पहिले भारतीय अंतरिक्ष यात्री राकेश शर्मा

Rakesh Sharma Mahiti

माणुस हा प्राणी असा आहे की त्याला नेहमी नव्या गोष्टी आकर्षीत करत राहातात. तो नेहमी नवीन गोष्टींकडे धाव घेतो, राहातो पृथ्वीवर आणि ध्यास धरतो अवकाशाचा. त्याला उत्कंठा आहे ती पृथ्वीपलीकडच्या जगाची. आपल्यासारखी मानवी वस्ती आणखीन कुठे आहे? मानवाला राहण्याकरता पृथ्वीशिवाय आणखीन कोणता पर्याय आहे असे सगळे प्रश्न त्याला पडतात आणि त्याची उत्तरं शोधण्याकरता तो धडपडतांना दिसतो.

राकेश शर्मा या भारतीयानं जशी अवकाशात झेप घेतली तसा त्यांनी आपलं नाव इतिहासाच्या पानावर कोरलं होतं. अवकाशाची यात्रा करणारे ते पहीले भारतीय ठरले होते. 8 दिवस अंतरीक्षात राहिल्यानंतर 11 एप्रील ला कजाकीस्तान इथं त्यांनी लॅण्ड केलं होतं. प्रत्येक भारतीयाकरता ते आज प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. आज आम्ही त्यांच्या जिवनाविषयी काही गोष्टींना इथं उजाळा देत आहोत.

Rakesh Sharma

पहिले भारतीय अंतरिक्ष यात्री राकेश शर्मा – Rakesh Sharma Information in Marathi

राकेश शर्मा सोवियत संघाचे हिरो भारतीय वायु सेनेत पायलट होते त्यांनी 3 एप्रील 1984 ला लाॅन्च झालेल्या सोयुज टी 11 ला इंटेरकॉस्मोस प्रोग्राम अंतर्गत उडवले होते. अंतरीक्षाची यात्रा करणारे राकेश शर्मा हे पहिले भारतीय होते.

राकेश शर्मा याचं प्रारंभिक जिवन – Rakesh Sharma Biography in Marathi

भारतातील पंजाब प्रांतात पटियाला इथं राकेश शर्मा यांचा 13 जानेवारी 1949 जन्म झाला प्राथमिक शिक्षण त्यांनी सेंट जॉर्जेस ग्रामर स्कूल हैदराबाद इथं पुर्ण केलं आणि त्यानंतर निजाम कॉलेज इथे ते ग्रॅज्युऐट झाले.

35 व्या राष्ट्रिय सुरक्षा अकादमीत राकेश शर्मा 1970 मध्ये भारतीय वायुसेनेत टेस्ट पायलट च्या रूपात दाखल झाले. 1971 पासुन त्यांनी एयरक्राफ्टव्दारे उड्डाण केले. त्यांचे कौशल्य पाहाता 1984 त त्यांना भारतीय वायुसेनेच्या स्कवार्डन लीडर आणि पायलट पदावर नियुक्त करण्यात आले.

12 सप्टेंबर 1982 ला सोवियत इंटेरकॉस्मोस स्पेस प्रोग्राम आणि इसरो (इंडियन स्पेस रिसर्च आर्गेनाईजेशन) यांच्या वतीनं ते अंतरीक्षात जाणा-या सुमहातील सदस्य बनले.

विंग कमांडर पदावर असतांना ते सेवानिवृत्त झाले 1987 मध्ये ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड इथं ज्वाइन झाले आणि 1992 पर्यंत Hal नाशिक डिवीजन मधे चीफ टेस्ट पायलट या पदावर त्यांनी सेवा दिली. त्यानंतर Hal चीफ टेस्ट पायलट पदावर राहात त्यांची बदली बॅंगलोर इथं करण्यात आली. लाइट कॉम्बैट एयरक्राफ्ट तेजस सोबत सुध्दा त्यांनी काम पाहिलं होतं.

स्पेसफ्लाईट:

1984 त अंतरीक्षात जाणारे ते पहीले भारतीय ठरले. अंतरीक्षात जाण्याकरता त्यांनी सोवियत रॉकेट सोयुज टी 11 यामधुन उड्डाण केले होते. या यानाला 2 एप्रील 1984 ला बैकोनूर कॉस्मोड्रो कजाख इथुन सोडण्यात आले.

राकेश शर्मा अंतरीक्षात 7 दिवस 21 तास आणि 40 मिनीटं राहिले होते. या दरम्यान त्यांनी बरेच वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोग केले ज्यात 43 एक्सपेरिमेंटल सेशन सुध्दा आहे. त्यांचे बरेच कार्य बायोमेडिसिन आणि रिमोट सेंसिंग क्षेत्रातच राहिले आहे.

त्यांच्या क्रु ने जॉइंट टेलीविजन वर पहिले मास्को ऑफिशियल आणि त्यानंतर भारतीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्यासोबत कॉन्फरन्स सुध्दा केली होती. इंदिरा गांधीनी जेव्हा विचारले की अंतरीक्षातुन आपला भारत कसा दिसतो तेव्हां राकेश शर्मांनी उत्तर दिले की “सारे जहाँ से अच्छा”. त्या वेळी मनुष्याला अवकाशात पाठवणारा भारत हा 14 वा देश बनला होता.

