Wednesday, September 20, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १२ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

12 October Dinvishes

मित्रांनो, आपल्या दैनदिन जीवनात आपण पाहतो की, विश्वात दरोरोज एखादी नवीन  घटना घडत असते. त्याचप्रमाणे आपल्या इतिहास काळात देखील आजच्या दिवशी अश्याच प्रकारच्या अनेक काही घटना घडून गेल्या आहेत. ज्यांना आपण इतिहास कालीन घटना असे म्हणतो. या लेखात आपण अश्याच काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आज जागतिक संधिवात(आर्थराईटिस)दिवस. सन १९९६ सालापासून दरवर्षी १२ ऑक्टोबर या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिनाचे उद्देश म्हणजे जगातील लोकांना संधिवाता बद्दल योग्य माहिती मिळवून देणे. तसचं, त्यांच्यात वायूमॅटिक आणि स्नायूंच्या रोगांविषयी जागरूकता निर्माण करणे होय.

जाणून घ्या १२ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 12 October Today Historical Events in Marathi

12 October History Information in Marathi
12 October History Information in Marathi

 

१२ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 October Historical Event

  • इ.स. १८२३ साली जगात प्रथम रेनकोट विकण्यास सुरुवात झाली.
  • इ.स. १८५० साली अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
  • इ.स. १८६० साली ब्रिटन आणि फ्रांस च्या सैन्यांनी चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरावर ताबा मिळविला.
  • सन १९०१ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती थियोडोर रूजवेल्ट यांनी राष्ट्रपती भावनाचे एक्झिक्युटिव्ह मेंशन हे नाव बदलून व्हाईट हाउस असे केले.
  • सन १९६४ साली सोव्हियत संघाने एकापेक्षा जास्त चालकांना घेऊन जाणारे पहिले अवकाश उड्डाण वोसखोड१ प्रक्षेपित केले.
  • सन १९६८ साली दक्षिण आफ्रिका खंडात स्थित असलेल्या इक्वाटोरियल गिनी देशाला स्पेन राष्ट्राकडून स्वातंत्र मिळालं.

१२ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 12 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८८८ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय क्रांतीकारक महिला, समाजसेवक, व महात्मा गांधी यांची अनुयायी पेरीन बेन  कॅप्टन यांचा जन्मदिन.
  • सन १९११ साली माजी भारतीय क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्मदिन.
  • सन १९१९ साली ग्वाल्हेरच्या राजमाता या नावाने लोकप्रिय असलेल्या भारतीय राजनैतिक नेता विजया राजे सिंधिया यांचा जन्मदिन.
  • सन १९२१ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी, तसचं, सयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते, गोवा मुक्ती संग्रामातील झुंजार सेनापती, व लोकमान्य टिळक यांचे नातू जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली महाराष्ट्रीयन मराठी कवयित्री व गीतलेखिका शांत शेळके यांचा जन्मदिन.
  • सन १९३५ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व पंजाब राज्याचे राज्यपाल तथा पूर्व लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांचा जन्मदिन.
  • सन १९३८ साली पद्मश्री पुरस्कार तसचं, साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय उर्दू कवी, गीतकार आणि संवाद लेखक निदा फाजली यांचा जन्मदिन.
  • सन १९४६ साली माजी भारतीय क्रिकेटपटू अशोक विनू मांकड यांचा जन्मदिन.

१२ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 October Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९६५ साली डी. डी. टी या लसीचा शोध लावणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ नोबल पारितोषिक विजेते पॉल हर्मन मूलर (Paul Hermann Müller) यांचे निधन.
  • सन १९६७ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते आणि समाजवादी राजकीय नेते, विख्यात संसदपटू तसचं, प्रभावी लोकसभा वक्ते, व्यासंगी लेखक डॉ. राममनोहर लोहिया यांचे निधन.
Previous Post

चीनच्या लोकांवर असे विचित्र प्रयोग केल्या गेले, वाचून भीती वाटेल.

Next Post

या गावात का कोणीही राहत नाही. श्राप आहे कि आणखी काही

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Kuldhara Ghost Village

या गावात का कोणीही राहत नाही. श्राप आहे कि आणखी काही

13 October History Information in Marathi

जाणून घ्या १३ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

Places on Earth Where There is No Gravity

जगातील पाच ठिकाणे जेथे काम करत नाही गुरुत्वाकर्षण

14 October History Information in Marathi

जाणून घ्या १४ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

Best Places In Maharashtra

महाराष्ट्रातील या ठिकाणांना आपण भेट दिली आहे का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved