जाणून घ्या २१ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

 21 October Dinvishes

मित्रांनो,  आज आपल्या देशाचा राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिन आहे. आपणास माहिती आहे का? हा दिवस आपल्या देशांत का बर साजरा केला जातो! मित्रांनो, सन १९५९ साली आजच्या दिवशी चीन देशासोबत संलग्न असलेल्या आपल्या भारतीय सीमेचे रक्षण करीत असतांना आपल्या देशांतील दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्या पोलिसांच्या स्मरणार्थ त्यांच्या बलिदानाचा सन्मान म्हणून दरवर्षी २१ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय पोलिस दिन किंवा पोलिस स्मृती दिन साजरा केला जातो.

शिवाय, मित्रांनो, आज आपण आजच्या दिवशी आपल्या इतिहास काळात तसचं, आधुनिक काळात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे तसचं, निधन पावणारे महत्वपूर्ण व्यक्ती यांच्याबद्दल संपूर्ण माहिती जणून घेणार आहोत.

जाणून घ्या २१ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 21 October Today Historical Events in Marathi

21 October History Information in Marathi
21 October History Information in Marathi

२१ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 October Historical Event

 • इ.स. १२९६ साली अल्लाउद्दिन खिलजी हे दिल्ली येथील शासक बनले.
 • सन १९३४ साली नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना सिंगापूर येथे केली.
 • सन १९५१ साली भारतीय हिंदू राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय प्रतिमा असलेला राजकीय पक्ष भारतीय जनसंघाची स्थापना करण्यात आली.
 • सन १९९९ साली भारतीय हिंदी चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.
 • सन २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतील आपत्ती प्रतिसाद कार्यात सहभागी पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांचा सन्मान करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्कार जाहीर केला.

२१ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 21 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८३० साली हिमालय भागाचा शोध लावणारे पहिले भारतीय व्यक्ती नैन सिंह रावत यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८३३ साली स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ, अभियंता, शोधक, व्यापारी आणि परोपकारी तसचं, नोबल पुरस्काराचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८७ साली ब्रिटीश कालीन भारतातील अखंड बिहार राज्याचे पंतप्रधान व बिहार राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्रीकृष्ण सिंह यांचा जन्मदिन.
 • सन १९१७ साली महाराष्ट्रीयन मराठी संगीतकार व गायक राम फाटक यांचा जन्मदिन.
 • सन १९३१ साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते व निर्माता शम्मी कपूर यांचा जन्मदिन.
 • सन १९३८ साली प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री आणि नर्तक हेलन यांचा जन्मदिन.
 • सन १९४९ साली इस्राइल देशाचे प्रसिद्ध राजकारणी व इस्राइलचे ९ वे पंतप्रधान तसचं, लिकुड – राष्ट्रीय उदारमतवादी चळवळीचे अध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू(Benjamin Netanyahu) यांचा जन्मदिन.

२१ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 21 October Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १८३५ साली भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज संगीतकार, गायक आणि वीणा वादक तसचं, दक्षिण भारतीय कवी मुथुस्वामी दीक्षित यांचे निधन.
 • सन १९९५ साली अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या ज्योतिषी व कवी लिंडा गुडमन(Linda Goodman) यांचे निधन.
 • सन २०१२ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व पटकथालेखक यश चोपडा यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top