• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, May 21, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Festival

गुढीपाडवा विशेष माहिती मराठींमध्ये

Gudi Padwa in Marathi

चैत्र शुध्द प्रतिपदेला प्रामुख्याने महाराष्ट्रात अत्यंत आनंदाने साजरा होणारा सण गुढीपाडवा!

मराठी माणसांच्या नववर्षाचा हा पहिला दिवस..

गुढीपाडवा विशेष माहिती मराठींमध्ये – Gudipadwa Information in Marathi

Gudi Padwa Information Marathi

गुढीपाडवा बद्दल माहिती – Gudi Padwa History in Marathi

शुभमुहूर्त – Shubhmuhurt

साडे तिन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस गुढीपाडवा! (दसरा, गुढीपाडवा, अक्षयतृतिया हे तीन पुर्ण मुहूर्त आणि दिवाळीचा पाडवा म्हणजे कार्तिक शुध्द प्रतिपदेचा अर्धा मुहूर्त).

कोणतही शुभकार्य करण्याकरिता या दिवशी सुरूवात करावी. इतर दिवसांसारखे या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते.

मराठी, कोंकणी, कानडी आणि तेलगु भाषीक समाज हा उत्सव साजरा करतांना आपल्याला दिसतं.

वसंत ऋतुचं आगमन या दिवसापासुन होतं. नव्या शालिवाहन संवत्सराला या दिवसापासुन सुरूवात होते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या प्रतिष्ठानांचे उद्घाटन केल्या जाते. सोन्याची खरेदी, नव्या वास्तुत गृहप्रवेश, व्यवसायाला प्रारंभ अश्या महत्वाच्या गोष्टींसाठी गुढीपाडवा या दिवशी सुरूवात केली जाते.

प्रभु रामचंद्राचं अयोध्येत आगमन – Gudi Padwa Story in Marathi

हिंदु समाजात आपापल्या घराच्या दारात गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजयाचे, समृध्दीचे आणि सकारात्मकतेचे शुभ प्रतिक समजले जाते.

प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवुन रावणासारख्या बलाढय शत्रुचा आणि इतर राक्षसांचा पराभव केला व आजच्याच दिवशी अयोध्येला परतले. त्यांच्या आगमना प्रित्यर्थ अयोध्या वासियांनी आपापल्या दारात गुढया उभारून त्यांचे स्वागत केले होते.

या गुढी पाडव्यापासुन राम जन्मोत्सवाला देखील सुरूवात होते आणि रामनवमीला रामजन्म केल्या जातो.

अशी उभारतात गुढी – Gudi Padwa Puja Vidhi

शुभशकुनाच्या या गुढीत एक स्वच्छ काठी, त्या काठीच्या टोकावर नवे वस्त्र (साडी, ब्लाउजपिस, रूमाल), गाठी, आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं, झेंडुच्या फुलांची माळ, तांब्याच्या धातुचा लोटा अश्या सर्व वस्तुंनी ही गुढी सजवली जाते.

या गुढीच्या भवती रांगोळी आणि इतर सजावट केली जाते, तिच्याकरता पाट मांडला जातो, गोड धोडाचा नैवेद्य दाखविला जातो, निराजंन उदबत्ती लावुन औक्षवण केले जाते. संध्याकाळी सुर्यास्तापुर्वी हळदकुंकु अक्षता वाहुन गुढी उतरवली जाते.

हिंदु बांधव एकमेकांना नविन वर्षाच्या म्हणजेच गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतात…

आरोग्याच्या दृष्टीने महत्व – Importance of Gudi Padwa in Marathi

चैत्र शुध्द प्रतिपदेचे अर्थात गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्व आहे. या दिवशी मीठ, हिंग, ओवा, मिरी, साखर आणि कडुलिंबाच्या पानांना एकत्र करून गोळी तयार केली जाते आणि तीचे सेवन केले जाते. यामुळे पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वेचेचे आरोग्य सुधारते त्यामुळे या गोळीचे आयुर्वेदात अतिशय महत्व सांगितले आहे.

कडुलिंबाची पानं या दिवसांमधे अंघोळीच्या पाण्यामधे टाकुन स्नान करणे चांगले मानले आहे.

गौतमीपुत्राची सत्ता असलेली राज्य कर्नाटक व आंध्रप्रदेश मधे स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद साजरा करण्याकरता या दिवशी संवत्सर पाडवो व उगादी (Ugadi) या निराळया नावांनी हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.

पुराणातील कथा – Gudi Padwa Pauranik Katha

पुराणात लिहुन ठेवल्यानुसार एका शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने शकांचा पराभव करण्याकरता सहा हजार मातिचे पुतळे बनविले आणि त्यात प्राण फुंकले. यांच्या सहाय्याने शंकराचा पराभव करण्यात आला. शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना सुरू होण्याची परंपरा तेव्हांपासुनच सुरू झाली.

देवी पार्वतीचा आणि महादेवाचा विवाह पाडव्याच्याच दिवशी ठरला असल्याची देखील कथा आहे. पाडव्यापासुन लग्नाच्या तयारीला सुरूवात झाली आणि तृतियेला त्यांचा विवाह संपन्न झाला. पाडव्याच्या दिवशी देवी पार्वतीची आदिशक्तीची पुजा करण्याची देखील प्रथा आहे. त्याला चैत्र नवरात्र देखील म्हणतात.

विवाहानंतर देवी पार्वती महिन्याभरा करिता माहेरी येते. तिचा कौतुक सोहळा म्हणुन हळदीकुंकु आयोजित केले जाते. देवी पार्वती अक्षयतृतियेला सासरी निघते…

अहिराणी भाषेतिल ज्यांच्या कविता फार प्रसिध्द आहेत अश्या बहिणाबाई चौधरींची गुढिपाडव्यावरची कविता देखील फार लोकप्रिय आहे..

गुढि पाडव्या वर कविता – Gudi Padwa Kavita

गुढीपाडव्याचा सन

 आतां उभारा रे गुढी

 नव्या वरसाचं देनं

 सोडा मनांतली आढी

 गेलसालीं गेली आढी

 आतां पाडवा पाडवा

 तुम्ही येरांयेरांवरी

 लोभ वाढवा वाढवा.

या दिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केल्या जातं..  गुढीपाडवा पहाट सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. गेल्या काही वर्षांमधे अश्या प्रकारच्या कार्यक्रमांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तर आपण आज पाहिले साडे तिन महुर्तांपैकी एक महुर्ताचे वर्णन तर आशा करतो तुम्हाला आमचा लिहिलेला हा आवडला असेल आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

Thank You And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Information

गेटवे ऑफ इंडिया माहिती

Gateway of India Mahiti मुंबई हे नाव जरी ऐकले कि डोळ्यांसमोर एक मोठ्ठ शहर उभं राहतं. तिथला सुमुद्र, पंचतारांकित हॉटेल्स,...

by Editorial team
May 10, 2022
ग्रहांचे नावे मराठीत
Information

ग्रहांचे नावे मराठीत

Name of Planets in Marathi आपल्या सर्वांना माहित आहे की या जगाला अंत नाही. या विश्वात कितीतरी आकाशगंगा, कितीतरी सूर्यमाला...

by Editorial team
May 11, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved