Friday, June 2, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

मक्याची माहिती आणि फ़ायदे

Maka Information in Marathi

मका हे तृणधान्य आपल्या सर्वांच्या ओळखीच आहे. मका हे गहू आणि तांदळा नंतर पिकवल जाणारं धान्य आहे. मक्यामध्ये पोषक घटक आहेत. मक्या पासून अनेक पदार्थ बनतात. आणि ते आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात. मका हा अनेक दृष्टीने वैशिष्टपूर्ण आहे. अशा प्रकारे मका याची बरीच माहिती आपण समोर पाहणार आहे.

मक्याची माहिती आणि फ़ायदे – Corn Information in Marathi

Corn Information in Marathi
Corn Information in Marathi
मकाचे विविध नाव :मकई, मक्का, भुट्टा, मेझ, इंडियन कॉर्न, मेक्केजोळा, महायावनाल, कुल-ग्रॅमिनी.
शास्त्रीय नाव :झीया मेझ.
धाण्याचे प्रकार :तृणधान्य.
माता (Mother Name)अमिता
हंगाम :खरीप.
मकाचे उत्पादन : आंध्र प्रदेश,कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश,राजस्थान.
मका मध्ये असणारी पोषक तत्वे :प्रथिने, कार्बोहायडेटस आणि स्निग्ध पदार्थाशिवाय फॉस्फरस, मग्नेशियम, मँगनीज, जस्त. तांबं लोह आणि सेलेनियम

पूर्वी फार लोकप्रिय नसेललं पण आता मात्र महाराष्ट्रात आवडीने खालं जाणारं तृणधान्य म्हणजे मका हे आहे. पंजाबमध्ये मकेकी रोटी आणि सरसों का साग हा आवडीने खाल्ल्या जाणारा आहार आहे.

मक्याची पांढरी भाकरी आणि मोहरीच्या पाल्याची भाजी तिकडे बऱ्याचदा केली जाते.

मका हे गहू आणि तांदळानंतर पिकवलं जाणारं धान्य आहे. त्याच प्रमाणे खाल्लं जाणारं धान्य आहे. मक्याला इंग्रजीत ‘मेझ’ असं नाव आहे. पण अमेरिकेत त्याला ‘कॉर्न’ असं म्हणतात आणि आता आपल्याकडेही मक्याला कॉर्न म्हणण्याची पद्धत आहे. ७ ते दहा हजार वर्षापूर्वीपासून मेक्सिकोमध्ये मका वापरला जात होता.

संस्कृतमध्ये ‘महायावताल’ असं नाव असलेला मका महाराष्ट्रातील शहरी लोकांच्या अन्नाचा भाग नसला तरी हा काही आदिवासी लोकांचा मुख्य आहार आहे. गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील भिल्ल, नायका व मका या आदिवासी लोकांचा मका हा अत्यंत आवडीचा आहार आहे असंही काही संदर्भानुसार कळतं.

Maka Information in Marathi

मक्यामध्ये १०% प्रथिने, ६८% कार्बोहायड्रेटस् आणि ५% स्निग्ध पदार्थ असतात. मक्यामध्ये असलेल्या स्टार्चच्या प्रमाणानुसार त्याच्या पाच जाती पडतात. त्या म्हणजे फ्लोवन कॉर्न, पॉपकॉर्न, डेंटकॉर्न, फ्लिंटकॉर्न आणि स्वीटकॉर्न अशा त्या जाती आहेत. याशिवाय वॅक्सी कॉर्न, अमायलो मेझ, पॉडकॉर्न, स्ट्राईड मेझ अशाही आणखी ४ जाती आढळून आहेत.

मक्याची कणसे ही वेगवेगळ्या रंगामध्येही उपलब्ध आहेत. पिवळा, निळा, लाल आणि जांभळा असे रंग त्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे येतात. मका हा अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्व धान्यांच्या कणसांमध्ये मक्याचं कणिस सर्वात मोठं आहे आणि त्या कणसातला दाणाही सर्व धान्यांच्या दाण्यांमध्ये सगळ्यात मोठा असतो.

