जाणून घ्या १४ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

 14 October Dinvishes

मित्रांनो, आज जागतिक मानक दिन. दरवर्षी १४ ऑक्टोबर या दिवशी हा दिन साजरा करण्यात येतो. जागतिक मानदंडांच्या मानकीकरणाचे महत्व म्हून नियामक, उद्द्योग आणि ग्राहकांमध्ये जागरुकता वाढविणे हा जागतिक मानक दिवसांचा उद्देश आहे. जगातील १७० देशांमधील सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक कंपन्या आणि संस्था ISO9001 मानांकित आहेत.

१४ ऑक्टोबर १९४६ साली २५ देशांचे प्रतिनिधी प्रथम लंडनमध्ये एकत्रित आले आणि मानकीकरणाच्या सुलभतेवर लक्ष केंद्रित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था तयार करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आय. एस. ओ. ची स्थापना एका वर्षानंतर करण्यात आली, व पहिला जागतिक मानक दिन सन १९७० साली  साजरा करण्यात आला. याशिवाय, मित्रांनो, आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवसाचे संपूर्ण दिनविशेष जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १४ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 14 October Today Historical Events in Marathi

14 October History Information in Marathi
14 October History Information in Marathi

१४ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 October Historical Event

 • इ.स. १८८२ साली शिमला येथे भारतातील चौथे विश्व विद्यालय पंजाब विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
 • सन १९४३ साली जापान देशाने फिलिपाईन्स देशाला स्वातंत्र देण्याची घोषणा केली.
 • सन १९४८ साली इजरायल आणि मिस्र देशामध्ये भीषण युद्ध सुरु झाले.
 • सन १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपुर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.
 • सन १९८१ साली इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर साद्त यांच्या हत्येनंतर एक आठवड्यानी उपराष्ट्राध्यक्ष होस्‍नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
 • सन २०१० साली राजधानी दिल्ली येथे आयोजित १९ व्या राष्ट्रमंडळ खेळांची सांगता झाली.

१४ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 14 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १६४३ साली मुघल शासक बहादूरशाह जफर पहिले यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८४ साली थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी व गदर पार्टीचे संस्थापक लाल हरदयाल यांचा जन्मदिन.
 • सन १९२४ साली साहित्य अकादमी पुरस्कार तसचं, ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय लेखक, व कादंबरीकार तसचं, आधुनिक आसामी साहित्याचे प्रणेते बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्मदिन.
 • सन १९२७ साली सुप्रसिद्ध ब्रिटिश सीक्रेट एजंट जेम्स बाँडच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे ब्रिटीश अभिनेता रॉजर जॉर्ज मूर यांचा जन्मदिन.
 • सन १९३१ साली भारतीय शास्त्रीय संगीताच्या मैहर घराण्याचे भारतीय शास्त्रीय सतारवादकपंडित निखील रंजन बॅनर्जी यांचा जन्मदिन.
 • सन १९३६ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक व कराड येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष भेंडे यांचा जन्मदिन.
 • सन १९५० साली परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय सैन्य अधिकारी लेफ्टनंट अरुण खेतरपाल, यांचा जन्मदिन.
 • सन १९५८ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित इमदादखानी घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय सितार वादक उस्ताद शाहिद परवेझ खान यांचा जन्मदिन.

१४ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 14 October Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १२४० साली भारतीय उपखंडातील दिल्ली येथील पहिल्या मुघल शासक महिला रझिया सुल्तान यांचे निधन.
 • सन १९४७ साली थोर महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक, नाटककार, कादंबरीकार, लघुकथा लेखक, कवी, चरित्रकार, समीक्षक, इतिहासकार व तत्त्वज्ञानी तसचं, लोकमान्य टिळक यांच्या केसरी वृत्तपत्राचे संपादक साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांचे निधन.
 • सन १९५३ साली महाराष्ट्रात मुंबई येथील जनसामान्यांसाठी कुटुंब नियोजन आणि जन्म नियंत्रण सुरू करणारे थोर समाजसुधारक व प्रणेते तसचं, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे थोरले पुत्र रघुनाथ धोंडो कर्वे यांचे निधन.
 • सन १९९४ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्वचिंतक,समीक्षक आणि इतिहासाचे भाष्यकार असे विविधांगी पैलू असणारे व्यक्ती सेतू माधवराव पगडी यांचे निधन.
 • सन १९९८ साली महाराष्ट्रीयन वारकरी संप्रदायाचे अभ्यासक व संशोधक डॉ. भालचंद्र पंढरीनाथ बहिरट यांचे निधन.
 • सन २००४ साली भारतीय हिंदू विचारधारक,  कामगार संघटनेचे नेते आणि स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ आणि भारतीय किसान संघाचे संस्थापक दत्तोपंत बापुराव ठेंगडी यांचे निधन.
 • सन २०१३ साली इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित माजी भारतीय केंद्रीय मंत्री, कायदेपंडित व सामाजिक कार्यकर्ता मोहन धारिया यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top