जाणून घ्या ९ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

 9 October Dinvishes

मित्रांनो, आज जागतिक पोस्ट दिवस आहे. इ.स. १८७४ साली स्वित्झर्लंड देशांत सुरु झालेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियनचा वर्धापन दिन म्हणून ९ ऑक्टोबर या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. प्रथम जागतिक पोस्ट दिन सन १९६९ साली साजरा करण्यात आला.

याव्यतिरिक्त, मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी आपल्या इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन व निधन पावणाऱ्या व्यक्तींची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ९ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 9 October Today Historical Events in Marathi

9 October History Information in Marathi
9 October History Information in Marathi

ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 October Historical Event

 • इ.स. १८७४ साली संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांसोबत जगभरातील टपाल प्रणाली व्यतिरिक्त टपाल धोरणांचे समन्वय साधण्यासाठी संयुक्त राष्ट्राची एजन्सी असलेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन ची स्थापना करण्यात आली.
 • सन १९४९ साली सी राजगोपालचारी यांनी टेरीटोरियल आर्मी ची स्थापना केली.
 • सन १९६० साली विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
 • सन १९६२ साली युगांडा राष्ट्राला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य मिळाले.
 • सन २०१२ साली पाकिस्तान देशातील शालेय विद्यार्थिनी व मानवाधिकार कार्यकर्ता मलाला युसुफ यांना तालिबान संघटनेच्या आतंकवाद्याने गोळी मारली होती.

ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 9 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १६२४ साली मुघल बादशहा शाहजहां आणि महारानी मुमताज महल यांचा धाकटा मुलगा मुहम्मद मुराद बख्श यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८२६ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार राजा लक्ष्मण सिंह यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८५२ साली नोबल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ एमिल फिशर (Emil Fische)यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८७७ साली भारतीय ओडिसा राज्याचे सामाजिक कार्यकर्ता, स्वातंत्र्य सेनानी व साहित्यकार तसचं, पत्रकार, कवी व लेखक गोपबंधू दास यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९७ साली भारतीय कायदेपंडित, राजकारणी व तामिळनाडू राज्यातील प्रख्यात भारतीय स्वतंत्रता सेनानी व माजी मुख्यमंत्री मिंजूर भक्तवत्सलम यांचा जन्मदिन.
 • सन १९४५ साली पद्मविभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांचा जन्मदिन.

ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 9 October Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १८९२ साली एकोणिसाव्या शतकातील सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादुर गोपाल हरि देशमुख उर्फ लोकहितवादी यांचे निधन.
 • सन १९५५ साली महाराष्ट्रीयन हार्मोनियम प्लेयर, रंगमंच अभिनेता आणि संगीतकार, नाट्य संगीताचे शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांचे निधन.
 • सन १९६३ साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी, बॅरिस्टर, राजकारणी आणि पाकिस्तान चळवळीचे समालोचक तसचं,  भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य व  पंजाब प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रमुख सैफुद्दीन किचलू यांचे निधन.
 • सन १९८७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कथकली नर्तक गुरु गोपीनाथ यांचे निधन.
 • सन २००६ साली बहुजनांच्या उत्थान आणि राजकीय जमातीसाठी काम करणारे महान भारतीय राजकारणी आणि समाजसुधारक कांशीराम यांचे निधन.
 • सन २०१५ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट संगीतकार, गीतकार व पार्श्वगायक रवींद्र जैन यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top