जाणून घ्या १९ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

 19 October Dinvishes

मित्रांनो, प्रत्येक आपल्या इतिहास काळात तसेच आधुनिक काळात अनेक काही ऐतिहासिक घटना घडून गेल्या आहेत. अश्याच, काही घटनांचा आजचा दिवस देखील साक्षीदार आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून अश्याच काही महत्वपूर्ण घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आजच्या दिवशी जन्मदिन तसचं, निधन पावणाऱ्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १९ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 19 October Today Historical Events in Marathi

19 October History Information in Marathi
19 October History Information in Marathi

१९ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 19 October Historical Event

 • इ.स. १७८१ साली ब्रिटिश जनरल कॉर्नविलास अमेरिकेला शरण गेले, यामुळे अमेरिकन क्रांती युद्ध संपले.
 • इ.स. १८१२ साली नेपोलियन बोनापार्ट यांनी मोस्कोच्या सीमेवरून आपली माघार घेतली होती.
 • इ.स. १८५३ साली अमेरिकतील हवाना येथे जगातील पहिली पिठाची गिरणी सुरु करण्यात आली.
 • सन १९७० साली भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द करण्यात आलं.
 • सन १९९४ साली रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘तानसेन पुरस्कार’ बहाल करण्यात आला.
 • सन २००० साली भारतीय पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • सन २०१९ साली सैनिकी शाळेत मुलींनाही प्रवेश मिळण्याच्या प्रस्तावाला स्वरक्षण मंत्री यांची मंजुरी मिळाली.

१९ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 19 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • सन १९०२ साली महाराष्ट्रातील थोर मराठी लेखक, लघुकथालेखक, नाटककार व कादंबरीकार दिवाकर कृष्णा केळकर उर्फ दिवाकर कृष्ण यांचा जन्मदिन.
 • सन १९१० साली नोबल पारितोषिक विजेता भारतीय वंशीय अमेरिकन खगोलशास्त्र वैज्ञानिक सुब्रह्मण्यन चंद्रशेखर(Subrahmanyan Chandrasekhar) यांचा जन्मदिन.
 • सन १९२० साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात स्वाध्याय परिवारची स्थापना करणारे महान भारतीय कार्यकर्ते, तत्वज्ञ, आध्यात्मिक नेते, सामाजिक क्रांतिकारक आणि धर्म सुधारक पांडुरंग शास्त्री आठवले यांचा जन्मदिन.
 • सन १९२५ साली महाराष्ट्रीयन वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक डॉ. वामन दत्तात्रय उर्फ वा. द. वर्तक यांचा जन्मदिन.
 • सन १९२९ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित गांधीवादी विचारधारी भारतीय समाजसेविका निर्मला देशपांडे यांचा जन्मदिन.
 • सन १९३६ साली महाराष्ट्रीयन मराठी गीतकार, व कवी शांताराम नांदगावकर यांचा जन्मदिन.
 • सन १९५४ साली भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्ता व लेखिका प्रिया तेंडूलकर यांचा जन्मदिन.
 • सन १९५६ साली भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता, राजकारणी आणि पंजाब राज्यातील गुरदासपूर येथील विद्यमान संसद सदस्य अजयसिंग देओल उर्फ सनी देओल यांचा जन्मदिन.

१९ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 19 October Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १७४५ साली आयर्लँड देशातील निबंधकार, कवी, आणि व्यंगचित्रकार जोनाथन स्विफ्ट(Jonathan Swift) यांचे निधन.
 • सन १९३७ साली नोबल पारितोषिक विजेता ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड(Ernest Rutherford) यांचे निधन.
 • सन १९९५ साली भारतीय चित्रपट सृष्टीत बाल कलाकार म्हणून पुढे आलेल्या नंतर सहायक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी पावलेल्या सलमा बेग उर्फ बेबी नाझ यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here