राकेश शर्मा यांना मिळालेले अवार्ड –  Rakesh Sharma Awards

अंतरीक्षातुन परत आल्यानंतर त्यांना हीरो ऑफ सोवियत संघ या पदाने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारनेही त्यांना आपल्या सर्वोच्च (शांती च्या वेळेचे) अशोक चक्राने सन्मानित केले होते. सोवियत संघातील आणखील दोन सदस्य मलयशेव आणि स्ट्रेकलोव यांना देखील अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले होते जे राकेश शर्मा यांच्यासोबतच अंतरीक्षात गेले होते.

राकेश शर्मा याचं वैयक्तिक जीवन – Rakesh Sharma Life History

1982 मध्ये जेव्हां ते रशिया इथं राहात होते तेव्हा त्यांनी आणि त्यांची पत्नी मधु यांनी रशियन भाषा शिकली होती. त्यांचा मुलगा कपिल शर्मा हा दिग्दर्शक आहे तर मुलगी कृतिका मीडीया आर्टिस्ट आहे.

अंतरीक्ष यात्री राकेश शर्मा यांच्या काही विशेष गोष्टी – Facts about Rakesh Sharma

  • अंतरीक्षात रशियन इसमाला भारतीय जेवण खावु घालणारे राकेश शर्मा हे पहिले होते.  डिफेन्स फुड रिसर्च लेबाॅरेटरी नी अंतरीक्षात जातांना राकेश शर्मा यांना सुजी चा हलवा, आलु छोले आणि भाजी पुलाव हे जेवण सोबत दिले होते.
  • अंतरीक्षात होणा-या आजारापासुन वाचण्याकरता ते योगा करायचे – 1984 त शुन्य गुरूत्वाकर्षण योगा चा अभ्यास शर्मा यांनी केला होता आणि त्यांच्या या प्रयत्नांचे रोकॉस्मोस ने बरेच कौतुक केले होते. 2009 साली झालेल्या कॉन्फरन्स मध्ये शर्मा यांनी अंतरीक्षात जाणा-या यात्रेकरूंना तीथे होणा-या आजारांपासुन वाचण्याकरता योगा करण्याचा सल्ला दिला होता.
  • राकेश शर्मा यांना भारताच्या सर्वोच्च अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले.
  • शांती काळातील सर्वोच्च पुरस्कार अशोक चक्राने राकेश शर्मा आणि दोन रशियन साथिदारांना देखील सन्मानित करण्यात आले होते. ही पहिली आणि शेवटची संधी होती की कुणा विदेशी नागरिकाला अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले होते.
  • राकेश शर्मांनी इंदिरा गांधींनी विचारलेल्या प्रश्नाचे सर्वात योग्य उत्तर दिले – त्यावेळेच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधीनी जेव्हा राकेश शर्मांना विचारले की अंतरीक्षातुन भारत कसा दिसतो तेव्हां त्यांनी मोठया गर्वाने उत्तर दिले सारे जहाँ से अच्छा
  • राकेश शर्मा यांना हिरो ऑफ सोवियत संघ या नावाने ओळखले जावु लागले – अंतरीक्षातुन परत आल्यानंतर राकेश शर्मांनी भारताच्या इतिहासात आणखीन एक पान सुवर्णाक्षरांनी कोरले होते. त्यांच्या कार्याला बघता रशियन सरकारनी त्यांना हिरो आॅफ सोवियत संघाच्या उपाधीने सन्मानित केले होते.
  • वयाच्या 65 व्या वर्षी 2014 साली राकेश शर्मांना अंतरीक्षाची यात्रा करण्याची आणखीन एक संधी हवी होती
  • 65 वर्ष वय असतांना देखील त्यांचा उत्साह जीवंत होता ते आणखीन एक वेळ अंतरीक्षाची यात्रा करू ईच्छित होते.
  • वयाच्या 5 व्या वर्षीच त्यांना जेट उडवायची ईच्छा होती –  राकेश शर्मांना लहानपणीच जेट उडवायची ईच्छा होती तरूण झाल्यावर त्यांची ही ईच्छा पुर्ण देखील झाली. एक वायुसेनेचे पायलट पद भुषवतांना त्यांनी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता की त्यांचा प्रवास भारतीय वायुसेना ते थेट अंतरीक्षापर्यंत पोहोचेल. त्यांच्या एकुण प्रवासाबद्दल बोलतांना ते म्हणाले होते. “लहानपणापासुन मी पायलट बनण्याचे स्वप्न पाहीले होते आणि जेव्हां मी पायलट बनलो तेव्हां वाटले आपले स्वप्न पुर्ण झाले.“

त्यांचे अथक परिश्रम आणि मेहनत यांच्या बळावरच त्यांनी 8 दिवसांचा अंतरीक्षातील प्रवास पुर्ण केला आणि जगाला दाखवुन दिले की मनापासुन जर स्वप्नं पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही.

भारताकरता राकेश शर्मा कोहिनुर हि-यापेक्षा कमी नाहीत भारतीय त्यांच्या अतुल्य योगदानाला नेहमी स्मरणात ठेवतील.

Please Note जर आपल्या जवळ Rakesh Sharma Information in Marathi मध्ये आणखीन Information असेल, किंवा दिलेल्या माहितीत काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये लिहा. आम्ही माहिती अपडेट करीत राहु.

जर आपल्याला आमची Information About Rakesh Sharma History in Marathi आवडल्यास आपण आम्हाला Facebook व Like आणि Share करा…..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top