआधी जागे व्हां पृथ्वीचे हुंदके ऐका, ही धरती हिरवीगार करण्याकरीता पुढे या.

Marathi Slogans on Save Earth

झाडे पक्षी नद्या सरोवरे निसर्गाची किमया सारी, या पृथ्वीचे संरक्षण ही आपली जवाबदारी.

Poster on Save Mother Earth with Slogan

धरती ही आपली आई मं तिच्या संरक्षणाची जवाबदारी कुणाची? आपलीच नां…

Images of Save Earth with Slogan

पशु पक्षी झाडे वेली नद्या सरोवरे प्रत्येकजण आपल्यावर रूसेल, निसर्गाचे गतवैभव परत आणुया मग पहा पान नं पान हसेल.

Pruthvi Vachava Slogans

धरतीचे सौंदर्य हे केवळ हिरव्या रंगाने टिकणार आहे झाडांची अमानुषपणे होणारी कत्तल आजच थांबवा.

Save Earth Quotes

प्राकृतिक सौंदर्याला तोड नाही आणि आपल्या वागण्याला लगाम नाही.

Pruthvi Vachava Ghosh Vakya

निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यास सहलीला निघालात? सावधान! आपल्या हातुन तिथल्या प्राकृतिक सौंदर्याला बाधा पोहोचता कामा नये.

save earth quotes in marathi

प्लॅस्टिक चा वापर कमी करूया, आपली धरती स्वच्छ सुंदर ठेवुया.

Save Mother Earth Quotes

आज जर आपण जंगलं जपली नाहीत तर पृथ्वीचा विनाश अटळ आहे.

Save Planet Earth Quotes

हा नाश थांबवा भुमातेचे तनमन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे.

Save Mmother Earth slogans

पाण्याचे स्त्रोत आटत चाललेत ही विनाशाची सुरूवात तर नाही नां?

Save Earth Quotes with Images

चला पृथ्वीला हसवुया आपण झाडे लावुया.

Save Earth Slogans

सगळे मिळुन शपथ घेऊया पृथ्वी स्वच्छ आणि सुंदर करूया.

पृथ्वीचे संरक्षण आपण तेव्हांच करू शकु ज्यावेळी झाडांची मोठया प्रमाणात होत असलेली कत्तल थांबवण्याचा आपण प्रयत्नं करूं. पर्यावरणाला वाचवण्याकरता, हिरवेगार करण्याकरता मोठया प्रमाणात झाडे लावुया.

पाण्याच्या नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण करूया, वन्यप्राण्यांच्या संरक्षणाकरता पुढे या. पेट्रोल डिझेल वरील वाहनांचा वापर कमी करून प्रदुषणाला रोखुया. सोबतच आपल्याला कोळसा, खनिज साधन संपत्ती, तेल याचे देखील रक्षण करावयास हवे. जनतेला धरतीचे महत्व त्यावरील संकट आणि तिच्या संरक्षणाकरता जागरूक करायला हवे.

या करीता पृथ्वी वर लिहीलेले स्लोगन्स् उपयोगात येऊ शकतात. या स्लोगन्स् मुळे पृथ्वीला वाचविण्याकरीता समाजाला नक्की प्रेरणा मिळेल.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Save Earth Slogans in Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हे पृथ्वी वाचवा वर घोषवाक्य तुम्हाला आवडले असतीलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करा.

नोट: या लेखात दिलेल्या माहितीबद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Best Slogans on Blood Donation

रक्तदान जीवनदान नारे – Blood Donation Slogans in Marathi

Blood Donation Slogans in Marathi रक्त आपल्या शरीराकरता किती उपयोगी आहे हे आपणा सर्वांनाच माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *