जाणून घ्या २० ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

20 October Dinvishes

मित्रांनो, प्रत्येक दिवसाचे विशेष असे काहीना काही महत्व हे असते. आपल्या इतिहास काळात अनेक आशा काही घटना घडून गेल्या आहेत ज्यापैकी काही महत्वपूर्ण घटना या आजच्या दिनी घडल्या आहेत. आपणस त्या घटनांचा विसर पडला असेल. मात्र आम्ही या लेखाच्या माध्यमातून अश्याच काही घटनांची माहिती आपणाकरिता घेऊन आलो आहोत. त्याच बरोबर आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महत्वपूर्ण व्यक्ती, तसचं, निधन वार्ता यासबंधी देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आज जागतिक सांख्यिकी दिन. दरवर्षी हा दिन २० ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या सांख्यिकी आयोगाने तयार केलेला हा दिवस प्रथम सन २० ऑक्टोबर २०१० साली साजरा करण्यात आला होता.

जाणून घ्या २० ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 20 October Today Historical Events in Marathi

20 October History Information in Marathi
20 October History Information in Marathi

२० ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 20 October Historical Event

 • इ.स. १५६८ साली मुघल शासक अकबर यांनी चित्तोडगढ वर हल्ला केला.
 • सन १७७४ साली कोलकाता(तत्कालीन कलकत्ता)  ही भारताची राजधानी बनली होती.
 • इ.स. १८२२ साली ब्रिटीश वर्तमानपत्र ‘लंडन संडे टाईम्स‘ चा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला होता.
 • सन १९६२ साली भारत आणि चीन देशा दरम्यान सीमारेषा संबंधी युद्धाला सुरुवात झाली. चीनी सैन्यांनी भारतातील लदाख आणि ईशान्य भारतातील ठाणी काबीज केल्या.
 • सन १९६९ साली महाराष्ट्रातील विदर्भीय जिल्हा अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV)  स्थापना करण्यात आली.
 • सन १९७० साली भारतीय हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉंग यांना नोबल पारितोषिक पुरस्कार बहाल करण्यात आला.

२० ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 20 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८५५ साली विसाव्या शतकातील भारतीय आधुनिक गुजराती भाषेचे कादंबरीकार, कथाकार, कवी, चिंतक, व चरित्र लेखक गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९१ साली केनिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमो किनियाता(Jomo Kenyatta) यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९१ साली न्युट्रॉन या महत्वपूर्ण अणूंचा शोध लावणारे नोबल पारितोषिक विजेता ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ सर जेम्स चॅडविक(James Chadwick) यांचा जन्मदिन.
 • सन १९२० साली भारतीय कायदेपंडित, मुत्सद्दी आणि पश्चिम बंगालमधील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी व पश्चिम बंगाल राज्याचे माजी मुख्यमंत्री, पंजाब राज्याचे माजी राज्यपाल व अमेरिकेचे भारतीय राजदूत अशी अष्टपैलू कामगिरी सांभाळणारे सिद्धार्थ शंकर राय यांचा जन्मदिन.
 • सन १९३० साली भारताची राजधानी दिल्ली येथील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ यांचा जन्मदिन.
 • सन १९६३ साली माजी भारतीय क्रिकेटपटू समालोचक, व खासदार नवजोत सिंह सिद्धू यांचा जन्मदिन.
 • सन १९७८ साली माजी भारतीय क्रिकेटपटू व धडाकेबाज फलंदाज आय. पी. एल प्रशिक्षक व समालोचक वीरेंद्र सहवाग यांचा जन्मदिन.

२० ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 20 October Death / Punyatithi /Smrutidin

 • इ.स. १८९० साली ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड फ्रांसिस बर्टन(Richard Francis Burton) यांचे निधन.
 • सन १९६४ साली अमेरिकन अभियंता, व्यापारी आणि राजकारणी तसचं, अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट क्लार्क हूवर(Herbert Hoover) यांचे निधन.
 • सन १९७४ साली भारतीय शास्त्रीय संगीतकार व गायक मास्टर कृष्णराव फुलंबरीकर यांचे निधन.
 • सन १९८२ साली भारतीय वरिष्ठ नागरी सेवक अधिकारी तसचं,  केरळ आणि मध्य प्रदेश राज्यांचे राज्यपाल निरंजन नाथ वांचू यांचे निधन.
 • सन १९८४ साली नोबल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचे निधन.
 • सन १९९६ साली महाराष्ट्रीयन मराठी पत्रकार व युद्धशास्त्र अभ्यासक आणि सावरकर प्रेमी दि. वि. गोखले यांचे निधन.
 • सन २००९ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी गुप्तहेर कथा लेखक व कादंबरीकार वीरसेन आनंदराव तथा बाबा कदम यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top