Friday, June 9, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

भगवान गौतम बुद्ध यांचा जीवन परिचय

Gautam Buddha Marathi Mahiti

आपल्या थोर विचारांनी आणि उपदेशांनी जगाला नवा मार्ग दाखविणाऱ्या भगवान गौतम बुद्धांनी समाजात अभूतपूर्व परिवर्तन आणण्यात आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या उपदेशांचा उपयोग आपल्या जीवनात केल्यामुळे अनेक लोक आपल्या आयुष्यात केवळ यशस्वीच झाले असे नव्हे तर त्यांच्या हृदयात समाजाप्रती प्रेम, आदर, सदभावाच्या भावनेचा विकास देखील झाला.

गौतम बुद्धांनी हिंदू धर्मात सिद्धार्थाच्या रुपात जन्म घेतला, गृहस्थ जीवनात प्रवेश घेतल्यावर विवाहा पश्चात आपल्या पत्नी आणि मुलाचा त्याग करून कौटुंबिक मोह-मायेपासून दूर झाले आणि बौद्ध धर्माचे प्रवर्तक झाले. विश्वाला जन्म-मृत्यू आणि दुःखा पासून मुक्तीचा मार्ग शोधणारे भगवान गौतम बुद्ध सत्य दिव्य ज्ञानाच्या शोधात होते. पुढे त्यांनी भौतिकवादी जगात आपला मार्ग शोधला. भगवान गौतम बुद्धांनी करुणा, सत्य आणि अहिंसेला आपल्या जीवनाचा आधार मानले. लोकांना देखील याच मार्गावर चालण्यासाठी त्यांनी प्रेरित केले. कित्येक लोकांनी त्यांच्या महान उपदेशांमुळे आपल्या जीवनात आमुलाग्र बदल  केला.

भगवान गौतम बुद्ध यांचा जीवन परिचय – Bhagwan Gautam Buddha Information in Marathi

Gautam Buddha Information in Marathi
Gautam Buddha Information in Marathi

भगवान गौतम बुद्ध संक्षिप्त परिचय – Gautam Buddha Biography in Marathi

पूर्ण नाव(Full Name ) सिद्धार्थ गौतम बुद्ध (Siddharth Gautam Buddha)
जन्म (Birthday)ई.स. 563 पूर्व. लुम्बिनी
मृत्यू (Death) ई.स. 463 पूर्व. कुशीनगर
पिता (Father Name) शुद्धोधन
माता (Mother Name)महामाया
शिक्षण (Education)गुरु विश्वामित्रांजवळ वेद उपनिषदाचे अध्ययन केले, राज्यकारभार आणि युद्ध विद्येचे देखील शिक्षण घेतले
विवाह ( Wife Name)यशोधरा समवेत
धर्म (Religion)जन्माने हिंदू, बौद्ध धर्माचे प्रवर्तक

गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण – Gautam Buddha Shiksha

भगवान गौतम बुद्धांनी तत्कालीन रूढी-परंपरांचे, अंधविश्वासाचे, खंडन करून एका सहज सोप्या मानवधर्माची स्थापना केली. ते म्हणतात, आपल्या जीवनात संयम, सत्य आणि अहिंसेचे पालन करून पवित्र आणि साधे जीवन व्यतीत करावयास हवे.  त्यांनी कर्म, भाव, आणि ज्ञानासमवेत ‘सम्यक’ साधनेवर भर दिला कारण कुठलीही ‘अतिशयोक्ती’ शांतता देऊ शकत नाही.

या मार्गावर कष्टांपासून आणि मृत्यू च्या भयापासून मुक्तता मिळते. भयमुक्ती आणि शांततेला बुद्धांनी निर्वाण म्हंटले आहे. भगवान गौतम बुद्धांनी मानवाला जो निर्वाणाचा मार्ग दाखविला तो मार्ग आजही तितकाच प्रासंगिक आहे जेवढा अडीच हजार वर्षांपूर्वी होता. मानवतेच्या मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी त्यांनी स्वतः राजवैभवी आयुष्याचा त्याग केला. कठोर आणि दीर्घ चिंतन-मनन आणि कठोर तपश्चर्येने त्यांना (बिहार) बोधीवृक्षा खाली तत्वज्ञानाची प्राप्ती झाली. त्यांनी सर्वप्रथम आपल्या पाच शिष्यांना दीक्षा दिली होती.

बौद्ध धर्माचा प्रचार – Propagation of Buddhism

अनेक प्रतापी राजा देखील भगवान गौतम बुद्धांचे अनुयायी झाले. त्यांच्या धर्माचा भारता बाहेर देखील वेगाने प्रचार-प्रसार झाला, आज चीन, जपान सह अनेक देशांचा बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म आहे. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या गोष्टींचा स्थानीक लोकांवर फार चांगला प्रभाव होता. श्रद्धापूर्वक त्या उपदेशांवर ते विश्वास ठेवत असत आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत असत.

भगवान गौतम बुद्धांनी दाखविलेल्या मार्गावर जात अनेकांनी आपले जीवन समृद्ध बनविले आहे. त्यांच्या मृत्युपश्चात 400 वर्षांनी देखील लोक त्यांना परमेश्वराचा अवतार मनात होते.

समस्त दुःखापासून मुक्ती देणारा भगवान बुद्धांचा अष्टांगिक मार्ग – Lord Buddha Teach (Ashtanga Marga)

गौतम बुद्धांचे उपदेश अत्यंत साधे आणि सरळ होते. ते म्हणतात, समस्त संसार दुःखाने भरलेला आहे आणि दुःखाचे कारण माणसाच्या इच्छा व तृष्णा आहेत. इच्छांचा त्याग केल्याने मनुष्य दुःखातून मुक्त होतो. गौतम बुद्धांनी लोकांना सांगितले की सम्यक-दृष्टी, सम्यक भाव, सम्यक-भाषण, सम्यक-व्यवहार, सम्यक-निर्वाह, सत्य-पालन, सत्य-विचार, आणि सत्य ध्यानाने मनुष्याच्या तृष्णा समाप्त होतात आणि तो सुखी होतो. त्यांनी दाखविलेला मार्ग आज देखील तितकाच प्रासंगिक आहे.

  • सम्यक दृष्टी: सत्य आणि असत्य ओळखण्याची शक्ती. ज्या व्यक्तीला आपल्या दुःखापासून मुक्ती हवी आहे त्यात सत्य आणि असत्य ओळखण्याची शक्ती असायला हवी.
  • सम्यक संकल्प: इच्छा आणि हिंसा रहित संकल्प. महात्मा बुद्ध म्हणतात ज्यांना आपल्या दुःखापासून मुक्ती हवी आहे त्यांनी असे संकल्प घ्यावयास हवेत जे हिंसा रहीत आहेत. आणि संकल्पाला इच्छा शक्तीची जोड हवी.
  • सम्यक वाणी: सत्य आणि मृदू वाणी. सत्य आणि मधुर बोलल्याने मनुष्याला सुखाची अनुभूती होते आणि दुःख त्याच्या आसपास देखील भटकत नाही.
  • सम्यक कर्म: सत्कर्म, दान, दया, सदाचार, अहिंसा…दयेचा करुणेचा भाव ठेवणे, दान-पुण्य व चांगल्या कर्मांनी मनुष्य दुःखापासून दूर राहू शकतो.
  • सम्यक आजीव: जीवन व्यतीत करण्याचा सदाचारी आणि उचित मार्ग.
  • सम्यक व्यायाम: विवेकपूर्ण प्रयत्न…कोणतेही कार्य करतांना जर विवेकपूर्ण प्रयत्न करण्यात आले तर यश नक्की मिळतं आणि मनुष्य दुःखापासून दूर रहातो.
  • सम्यक स्मृती: आपल्या कर्मांप्रती विवेकपूर्ण पद्धतीने सजग राहण्याचे शिक्षण सम्यक स्मृती मुळे प्राप्त होते.
  • सम्यक समाधी: चित्ताची एकाग्रता…मानवी जीवनात एकाग्र चित्ताची आवश्यकता गौतम बुद्धांनी विषद केली आहे.

निर्वाण प्राप्तीला सरळ सोपे बनविण्यासाठी दहा शील सांगितलेले आहेत – Teachings of Buddha

  • अहिंसा
  •  सत्य
  •  अस्तेय (चोरी न करणे)
  •  अपरिग्रह (संपत्ती चा संग्रह न करणे)
  •  मध सेवन न करणे
  •  अवेळी भोजन न करणे
  •  आरामदायी गादीवर न झोपणे
  •  धन संचय न करणे
  •  स्त्रियांपासून दूर राहणे
  •  नृत्य-गायन यापासून दूर राहणे

मुक्या प्राण्यांप्रती दयाभाव ठेवणे, पशुहत्या, होम-हवना वेळी प्राण्यांचा बळी  देण्यावर त्यांनी कडाडून विरोध केला. सनातन धर्माच्या काही संकल्पनांचा त्यांनी प्रचार-प्रसार केला होता उदा. अग्निहोत्र आणि गायत्री मंत्र.

बौद्ध धर्मातील महत्वपूर्ण गोष्टी – Main Beliefs of Buddhism

बौद्ध धर्म सर्व जाती-पंथातील लोकांकरता खुला आहे. प्रत्येक व्यक्तीचे त्यात स्वागत करण्यात आले आहे. ब्राम्हण असो किंवा चांडाळ, पापी असो वा पुण्यात्मा, गृहस्थ असो वा ब्रम्हचारी, सर्वांकरता बौद्ध धर्माचे दरवाजे खुले आहेत. या धर्मात जाती-पातीचे, श्रेष्ठ-कनिष्ठ असा कोणताही भेदभाव नाही. गौतम बुद्धांनी आपल्या उपदेशांनी लोकांच्या जीवनात प्रकाश आणला, लोकांची वैचारिक क्षमता विकसित केली. लोकांच्या हृदयात दयाभाव, करूणा निर्माण करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

भगवान गौतम बुद्ध म्हणतात…

“ती बुद्धी आपली असते, आपल्या शत्रूची नव्हे- जी आपल्याला चुकीच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करते.

तुम्ही तोपर्यंत मार्गावर मार्गक्रमण करू शकणार नाही जोवर तुम्ही तुमचा मार्ग स्वतः तयार करीत नाही.”

Previous Post

खरंच चंदनाच्या झाडावर साप राहतात का? जाणून घ्या या लेखातून.

Next Post

जाणून घ्या ८ मे रोजी येणारे दिनविशेष

Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू जन्म 20 जून 1958 उपरबेडा, जि. मयूरभंज (ओडिशा राज्य) राजकीय कारकीर्द 1997 ते...

by Editorial team
July 13, 2022
Next Post
8 May History Information in Marathi

जाणून घ्या ८ मे रोजी येणारे दिनविशेष

How to Buy Mobile on EMI

EMI वर मोबाईल घ्यायचा आहे? पण कसा ते माहिती नाही, मग जाणून घ्या या लेखातून 

Optimistic Movies

या ५ चित्रपटांमध्ये एकाच ठिकाणी फसलेली व्यक्ती आपली वेळ कशाप्रकारे काढतात ते दाखवले आहे, या चित्रपटांपासून लॉक डाऊन मध्ये वेळ घालविण्यासाठी होणार मदत.

CV Raman Information in Marathi

आधुनिक भारतातील महान वैज्ञानिक 'भारतरत्न' सी.व्ही.रमण

Essay on Save Water in Marathi

"पाणी अडवा पाणी जिरवा" मराठी निबंध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved