गौतम बुद्ध यांची वंदना

Buddha Vandana Lyrics

नमस्कार मित्र/ मैत्रिणींनो, आपल्या शिकवणीतून तसचं, आपल्या महान उपदेशांच्या माध्यमातून विश्वातील जनसामान्यांच्या जीवनांत आनंद प्रस्तापित करणारे, तसचं, मानवी जीवनाच्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन संपूर्ण विश्वाला करून देणारे महान संत गौतम बुद्ध यांची वंदना करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्वपूर्ण मुल्यांचे महत्व आज आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत.

गौतम बुद्ध यांची वंदना – Buddha Vandana in Marathi

Buddha Vandana in Marathi
Buddha Vandana in Marathi

“नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ।”

त्रिशरण पंचशील बुद्ध वन्दना – Trisharan Panchshil Buddha Vandana

त्रिशरण
बुद्धं शरणं गच्छामि ।
धर्मं शरणं गच्छामि ।
संघं शरणं गच्छामि ।

दुतियम्पि बुद्धं सरणं गच्छामि ।
दुतियम्पि धम्म सरणं गच्छामि ।
दुतियम्पि संघ सरणं गच्छामि ।
ततियम्पि बुद्धं सरणं गच्छामि ।
ततियम्पि धम्म सरणं गच्छामि ।
ततियम्पि संघ सरणं गच्छामि ।

पंचशील
1. पाणतिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि ।
2. अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि ।
3. कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि ।
4. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि ।
5. सुरा-मेरय-मज्ज-पमादट्ठानावेरमणी सिक्खापदं समादियामि ।
॥ भवतु सर्व मंगलं ॥

साधू साधू साधू॥

इ.स.पू. ५६३ ते इ.स.पू. ४८३ च्या सुमारास आपल्या देशाच्या भूमीस भूमीस लाभलेले महान तत्त्वज्ञानी संत. ज्यांनी आपले उपदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बौध्द धर्माची स्थापना केली होती. अशे महान भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म शाक्य गणराज्य राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ साली लुंबिनी येथे झाला होता.

राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांनी आपल्या पाल्याचे नाव राजकुमार सिद्धार्थ असे ठेवले होते.  राजकुमार अवघे सात वर्षाचे असतांना त्यांची आई महाराणी महामाया यांचे निधन झाले. अवघ्या सात वर्षाच्या वयात आपल्या आईचे निधन झाल्याने राजकुमार सिद्धार्थ यांच्यावरील आईचे छत्र हरवले. यानंतर सिद्धार्थ यांचे संगोपन त्यांची सावत्र आई आणि मावशी यांनी केलं. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थ यांना ‘गौतम’ नावाने देखील ओळखलं जाते.

राजकुमार पदाकरिता आवश्यक असणारे सर्व शिक्षण त्यांना देण्यात आले. इ.स.पू. ५४७ साली वयाच्या सोळाव्या वर्षी राजकुमार सिद्धार्थ यांचा विवाह दंडपाणि शाक्य कन्या यशोधरा यांच्या सोबत झाला होता. कालांतराने त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्याचे नाव राजकुमार सिद्धार्थ आणि राणी यशोधरा यांनी राहुल असे ठेवले होते.

मित्रांनो, हिंदू धर्मात ज्याप्रमाणे वेद पुराणासारख्या पवित्र पौराणिक धर्म ग्रंथांना विशेष असे महत्व आहे. त्याचप्रमाणे बुद्ध धर्मात देखील पिटिक ग्रंथाला अनन्य साधारण असे महत्व आहे. या पिटक ग्रंथाबद्दल असे सांगण्यात येते की, ‘पिटक’ या बुद्ध ग्रंथाची रचना भगवान बुद्ध यांनी केली नसून त्यांच्या शिष्यांनी भगवान बुद्ध यांचे उपदेश प्रथम कंठस्थ केले, आणि नंतर त्यांचे लिखाण केलं गेल. लिखाण करतांना शिष्य लिखाण केलेले उपदेश पेटीत ठेवत असत. यामुळे या ग्रंथाचे नाव पिटक असे पडले. बुद्ध धर्मात तीन पिटके असून त्यांचे अनन्य साधारण असे महत्व आहे.

  • विनय पिटक: भिक्षुक आणि भिक्षणी यांनी प्रतिदिन कोण कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे यासंबधी माहिती या पिटकामध्ये करण्यात आली आहे.
  • सुत्त पिटक: यामध्ये बौद्ध धर्मातील सर्व मुख्य सिद्धांताचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आला आहे.
  • अभिधम्म पिटक: या पिटकात धर्म आणि त्यांच्या संपूर्ण क्रियाकल्पाची व्याख्या श्लोकाच्या स्वरुपात मांडण्यात आली असून, ज्याप्रमाणे वेदांमध्ये ब्राह्मण ग्रंथ आहेत, त्याचप्रमाणे पीटकांमध्ये अभिधम्मा पिटक आहेत.

मित्रांनो, वरील पिटकांचे आपण अध्ययन केल्यास आपल्या निर्देषणात येईल की, गौतम बुद्ध यांनी मानवी जातीधर्माला उद्देशून दिलेले उपदेश खूप मौल्यवान असून आपण हे उपदेश आपल्या जीवनांत आकस्मात केले पाहिजात.

गौतम बुद्धाची वंदना म्हणजे काय तर, गौतम बुद्ध यांनी लुंबिनी येथे वडाच्या झाडाखाली बसून स्वबळावर आत्मशक्ती प्राप्त करून लोकांना बौद्ध धर्माची शिकवण दिली. या शिकवणीत त्यांनी लोकांना करुणा, दया, क्षमा, शीलता, यासरखा बहुमोलाचा उपदेश दिला.

गौतम बुद्ध यांनी दिलेले उपदेश आणि त्यांचे त्रीपिटक यांचे वाचन केल्यास आपणास गौतम बुद्ध यांचे खरे विचार कळून येतील. गौतम बुद्धांची वंदना करायची असल्यास आपण या त्रिपिटकांचे नियमित वाचन करावे. त्यामुळे आपल्याला व आपल्या मनाला शांतता लाभते व सुखाचा अनुभव येतो. आश्या आहे या लेखात गौतम बुद्ध यांची वंदना करण्यासाठी देण्यात आलेल्या माहितीचे महत्व कळले असेल. धन्यवाद..

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here