जाणून घ्या 13 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

13 November Dinvishes

१३ नोव्हेंबर म्हणजेच आजच्याच दिवशी देशात व विदेशांत काही महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या ,सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचा जन्म झाला होता म्हणजेच त्यांचा आज वाढदिवस असतो. तसेच काही व्यक्ती आज निधन सुध्दा पावले होत्या. अश्या संपूर्ण महत्वपूर्ण बाबींचा आढावा आपण आजच्या दिनविशेषद्वारा घेत आहोत, चला तर मग बघूया आजचा दिनविशेष.

जाणून घ्या 13 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 13 November Today Historical Events in Marathi

13 November History Information in Marathi
13 November History Information in Marathi

13 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 November  Historical Event

 • १९५० साली आजच्याच दिवशी तिबेट या देशाने चीन च्या आक्रमणाविरोधात संयुक्त राष्ट्र या जागतिक संघटनेत तक्रार नोंदवली होती.
 • पाकिस्तान मध्ये १९६८ साली आजच्या दिवशी झुल्फिकार अली भुट्टो यांना अटक करण्यात आली होती.
 • अमेरीकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे १९७१ साली पाठविलेले यान मरिनर -९ आजच्या दिवशी मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहचले होते.
 • जागतिक आरोग्य संघटनेने १९७५ साली आजच्याच दिवशी आशिया खंडातून देवी या रोगाचा समूळ नायनाट झाल्याची घोषणा केली होती.
 • सुरक्षा परिषदेने १९९७ साली इराक या देशावर यात्रेवर निर्बंध लावले होते.
 • चीन च्या विरोधाला झुगारून आजच्याच दिवशी १९९८ साली दलाई लामा व तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती बील क्लिंटन यांनी एकमेकांची भेट घेतली होती.
 • तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी २००४ साली आजच्याच दिवशी फिलीस्तीन देशाच्या निर्मितीकरिता चार वर्षांचा कार्यकाल ठरविला होता.
 • ‘असम गणपरीषद ‘ संघटन आजच्याच दिवशी २००८ साली राष्ट्रीय लोकतांत्रिक गठबंधन नावाच्या पक्षात समाविष्ट झाले होते.
 • झारखंड या राज्यात आजच्याच दिवशी २००९ साली नक्सलवादी संघटनेने नेते रामचंद्र सिंह यांच्या समवेत ईतर सात लोकांचे अपहरण केले होते.

13 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 November  Historical Event

 • पंजाब या प्रदेशाचे शासक महाराजा रणजीत सिंह यांचा १७८० साली जन्म झाला होता.
 • प्रसिध्द शिक्षण शास्त्री, न्यायाधीश तसेच समाजसेवक मुकुंद जयकर यांचा १८७३ साली जन्म झाला होता.
 • कहानी व गद्य काव्य लेखक राय कृष्णदास यांचा १८९२ साली जन्म झाला होता.
 • प्रसिध्द कवी मुक्तिबोध माधव यांचा १९१७ साली जन्म झाला होता.
 • वरिष्ठ कॉंग्रेस पक्षाचे नेता व अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे पूर्व अध्यक्ष प्रियरंजन दास मुंशी यांचा १९४५ साली जन्म झाला होता.
 • प्रसिध्द भारतीय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिचा १९६७ साली आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
 • हिंदी चित्रपट सृष्टी तील प्रसिध्द अभिनेत्री जुही चावला हिचा १९६८ साली आजच्याच दिवशी जन्म झाला होता.

13 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 13 November Death / Punyatithi / Smrutidin

 • लाहोर या ठिकाणी भगवान दास यांचे १५८९ साली निधन झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top