जाणून घ्या ३ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

3 October Dinvishes

मित्रांनो, आज ३ ऑक्टोबर, आपल्या भूतकाळात अनेक काही घटना घडून गेलेल्या असतात आणि आपण त्याच घटनांचा पुन्हा अभ्यास करतो त्यालाच आपण इतिहास म्हणून संबोधतो. अश्याच प्रकारे आजच्या दिवशी देखील काही महत्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत ज्यांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महत्वपूर्ण व्यक्ती, निधन वार्ता याबद्दल देखील काही माहिती आपण जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ३ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 3 October Today Historical Events in Marathi

3 October History Information in Marathi
3 October History Information in Marathi

३ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 3 October Historical Event

  • इ.स. १६७० साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेची लुट केली.
  • सन १९३२ साली इराक देशाला युनाईटेड किंग्डम कडून स्वातंत्र्य मिळाले.
  • सन १९४२ साली जर्मनीने A 4  रॉकेट प्रक्षेपित केलं होत. मानवाद्वारे निर्मित अंतरिक्षात जाणारे हे पहिले यान होते.
  • सन १९७७ साली भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कैद करण्यात आलं होत.
  • सन १९९० साली पूर्वोत्तर जर्मनी आणि पश्चिमी जर्मनीला एकत्र जोडून एक करण्यात आलं होत. त्यादिवसापासून जर्मन युनिटी दिवस साजरा करण्याची परंपरा सुरु झाली.

३ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 3 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८९० साली प्रसिद्ध भारतीय ओडिसी लेखक, कवी, पत्रकार समाजसेवक, सुधारक, इतिहासकार आणि राजकारणी डॉ. लक्ष्मीनारायण साहू यांचा जन्मदिन.
  • सन १९०३ साली हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्मदिन.
  • सन १९१४ साली महाराष्ट्रीयन मराठी साहित्यिक व कला समीक्षक व टीकाकार मधुकर वासुदेव धोंड यांचा जन्मदिन.
  • सन १९४९ साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील निर्माता, दिग्दर्शक व लेखक ज्योती प्रकाश दत्ता यांचा जन्मदिन.
  • सन १९५३ साली प्रख्यात भारतीय सर्वोच्च न्यालायाचे माजी ४५ वे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा जन्मदिन.

३ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 3 October Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८६७ साली प्रख्यात शिवन यंत्राचा शोध लावणारे अमेरिकन संशोधक एलिआस हॉवे(Elias Howe) यांचे निधन.
  • सन १९२३ साली भारतीय आणि दक्षिण आशियाई महिला चिकित्सक आणि सर्जन तसचं, भारतातील पहिल्या महिला पदवीधरांपैकी एक कादंबिनी गांगुली यांचे निधन.
  • सन १९५३ साली भारतीय कायदेपंडित व भारतीय संविधान समितीचे सदस्य दीवान बहादूर सर अल्लादी कृष्णास्वामी अय्यर यांचे निधन.
  • सन १९६६ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी मासिक  ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ आणि ‘सत्यकथा’ इत्यादी मासिकांचे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन.
  • सन १९९९ साली जपानी उद्योगपती व सोनी कॉर्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिता (Akio Morita) यांचे निधन.
  • सन २००७ साली केरळ साहित्य आकादमी पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय शैक्षणिक, वक्ते, स्तंभलेखक आणि मल्याळम साहित्याचे लेखक भाषिक तसचं, पूर्वागम कला साहित्य संघटनेचे अध्यक्ष एम. एन. विजयन यांचे निधन.
  • सन २०१२ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी तसचं, सिक्कीम राज्याचे राज्यपाल व दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here