• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Monday, July 4, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History Forts

पद्मदुर्ग किल्ला माहिती

Padmadurg Fort

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी बऱ्याच किल्ल्यांची निर्मिती केली. त्यात अनेक गिरिदुर्ग, जलदुर्ग किंवा सागरीदुर्ग आणि भुईकोट किल्ले आहेत. त्यांनी बांधलेल्या अनेक जलदुर्ग किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे ज्याचे नाव पद्मदुर्ग असे आहे.

पद्मदुर्ग किल्ला माहिती – Padmadurg Fort Information in Marathi

पद्मदुर्ग हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड जवळ अरबी समुद्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी हा एक जलदुर्ग. पद्मदुर्ग किल्ल्याला त्याच्या असणाऱ्या कासवाच्या आकारामुळे स्थानिक लोकं त्याला कासा किल्ला म्हणूनही ओळखतात.

किल्ल्याच्या मुख्य दारासमोरील मोठा बुरुज आहे या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे दिसतो म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे.

पद्मदुर्ग किल्ल्याचा इतिहास – History of Padmdurg Fort

कोकणपट्टीला जंजिऱ्याचा सिद्दीचा त्रास वाढतच चालला होता. त्याला आळा घालणे फार आवश्यक होते. शिवाजी महाराजांनी मुरुड जवळ सामराजगड बांधून सिद्दीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आणले. त्याचबरोबर सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींवर जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरुड जवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला.

या किल्ल्यामुळे सिद्दीच्या हालचालींवर मर्यादा येणार होत्या त्यामुळे सिद्दी अस्वस्थ झाला. किल्ल्याचे बांधकाम सुरु असतांना सिद्दीने अनेक मोहिमा काढत किल्ल्याचे बांधकाम होऊ न देण्याचे खुप प्रयत्न केले. मात्र मावळ्यांनी रात्रंदिवस सिद्दीशी लढत लढतच किल्ल्याची उभारणी केली.

1676 साली महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम काढली ज्याचे नेतृत्व त्यांनी मोरोपंत पिंगळे यांना दिले.

मोरोपंतांनी जंजिऱ्याला शिड्या लावण्याची धाडसी योजना आखली. किल्ल्यावरच काम करणाऱ्या सोनकोळ्यांचा प्रमुख लाय पाटलाने हे आव्हान स्वीकारले.

एका गडद अंधाऱ्या रात्री ते आपल्या सहकार्यांसोबत मोहिमेवर निघाले. त्यांनी किल्ल्यावर चढण्यासाठी जंजिऱ्याच्या मागच्या बाजूने शिड्या लावल्या आणि योजनेनुसार मोरोपंतांच्या सैन्याची वाट पाहत बसले. पहाट होत आली पण मोरोपंतांचे धारकरी आले नाहीत त्यामुळे निराश होऊन लाय पाटील पद्मदुर्गवर परत आले.

लाय पाटलांचे हे धाडस पाहून महाराजांनी त्यांचा सत्कार घेतला आणि त्यांना दर्याकिनारीची सरपाटीलकी दिली. ह्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेला हा पद्मदुर्ग किल्ला.

शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत पद्‌मदूर्ग स्वराज्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1689 मध्येही हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा दाखला आढळतो.

पद्मदुर्ग किल्ला – रचना – Padmadurg Fort – Architecture

हा जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. तसेच या किल्ल्याची उंची 500 फुट आहे.

किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठ्या प्रमाणावर नामशेष होत आला आहे, परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही बऱ्यापैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरून उभा आहे.

पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेषच आता पाहायला मिळतात. पद्मदुर्गाच्या महाद्वारामधे प्रवेश करण्यासाठी चार पाच पायऱ्या चढाव्या लागतात.

दाराच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्या आहेत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्गही आहे.

मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वर चार टाक्या बांधलेल्या आहेत.

तटबंदीवरून जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. तसेच येथून मुरूडचा किनाराही उत्तम दिसतो.

पद्मदुर्ग किल्ल्यावर कसे जाता येईल – How to reach Padmadurg Fort 

हा किल्ला नौदलाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्यामुळे येथे जाण्याआधी तुम्हाला नौदलाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते.

मुरूडला जाण्यासाठी अलिबाग- मुरुड- रेवदंड हा एक गाडी मार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्गावरील नागोठणे अथवा कोलाड येथून रोहे, नंतर रोहे-चणेरे बिरवाडी मार्गे मुरूडला जाता येते.

या किल्ल्यावर जाण्यासाठी जंजिरा किल्ल्यासारख्या बोटी नाहीत. त्यामुळे मुरुड मधून राजपुरीकडे जाणारा रस्ता आहे.

या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे. गावाच्या किनाऱ्यावर अनेक मच्छीमारी नावा उभ्या असतात.

त्यातील काही नाविक समुद्राची आणि हवामानाची परिस्थिती पाहूनच हे पद्मदुर्गाकडे येण्यासाठी तयार होऊ शकतात.

एकदऱ्यापासून किंवा राजपुरीपासून नावेने तासाभरात आपण या किल्ल्याला पोहोचतो.

तर या लेखात पद्मदुर्ग किल्ल्याविषयीची माहिती तुम्ही वाचली. तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा.

अशाच नवनवीन माहितीसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.

पद्मदुर्ग किल्ल्याविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Padmadurg Fort

Q. पद्मदुर्ग (कासा) किल्ला कोणी बांधला?

उ. छत्रपती शिवाजी महाराज.

Q. पद्मदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

उ. रायगड जिल्ह्यातील मुरुड जवळील अरबी समुद्रात.

Q. पद्मदुर्ग किल्ला बांधण्यामागे शिवाजी महाराजांचा नेमका उद्देश काय होता?

उ. जंजिराच्या सिद्दीवर नियंत्रण आणणे.

Q. पद्मदुर्ग किल्ला हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे?

उ. हा किल्ला जलदुर्ग प्रकारचा आहे.

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
June 8, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
June 1, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved