भारतातील महान वैज्ञानिक अणुसंशोधन आणि अवकाश संशोधनाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा

Homi Bhabha Information in Marathi

मित्रांनो, होमी जहांगीर भाभा हे आपल्या देशांतील महान अणू वैज्ञानिक होते. त्यांनी केलेल्या अणु क्षेत्रांतील कामगिरी करिता त्यांना,  भारत देशांतील अणु ऊर्जा कार्यक्रमाचे जनक देखील म्हटल जाते. त्यांनी आपल्या संशोधनातून देशाच्या आण्विक कार्यक्रमाच्या भावी स्वरूपासाठी मजबूत पाया घातला, यामुळेच आज आपला भारत देश जगातील प्रमुख अणु-समृद्ध देशांच्या रांगेत उभा आहे.

होमी भाभा यांनी आपल्या मुठभर शास्त्रज्ञांच्या सोबतीने अणु क्षेत्रांत संशोधन करण्यास सुरुवात केली. डॉ. भाभा यांनी अणु ऊर्जेची क्षमता आणि विविध क्षेत्रांत त्याच्या वापराची संभाव्य शक्यता याची चाचणी त्यांनी यापूर्वीच केली होती.

डॉ. होमी भाभा यांचा जीवन परिचय – Homi Bhabha Information in Marathi

Homi Bhabha Information in Marathi
Homi Bhabha Information in Marathi

होमी जहांगीर भाभा यांचे प्रारंभीक जीवन – Homi Bhabha Biography in Marathi

मित्रांनो, या महान अणु वैज्ञानिकाचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ साली मुंबई येथील एका पारशी कुटुंबात झाला होता. डॉ. भाभा यांचे वडिल जहांगीर भाभा यांनी कैब्रीज विद्यापीठामधून शिक्षा प्राप्त केली होती. तसचं, पेशाने ते एक प्रसिद्ध वकील होते. शिवाय ते टाटा इंटरप्राईजेज कंपनीसाठी काम देखील करीत असतं. डॉ. भाभा यांच्या आई मेहेरेन या एका उच्च कुळातील महिला होत्या. डॉ. भाभा यांनी आपलं प्राथमिक शिक्षण कॅथेड्रल शाळेत पूर्ण केलं आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठीत्यांनी जॉन कॅनॉन शाळेत दाखला घेतला. डॉ. होमी भाभा यांची गणित आणि भौतिकशास्त्र विषयाप्रती सुरुवातीपासूनच रुची होती.

डॉ. होमी भाभा यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यांनी बी. एस. सी ही पदवी मिळवली. यानंतर सन १९२७ साली ते अभियांत्रिकेचे शिक्षण घेण्याकरिता इंग्लंडला गेले त्याठिकाणी त्यांनी  कैब्रीज विद्यापीठातून आपली अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर सन १९३० साली त्यांनी पदवी संपादन केली आणि सन १९३४ साली केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट उपाधी ग्रहण केली.

डॉ. होमी भाभा यांची कारकीर्द – Dr Homi Jehangir Bhabha Career 

सन १९३९ साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी डॉ. होमी भाभा आपल्या भारत देशांत परत आले होते. त्यावेळी त्यांची कारकीर्द संपूर्ण भारतभर पसरली होती. भारतात परत आल्यानंतर ते बंगळूर येथील इंडियन स्कूल ऑफ सायन्स सोबत जोडल्या गेले. सन १९४० साली डॉ. भाभा यांची रीडर पदी नियुक्ती केली गेली.  यानंतर त्यांच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन विज्ञान क्षेत्राच्या सेवेत व्यतित केलं. डॉ. भाभा यांनी कॉस्मिक किरणांचे संशोधन करण्यासाठी इंडियन स्कूल ऑफ साइंस बैंगलोर याठिकाणी त्यांनी वेगळ्या विंभागाची स्थापना केली.

सन १९४१ साली वयाच्या अवघ्या ३१ वर्षी डॉ. होमी भाभा यांची रॉयल सोसायटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. इंडियन स्कूल ऑफ सायन्सचे तत्कालीन अध्यक्ष आणि नोबल पारितोषिक विजेते प्रा. सी. व्ही. रमण हे देखील डॉ. होमी भाभा यांच्या कामगिरीवर खूप प्रभावित झाले होते. डॉ. होमी भाभा यांनी जे. आर. डी. टाटा यांच्या मदतीने मुंबई येथे ‘टाटा इंस्टिट्यूट ऑफ़ फंडामेंटल रिसर्च’ ची स्थापना केली आणि सन १९४५ साली त्या इंस्टिट्यूट चे निर्देशक बनले.

मित्रांनो, डॉ. होमी भाभा यांनी आपल्या कारकिर्दीत सन १९४८ साली भारतीय आणू ऊर्जा आयोगाची स्थापना करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आणू ऊर्जा संबंधित कार्यक्रमात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केलं. अश्या या महान संशोधकाने आपल्या कर्तुत्वाच्या बळावर अणु ऊर्जा क्षेत्रांत आपल्या देशाला बळकटी देण्याचं महत्वपूर्ण काम केलं आहे. डॉ. भाभा यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकित केलं गेल आहे, परंतु या महान वैज्ञानिकांना विज्ञान जगातील सर्वात मोठा सन्मान मिळू शकला नाही.

मित्रांनो, भारत देशांतील या महान वैज्ञानिकाचे निधन सन २४ जानेवारी १९६६ साली  स्वित्झर्लंडमध्ये एका विमान अपघातात झाले.

डॉ. होमी जहांगीर भाभा यांना मिळालेले पुरस्कार – Dr Homi Jehangir Bhabha Awards 

  • सन १९४३ साली एडम्स पुरस्कार
  • सन १९४८ साली हॉपकिन्स पुरस्कार
  • सन १९५९ साली कॅम्ब्रिज विश्वविद्यालया मार्फत त्यांना डॉ. ऑफ सायन्स पदवी बहाल केली.
  • सन १९५४ साली भारत सरकार तर्फे पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top