मक्याला स्वतःचा एक स्वाद आहे जो उच्च तापमानाला बाहेर येतो. ‘पॉपकॉर्न’ म्हणजे मक्याच्या लाह्या बनविताना हे अनेकांनी अनुभवलं असेल.

अनेकांना कुतूहल असेल की मक्याच्या छोट्याश्या दाण्यामधून एवढी मोठी लाही कशी तयार होते! पण ती तर विज्ञानाची किमयाच आहे.

मक्याच्या दाण्याचं तापमान वाढत जाऊन पाण्याच्या उत्कलन बिंदूपेक्षा जास्त होतं तेव्हा प्रथिने आणि स्टार्चचे कण मऊ होऊ लागतात आणि मक्याच्या दाण्यामधल्या अंगीभूत पाण्याची वाफ होते. आणि त्या वाफेमुळे हे कण आणखी मऊ होऊ लागतात आणि दाण्यामध्ये वाफेचा प्रचंड दाब तयार होतो.

हा दाब हवेच्या दाबाच्या सातपट झाला की दाणा फोडून त्यातून वाफ बाहेर येते. त्यामुळे आतला दाब कमी होऊन मऊ झालेलं प्रथिने आणि स्टार्चचं मिश्रण प्रसरण पावतं, दाणा खूप फुलतो आणि लाही ही जसजशी गार होते तसतशी ती लाही घट्ट होते.

तसेच हलकी आणि खसखशीत होते. पॉपकॉर्न तयार होत असलेल्या भांड्याचं झाकण घट्ट लावलं तर दाण्यातून बाहेर पडलेली वाफ निघून न जाता पुन्हा लाहीमध्ये शोषली जाते आणि लाही कडक व चिवट होते. झाकण लावताना थोडी फट ठेवली तर लाही हलकी आणि खुशखुशीत होते.

मक्यामध्ये प्रथिने, कार्बोहायडेटस आणि स्निग्ध पदार्थाशिवाय फॉस्फरस, मग्नेशियम, मँगनीज, जस्त. तांबं लोह आणि सेलेनियम ही खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. तसेच मक्यामध्ये चांगल्या प्रमाणात ब जीवनसत्व आणि थोड्या प्रमाणात क व इ जीवनसत्वे असतात.

Maka Uses in Marathi

  • मका हा विविध प्रकारे खाल्ला जातो. मका दळून पीठ करून त्याची भाकरी होते. कणसं भाजून किंवा उकडून सुद्धा खाता येतात.
  • कणसं किसून किंवा दाणे काढून नंतर ते बारीक करून त्यामध्ये कांदा वगैरे घालून त्याला उपम्यासारखं करता येतं. याचप्रमाणे मक्याचे दाणे शिजवून त्यात उकडलेला बटाटा वगैरे घालून कॉर्न कटलेट बनवता येतं.
  • तसेच मक्याच्या दाण्याचं पॅटीस सुद्धा बनवता येते. आणखी मक्याचे दाणे बारीक करून त्याची भाजी पण बनवता येतात.
  • आजकाल कॉर्न पुलावही लोकप्रिय झाला आहे. नुसतं स्वीट कॉर्न उकडून त्यात कोथिंबीर, मीठ मिरची चाट मसाला घालूनही खाता येतं.
  • कॉर्नफ्लेक्स म्हणजे मक्याच्या पोह्यांचा उपयोग नाश्त्यासाठी आता आपल्याकडेही केला जातो. या पोह्यांचा उत्तम चिवडाही बनतो.
  • ब्राझिलमध्ये दुधात मका शिजवून त्याची खीर बनवली जाते. पेरूमध्ये मक्यापासून सरबत तर इतरत्र मका आंबवून त्यापासून दारू बनविली जाते.

