ध चा मा ची नेमकी काय आहे कथा ?

Kaka Mala Vachva Story

पुण्यातील शनिवारवाड्यात भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच ३० ऑगस्ट १७७३ ला जे काही घडलं त्या घटनेने संपूर्ण मराठेशाही हादरली.

मराठ्यांच्या गादीवर विराजमान असलेल्या नारायणराव पेशव्यांना गारद्यांनि ठार केलं.

ध चा मा ची नेमकी काय आहे कथा ? – Dha Cha Ma

का करण्यात आली नारायणराव पेशव्यांची एवढी क्रूर हत्या?

कुणी रचला हा पेशव्यांच्या वधाचा कट?

इतिहासाच्या पानांमध्ये या काळ्या पानाची नोंद कुणाच्या कृत्याने आज पहायला मिळते?

राघोबादादा आणि आनंदीबाई यांचे आपला पुतण्या नारायणरावांशी संबंध चांगले राहिले नव्हते.

त्याचं मुख्य कारण शोधलं असता फार लहान वयात नारायणरावांना पेशव्यांच्या गादीवर बसविलेल या पतीपत्नींना अजिबात पचनी पडलेलं नव्हतं.

त्यामुळे संबंध इतके ताणले गेले होते की काका पुतण्यांमधून विस्तव देखील जात नव्हता, आणि मध्यस्थी प्रकरण मिटविण्यापेक्षा आगीत तेल ओतण्याचंच काम करत होते.

शेवटी व्हायचं तेच झालं ….

मारेकऱ्यांकरवी रघुनाथरावांनी “नारायणरावाला धरा” असा आदेश निर्गमित केला पण तो आदेश आनंदीबाईंच्या हाती लागला आणि त्यांनी कट-कारस्थान रचलं…

नारायणरावाला धरा ऐवजी नारायणरावाला मारा असं करण्यात आलं आणि “ध चा मा” करणारी आनंदीबाई या एकाच गोष्टीमुळे इतिहासात प्रसिद्धीला आली.

आज देखील या एका घटनेमुळे “ध चा मा” करू नकोस हा वाक्प्रचार प्रचलित झाला आहे.

आता या घटनेला अपवाद देखील आहेत

काही जाणकारांच्या मते हे खरं नाही.

नारायणरावाला मारण्याचे आदेश खुद्द रघुनाथरावांनीच दिले आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच नारायणरावाला मारण्यात आले आणि त्यांचे तुकडे-तुकडे करून त्याच रात्री नदीत सोडण्यात आले.

नारायणराव आपल्या कक्षातून संपूर्ण वाड्यात “काका मला वाचवा” असे जोरात ओरडत धावत होते पण मारेकऱ्यांनी कुठलीही दयामाया न दाखवता आनंदीबाईंच्या निर्णयामुळे नारायणरावाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि त्यांच्या किंकाळ्या शनिवारवाड्यात घुमत राहिल्या….

नारायणरावांच्या या किंकाळ्या त्यांच्या मृत्यूबरोबरच विरणाऱ्या नव्हत्या…या आरोळ्या त्यांच्या मृत्यूपश्चात आजदेखील शनिवारवाड्यात ऐकू येतात असं कित्येकांच म्हणणं आहे.

या संपूर्ण प्रकरणात संशयाची सुई आनंदीबाईंकडे गेली आणि न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी अनेक जबान्या आणि तपासा अंती या संपूर्ण कटामागे रघुनाथरावच असल्याने त्यांना देहांत प्रायश्चिताची शिक्षा सुनावली…

पण हि शिक्षा त्यांनी भोगली नाही परंतु पुढे प्रायश्चित घेतल्याचं इतिहासात नमूद आहे.

परंतु इतिहासतील अनेक नोंदी आनंदीबाईंच्या या कटातील सहभागाकडे बोट दाखवतात हे मात्र तितकंच खरं..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here