जाणून घ्या ८ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

 8 October Dinvishes

मित्रांनो, आज आपल्या देशाच्या वायू सेनेचा स्थापना दिवस आहे. सन १९३२ साली आजच्या दिवशी या दलाची स्थापना करण्यात आली होती.  भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या सेनेला रॉयल इंडियन एयरफोर्स म्हणून संबोधलं जात असे. या सेनेने सन १९४५ साली झालेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला खूप महत्वाची भूमिका बजावली होती.  भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर  रॉयल इंडियन एयरफोर्स नावातील रॉयल या शब्दाला वगळून फक्त इंडियन एयरफोर्स असे नाव ठेवण्यात आले.

मित्रांनो, आपल्या वायुसेनेने आजपर्यंत पाच युद्ध महत्वपूर्ण युद्ध लढले आहेत. त्यापैकी चार पाकिस्तान देशासोबत तर एक चीन सोबत. या युद्धात वायू सेनेने खूप महत्वाची भूमिका निभावली होती. आपल्या देशाची वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात शक्तिशाली वायुसेना आहे. शिवाय, आज आपण या लेखाच्या मध्यमातून आजच्या दिवसाचे दिनविशेष देखील जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ८ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 8 October Today Historical Events in Marathi

8 October History Information in Marathi
8 October History Information in Marathi

 ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8 October Historical Event

  • इ.स. १८६० साली अमेरिकेतील लॉस एंजिल्स आणि सैनफ्रांसिस्को शहरादरम्यान प्रथम टेलिग्राफ लाईन स्थापित झाली होती.
  • सन १९३२ साली भारतीय वायु सेना दलाची स्थापना करण्यात आली.
  • सन १९३९ साली दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जर्मनीच्या सैन्यांनी पोलंडचा पश्चिम भाग आपल्या ताब्यात घेतला.
  • सन १९५९ साली  थोर भारतीय महाराष्ट्रीयन क्रांतिकारक व स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने डी-लिट पदवी चा बहुमान त्यांच्या राहत्या घरी येऊन त्यांचा सत्कार केला.
  • सन २००५ साली काश्मीर येथे झालेल्या भूकंपात हजारो लोक मृत्युमुखी पडले होते.
  • सन २००७ साली बांग्लादेशाचे पूर्व गृहमंत्री मोहम्मद नसीम यांना तेरा वर्षाच्या तुरुंग वासाची शिक्षा झाली.

ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 8 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८९१ साली ख्यातनाम भारतीय महाराष्ट्रीयन उद्योजक, साहित्यिक व चित्रकार तसचं, किर्लोस्कर छापखाण्याचे संस्थापक व किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर या मासिकांचे संपादक शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली  द फ्लाइंग शीख या नावाने ओळखले जाणारे प्रख्यात भारतीय सैन्य सेवा धावपटू कॅप्टन मिल्खा सिंग यांचा जन्मदिन.
  • सन १९२६ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व माजी मुंबई पोलिस उपनिरीक्षक राजकुमार यांचा जन्मदिन.
  • सन १९२८ साली माजी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे क्रिकेटपटू नील हार्वे(Neil Harvey) यांचा जन्मदिन.

ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 8 October Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८८८ साली महाराष्ट्रीयन मराठी कवी, संस्कृत भाषा विद्वान महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन.
  • सन १९३६ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक साहित्यिक धनपतराय श्रीवास्तव उर्फ मुंशी प्रेमचंद यांचे निधन.
  • सन १९६७ साली इंग्लंड देशांतील मजूर पक्षीय पंतप्रधान क्लेमेंट अ‍ॅटली(Clement Attlee) यांचे निधन.
  • सन १९७९ साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी, सिद्धांतवादी, समाजवादी आणि राजकीय नेते जयप्रकाश नारायण यांचे निधन. इंदिरा गांधी यांच्या काळात विरोधी पक्ष नेता होते.
  • सन १९९६ साली महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखिक, सामाजिक कार्यकर्त्या तसचं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, आणि महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून सनद मिळविणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रायीन महिला गोदावरी परुळेकर यांचे निधन.
  • सन १९९८ साली महाराष्ट्रातील रत्नागिरी जिह्याच्या देवरुख या गावातील ‘मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका,  तसचं, कोकणच्या मदर टेरेसा नावाने लोकप्रिय असणाऱ्या समाजसेविका इंदिराबाई हळबे यांचे निधन.
  • सन २०१२ साली प्रख्यात भारतीय गायिका, पत्रकार आणि लेखक तसचं, भारतीय पार्श्वगायिका आशा भोसले यांची कन्या वर्षा भोसले यांचे निधन.
  • सन २०१२ साली प्रख्यात भारतीय राजकारणी व गुजरात राज्याचे माजी राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top