Corn Uses

  • यीस्ट न घालता बेकिंग पावडर वापरून लवकर बनणाऱ्या कोणत्याही ब्रेडला कॉर्नब्रेड म्हणण्याचा प्रघात आहे. पण मक्याचं पीठ वापरूनही कॉर्नब्रेड बनवता येतो… आपल्याकडेही आता तो लोकप्रिय होत आहे. त्याचे विविध प्रकार असू शकतात.
  • वाळवलेल्या मक्याच्या पिठाला कॉनमील असे म्हणतात. अत्यंत बारीक अशा पिठाला कॉर्न फ्लोअर किंवा कॉर्नस्टार्च असं आपण म्हणतो.
  • मॅकरोनी विथ चीज किंवा कॉर्न ॲन्ड पोटॅटो ऑग्रटिन यासारख्या कॉन्टिनेंटल पदार्थासाठी चीज सॉस, व्हाईट सॉस बनविताना या कॉर्नफ्लोअरचा खूप उपयोग होतो.
  • मैदा वापरला तर सॉस पिठूळ होतो तसा तो कॉर्नफ्लोवरने होत नाही. कॉर्नफ्लोवरमध्ये संपूर्ण स्टर्च असतो त्यामुळे पाण्यात किंवा दुधात उच्च तापमानाला तो विरघळून थलथलीत होतो आणि सॉसला घट्टपणा येतो.
  • मका जसजसा वाळत जातो तसं तसं त्यातील साखरेचं रूपांतर स्टार्चमध्ये होतो. त्याचा परिणाम संपूर्ण स्टार्च होण्यामागे असतो.
  • मैद्यात मक्यापेक्षा जास्त प्रथिने असतात. त्यामुळे मैदा पाण्यात घातल्यावर स्टार्च विरघळतो पण प्रथिनेही पाणी शोषून घेतल्याने फुगतात आणि पिठूळपणा येतो.
  • टोमॅटो सूप, भात्याचं सूप अशांना घट्टपणा येण्यासाठीही कॉर्नफ्लोवरचा चांगला उपयोग होते.
  • साठ्याच्या करंज्या, चिरोटे करतानाही तांदळाच्या पिठाऐवजी कॉनफ्लोवर वापरल्यास पदार्थ लवकर तयार होतात.
  • मका बद्दल विचारल्या जाणारे काही प्रश्न – FAQ About Corn

1. मका हा कोणत्या हंगामात पेरला जातो ?
उत्तर – मका हा खरीप या हंगामात पेरला जातो.

2. मकाचे शास्त्रीय नाव काय आहे ?
उत्तर – मकाचे शास्त्रीय झीया मेझ नाव हे आहे.

3. मका मध्ये कोणकोणते पोषक घटक आहेत?
उत्तर – मक्यामध्ये प्रथिने, कार्बोहायडेटस आणि स्निग्ध पदार्थाशिवाय फॉस्फरस, मग्नेशियम, मँगनीज, जस्त. तांबं लोह आणि सेलेनियम ही खनिजे चांगल्या प्रमाणात असतात.

4. मका हे कोणते धान्य आहे ?
उत्तर – मका हे एक तृणधान्य धान्य आहे.

5. मकाचे उत्पादन हे कोठे होते?
उत्तर – मकाचे उत्पादन आंध्र प्रदेश,कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश,राजस्थान या ठिकाणी होते.

Previous Post

जिऱ्याची माहिती आणि फायदे

Next Post

भीमा नदीची माहिती

Editorial team

Editorial team

Related Posts

भारतीय राष्ट्रध्वज फडकविण्याचे नियम
Info

भारतीय राष्ट्रध्वज फडकविण्याचे नियम

भारत देशाच नाव आल कि आपली मान अभिमानाने उंचावते. भारत देशाचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी...

by Editorial team
August 13, 2022
ध चा मा ची नेमकी काय आहे कथा ?
Info

ध चा मा ची नेमकी काय आहे कथा ?

Kaka Mala Vachva Story पुण्यातील शनिवारवाड्यात भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच ३० ऑगस्ट १७७३ ला जे काही घडलं त्या घटनेने संपूर्ण...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Bhima River Information in Marathi

भीमा नदीची माहिती

कृष्णा नदीची माहिती

कृष्णा नदीची माहिती

Tapi River Information in Marathi

तापी नदीची माहिती

Panchganga River Information in Marathi

पंचगंगा नदीची माहिती

Pravara River Information in Marathi

प्रवरा नदीची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved