• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Sunday, August 7, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या १० ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

 10 October Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा विविध प्रकारच्या जागतिक दिनांच्या रूपाने साजरा करण्यात येतो. आजचा दिवस हा जागतिक मानसिक आरोग्य दिन, जागतिक लापशी दिन व  जागतिक मृत्यू दंड विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगातील नागरिकांना मानसिक आरोग्य देण्यासाठी व मानसिक आरोग्यासाठी आवश्यक ती मदत पोहचवण्यासाठी दरवर्षी 10 ऑक्टोंबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. वर्ल्ड फेडरेशनकडून या दिनाचे आयोजन करण्यात येते. सन १९९२ साली वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ या संस्थेच्या पुढाकाराने पहिला जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.

तसचं, मित्रांनो आजच्या दिवशी जागतिक लापशी दिन देखील साजरा करण्यात येतो.सन २००९ साली सर्वप्रथम विकसनशील देशांमधील नागरिकांची होत असलेली उपासमार थांबविण्यासाठी मदत म्हणून या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. तसचं, मित्रांनो आज जागतिक दंड विरोधी दिन देखील आहे.

याशिवाय, मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी असणारे दिनविशेष तसचं, जन्मदिन आणि निधन पावणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्ती बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १० ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 10 October Today Historical Events in Marathi

10 October History Information in Marathi
10 October History Information in Marathi

१० ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 10 October Historical Event

  • सन १९५४ साली आचार्य अत्रे निर्मित ‘श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले. भारतीय चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यास या वर्षापासून सुरुवात झाली.
  • सन १९७० साली फिजी देशाला युनाईट किंग्डम पासून स्वातंत्र्य मिळालं.
  • सन १९९२ साली पश्चिम बंगाल मधील हुगळी नदीवरील कोलकाता आणि हावडा शहरांना जोडणारा पूल विद्यासागर सेतु प्रवासाकरिता सुरु करण्यात आला.
  • सन २०१४ साली थोर भारतीय समाजसुधारक कैलाश सत्यार्थी यांना शांततेचा नोबल पुरस्कार बहाल करण्यात आला.
  • सन २०१४ साली पाकिस्तानी शालेय विद्यार्थिनी व महिला मानवाधिकार कार्यकर्ता मलाला युसुफ यांना नोबल पारितोषिक पुरस्कार बहाल करण्यात आला.

१० ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 10 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७३१ साली हायड्रोजन वायूचा शोध लावणारे प्रख्यात ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ हेन्री कॅव्हेन्डिश(Henry Cavendish) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८४४ साली भारतीय कायदेपंडित, राजकारणी व कार्यकर्ते तसचं, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे तिसरे अध्यक्ष व पहिले मुस्लीम अध्यक्ष बद्रुद्दीन तैयबजी(Badruddin Tyabji) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९९ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व भारतीय मजदूर आंदोलनाचे प्रमुख नेता तसचं, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते व गोवा मुक्ती समितीचे अध्यक्ष कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्मदिन.
  • सन १९०२ साली संगती नाटक अकादमी पुरस्कार व भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय कादंबरीकार, नाटककार आणि पर्यावरणीय संवर्धनकार कोटा शिवाराम कारंथ यांचा जन्मदिन.
  • सन १९०६ साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय इंग्रजी भाषिक साहित्यकार, कादंबरीकार व लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी उर्फ आर. के. नारायण यांचा जन्मदिन.
  • सन १९५४ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा जन्मदिन.
  • सन १९९८ साली भारतीय क्रीडा संघटक व क्रीडा महर्षी एन. डी. नगरवाला यांचा जन्मदिन.

१० ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 10 October Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९६४ साली साठच्या दशकातील प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक व निर्माता गुरु दत्त यांचे निधन.
  • सन १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित ज्यू वंशीय भारतीय मूक चित्रपट अभिनेत्री रुबी मेयर यांचे निधन.
  • सन २००० साली श्रीलंकेच्या सहाव्या तसचं, जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचे निधन.
  • सन २००६ साली हिंदुस्थानी शास्त्रीय शैलीतील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका व किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद करीम खान यांची कन्या सरस्वती राणे यांचे निधन.
  • सन २००८ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसचं, कालिदास पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कथ्थक नृत्यांगना रोहिणी भाटे यांचे निधन.
  • सन २०११ साली सुप्रसिद्ध भारतीय गझल गायक आणि संगीतकार जगजितसिंह यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved