Friday, June 9, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 25 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

25 November Dinvishes

२५ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

जाणून घ्या 25 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 25 November Today Historical Events in Marathi

25 November History Information in Marathi
25 November History Information in Marathi

25 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 November  Historical Event

  • ब्रिटन या देशाने आजच्याच दिवशी १७५८ साली फ्रांस च्या डोक्विन्सोन या किल्ल्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून किल्ला काबीज केला होता.
  • अलाहाबाद उच्च न्यायालयाचे आजच्याच दिवशी १८६६ साली उद्घाटन करण्यात आले होते.
  • अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने आजच्या दिवशी १८६७ साली डायनामाईट चे पेटंट केले होते.
  • १९४१ साली आजच्याच दिवशी लेबेनॉन या देशाला फ्रांस या देशाकडून स्वातंत्र्य मिळाले होते.
  • आजच्याच दिवशी भारतात १९४८ साली राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना करण्यात आली होती.
  • १९६५ साली आजच्याच दिवशी फ्रांस या देशाने स्वतःचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला होता.
  • २००१ साली आजच्याच दिवशी वरिष्ठ पाकिस्तानी राजनेता बेनजीर भुट्टो या तत्कालीन भारतीय प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना दिल्ली येथे भेटल्या होत्या.
  • लुसिया गुटेरेज आजच्याच दिवशी २००२ साली इक्वाडोर या देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले होते.
  • इराक़ ची राजधानी बगदाद इथे एका कॅफे मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट घटनेत २०१३ साली आजच्याच दिवशी १७ जण मृत्युमुखी पडले होते.

25 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 25 November Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • प्रसिध्द साहित्यकार सुनीती कुमार चाटर्जी यांचा १८९० साली जन्म झाला होता.
  • प्रसिध्द सिने निर्देशक देवकी बोस यांचा आजच्या दिवशी १८९८ साली जन्म झाला होता.
  • लोकसभा सदस्य अरविंद कुमार शर्मा यांचा १९६३ साली जन्म झाला होता.
  • त्रिपुरा राज्याचे १० वे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांचा आजच्या दिवशी १९६९ साली जन्म झाला होता.
  • प्रसिध्द भारतीय महिला क्रिकेट खेळाडू व वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा १९८२ साली आजच्याच दिवशी जन्म झाला होता.

25 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 25 November Death / Punyatithi / Smrutidin

  • संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेचे तिसरे महासचिव यु थांट यांचे १९७४ साली निधन झाले होते.
  • भारताचे ५ वे उप पंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे १९८४ साली निधन झाले होते.
  • परम वीर चक्र सन्मानित भारतीय सैनिक मेजर रामास्वामी पारामेस्वरण यांचे १९८७ साली निधन झाले होते.
  • प्रसिध्द भारतीय नृत्य कलाकार सितारा देवी हिचा २०१४ साली मृत्यू झाला होता.
Previous Post

नवऱ्याबद्दल काही सुंदर कोट्स

Next Post

जाणून घ्या 26 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

Editorial team

Editorial team

Related Posts

Uncategorized

महाराष्ट्रातील शाळेत आता ‘एक राज्य, एक गणवेश’ पहा कसा असेल नवा ड्रेस ? तुमच्या मुलांचा शाळेचा ड्रेस आता बदलणार…

One State One Uniform "एक राज्य एक गणवेश": आपल्या राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार "एक राज्य, एक ड्रेस...

by Editorial team
May 24, 2023
Ginger Information in Marathi
Uncategorized

आल (अद्रक) ची माहिती आणि फ़ायदे

Adrak in Marathi आपल्याला सर्वांना परिचित असलेली आणि रोजच्या वापरातील असणारी झुडूपवर्गीय वनस्पती म्हणजे आले होय, आले रंगाने काळपट पिवळे...

by Editorial team
March 24, 2022
Next Post
26 November History Information in Marathi

जाणून घ्या 26 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

Wife Quotes in Marathi

बायकोबद्दल काही सुंदर कोट्स

27 November History Information in Marathi

जाणून घ्या 27 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

Guru nanak Jayanti Information in Marathi

गुरूनानक जयंती विषयी  माहिती

28 November History Information in Marathi

जाणून घ्या 28 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved