जाणून घ्या 13 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

13 January Dinvishes

१३ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१३ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 January Today Historical Events in Marathi

13 January History Information in Marathi
13 January History Information in Marathi

१३ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 January Historical Event

 • १९१० ला न्यूयार्क मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक रेडीओ च्या माध्यमातून प्रसारण.
 • १९३० ला मिकी माउस ची पहिली चित्रकथा प्रकाशित झाली.
 • १९४८ ला १२ जानेवारीच्या संध्याकाळी महात्मा गांधींनी हिंदू मुस्लीम एकतेसाठी उपोषणाला बसण्याचे घोषित केले आणि आजच्या दिवशी ते उपोषणाला बसले.
 • १९५७ ला हिराकुंड धरणाचे उद्घाटन करण्यात आले होते.
 • १९७८ ला अमेरिकेने पहिल्यांदा महिला अंतरिक्षयात्री निवडली.
 • २००७ ला के.जी.बालकृष्णन यांनी देशाचे सर न्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला.
 • २००९ ला जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला नॅशनल कांफ्रेंस चे अध्यक्ष बनले.

१३ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 13 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १९१९ ला आंध्र प्रदेश चे माजी मुख्यमंत्री एम.चेन्ना रेड्डी यांचा जन्म.
 • १९२६ ला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शक्ती सामंत यांचा जन्म.
 • १९३८ ला प्रसिद्ध गायक शिवकुमार शर्मा यांचा जन्म.
 • १९४९ ला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म.
 • १९७८ ला भारतीय अभिनेता अस्मित पटेल यांचा जन्म.
 • १९८२ ला पाकिस्तानी खेळाडू कामरान अकमल चा जन्म.
 • १९८३ ला हिंदी चित्रपट अभिनेता इम्रान खान यांचा जन्म.

१३ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 13 January Death / Punyatithi / Smrutidin

 • १८३२ ला संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले क्रिकेट मैदान लॉर्ड चे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचे निधन.
 • १९७६ ला भारतीय तबला वादक अहमद जाँ. थिरकवा यांचे निधन.
 • १९८५ ला भारतीय चित्रपट अभिनेता मदन पुरी यांचे निधन.
 • २०११ ला प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन.
 • २०१३ ला भारतीय क्रिकेटर रुसी सुरती यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top