जाणून घ्या ७ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

 7 October Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घटनांची संपूर्ण  माहिती तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन तसचं, निधन पावणारे महत्वपूर्ण व्यक्ती याबद्दल संपूर्ण माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ७ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 7 October Today Historical Events in Marathi

7 October History Information in Marathi
7 October History Information in Marathi

ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 October Historical Event

 • सन १९०५ साली पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केला गेलेला हा अश्या प्रकारचा पहिलाच प्रयत्न होता.
 • सन १९१२ साली फिनलँडमधील हेलसिंकी येथे स्थित स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आली.
 • सन १९५० साली मदर टेरेसा यांनी कलकत्ता शहरात मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली होती.
 • सन १९५८ साली पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इस्कंदर मिर्झा यांनी पाकिस्तानचे संविधान निलंबित केलं होत आणू मार्शल लॉ लागू करण्यात आला होता.
 • सन १९५९ साली सोव्हियत संघाच्या लुना ३ या अंतरीक्ष यानाने चंद्राची पहिली दुर्लभ प्रतिमा पाठवली होती.

ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 7 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८८५ साली अणूंचे अंतरंग स्पष्ट करणारे नोबल पारितोषिक विजेते  डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ  नील्स बोहर(Niels Bohr) यांचा जन्मदिन.
 • सन १९०७ साली थोर भारतीय क्रांतिकारक महिला आणि स्वातंत्र्यसेनानी तसचं, शहीद भगतसिंग यांच्या सहकारी दुर्गावती देवी उर्फ दुर्गा भाभी यांचा जन्मदिन.
 • सन १९१४ साली पद्मश्री, पद्मभूषण व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री व  हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ठुमरी शैलीतील प्रसिद्ध गायिका बेगम अख्तर यांचा जन्मदिन.
 • सन १९१७ साली महाराष्ट्रीयन मराठी कवी व बालकुमार साहित्यिक विनायक महादेव कुलकर्णी यांचा जन्मदिन.
 •  सन १९५२ साली रशियाचे चौथे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा जन्मदिन.
 • सन १९६० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका आश्विनी भिडे देशपांडे यांचा जन्मदिन.
 • सन १९७८ साली माजी भारतीय क्रिकेटपटू व गोलंदाज झहीर खान यांचा जन्मदिन.

ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 7 October Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १७०८ साली शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांचे निधन.
 • इ.स. १८४९ साली सुप्रसिद्ध अमेरिकन रहस्यमय आणि कल्पित कथाकार, लेखक,कवी, संपादक आणि साहित्यिक समिक्षक एडगर अ‍ॅलन पो(Edgar Allan Poe) यांचे निधन.
 • सन १९६१ साली प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक व्यक्ती केदारेश्वर गुप्ता यांचे निधन.
 • सन १९७१ साली केरळ गांधी म्हणून प्रसिद्ध असणारे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ आणि पत्रकार तसचं, नायर सर्व्हिस सोसायटीचे संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष के. केलप्पन यांचे निधन.
 • सन १९९९ साली महाराष्ट्रीयन मराठी साहित्यिक व वीणा या वाचकप्रिय मासिकाचे संपादक आणि बालसाहित्यिक उमाकांत निमराज ठोमरे यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here