जाणून घ्या १३ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

13 October Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा इतिहास काळात घडून गेलेल्या अनेक महत्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असणारा दिवस आहे.  आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक तसचं, आधुनिक घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महत्वपूर्ण व्यक्ती व निधन वार्ता देखील जाणून घेणार.

जाणून घ्या १३ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 13 October Today Historical Events in Marathi

13 October History Information in Marathi
13 October History Information in Marathi

१३ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 October Historical Event

  • इ.स. १७७३ साली चार्ल्स मेसियर(Charles Messier) यांनी व्हर्लपूल गैलेक्सी चा शोध लावला.
  • इ.स. १८८४ साली लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
  • सन १९१४ साली गॅरेट मॉर्गन यांनी गॅस मास्क चा शोध लावला व त्याचे पेटंट घेतलं.
  • सन १९२३ साली तुर्की शासक मुस्तफा कमाल पाशा यांनी आपली इस्तंबूल हे राजधानीचे ठिकाण बदलून अंकारा शहराला नवीन राजधानी बनविले.
  • सन १९७६ साली बोलिविया देशांत बोईंग जेट विमान दुर्घटनाग्रस्त होऊन सुमारे १०० लोक ठार झाले होते.
  • सन १९९९ साली अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

१३ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 13 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८७७ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि प्रशासकीय कायदेपंडित, तसचं, होमरूल चळवळीचे कार्यकर्ते आणि महात्मा गांधी यांचे सहकारी भुलाभाई देसाई यांचा जन्मदिन.
  • सन १९११ साली पद्मश्री व दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली उर्फ दादामुनी यांचा जन्मदिन.
  • सन १९२५ साली ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मारग्रेट थैचर यांचा जन्मदिन.
  • सन १९४८ साली सुप्रसिद्ध पाकिस्तानी कव्वाली गायक, संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक नुसरत फतेह अली खान यांचा जन्मदिन.

१३ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 13 October Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९११ साली भारतीय आयरिश शिक्षक, लेखक, सामाजिक कार्यकर्त्या व संस्थापिका तसचं, स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचे निधन.
  • सन १९४५ साली अमेरिकन चॉकलेट व्यापारी आणि ‘द हर्शे चॉकलेट कंपनीचे’ संस्थापक मिल्टन हर्शे(Milton S. Hershey) यांचे निधन.
  • सन १९८७ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट पार्श्वगायक, अभिनेता, संगीत दिग्दर्शक, गीतकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक किशोर कुमार उर्फ आभास कुमार गांगुली यांचे निधन.
  • सन २००१ साली प्रख्यात भारतीय पारशी शल्यचिकित्सक व समाजसेवक तसचं, कुष्ठरोग झालेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सेवा देणारे महान समाजसेवी, तसचं, ‘सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ चे संचालक जल मिनोचर मेहता यांचे निधन.
  • सन २००४ साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील आईच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्या निरूपा रॉय यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top