अक्षयतृतीयेबद्दलची माहिती मराठींमध्ये

Akshaya Tritiya Mahiti Marathi

साडेतिन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणुन ज्या दिवसाचं महत्व विशद केलं जातं असा हा दिवस अक्षयतृतीया! आखाजी.. अश्या कितीतरी नावांनी साजरा होणारा हा सण भारतातल्या अनेक भागात निरनिराळया नावाने साजरा होतो.

या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तुंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणुन अक्षयतृतीयेचं विशेष महत्व समजल्या जातं.

वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणुन प्रसिध्द आहे. या दिवशी पाण्याचे दान करण्याचा देखील प्रघात आहे. मातीच्या घागरीत वाळा घालुन थंड पाणी ब्राम्हणाला दान दिल्यास ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं अशी समजुत आहे.

थंडगार पाण्यासमवेत, कैरीचं पन्हं, वाटली डाळ, आंबा किंवा आंब्याचा रस, सातु, अश्या अनेक गोष्टींचे या दिवशी सेवन केले जाते आणि दान देखील करण्यात येतं. तसे पाहता या सर्व गोष्टी मनुष्याच्या जीवाला गारवा प्रदान करणाऱ्या आहेत आणि अक्षयतृतीया हा दिवसच मुळी भर उन्हाळयात येणारा असल्याने या गोष्टींचे सेवन करून मनुष्याला आरोग्य लाभ मिळावा हा देखील हेतु या सर्व पदार्थांमधुन अभिप्रेत होतो.

अक्षयतृतीयेबद्दलची माहिती मराठींमध्ये – Akshaya Tritiya Information in Marathi

akshaya tritiya information in marathi

साडेतिन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त….. अक्षयतृतीया – Good Muhurtas ….. Akshaya Tritiya

अक्षय तृतीयेपासुन अनेक ठिकाणी लोक आपल्या पुर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाणपोया सुरू करतात अनेक ठिकाणी काठोकाठ भरलेले थंड पाण्याचे रांजण आपल्याला दृष्टीस पडतात ते याच दिवसापासुन. मनुष्याच्या जीवाला त्यांच्या आत्म्याला तृप्तता देउन पुण्य कमविण्याचा हा एक प्रयत्न दिसुन येतो. निसर्ग निर्मीत पाण्याचे साठे या दिवसांमधे कमी होत असल्यामुळे धनिक मंडळी पाणपोया सुरू करीत असावेत असा देखील एक कयास बांधल्या जातो.

पुराणकथेनुसार या दिवशी महाभारताचे युध्द संपुन महर्षी व्यासांनी महाभारत ग्रंथाची  रचना करण्यास आरंभ केला आणि लिहीण्याचे कार्य श्री गणेशाने केले असल्याचे नमुद आहे. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठीरास सांगितले की या दिवशी केलेल्या दानाचा कधीही क्षय होत नाही म्हणुन या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हणतात. परमेश्वराला आणि आपल्या पुर्वजांना स्मरण करून जे कार्य केले जाते ते सर्व अक्षय अर्थात अविनाशी होते.

चैत्र महिन्यात अनेक सुवासिनी चैत्रा गौर मांडतात.

चैत्रा गौरीच्या निमीत्ताने अनेक स्त्रिया हळदी कुंकवाचे आयोजन करून सवाष्णींना मोगऱ्याचा गजरा, कैरीची डाळ आणि पन्हे प्यावयास देतात.

नव्या घरात गृहप्रवेश, वास्तु पुजन, नव्या व्यवसायाचा आरंभ, शुभविवाह, यांसारख्या गोष्टींकरता हा दिवस अतिशय शुभ मानल्या जातो.

नवे अलंकार, सोने खरेदी केल्यास ती अक्षय होत असल्याने सोनारांच्या दुकानात या दिवशी मोठया प्रमाणात गर्दी पहायला मिळते.

हिंदु परंपरेप्रमाणे या दिवशी करावयाच्या गोष्टी – How to Celebrate Akshaya Tritiya

  • अक्षयतृतीयेच्या दिवशी नदीत किंवा समुद्रात स्नानाचे महत्व सांगीतले आहे.
  • फळं, वस्त्राचे दान, पंखा, तांदुळ, मीठ, साखर, तुप, चिंच, याचे दान ब्राम्हणाला देऊन दक्षिणा द्यावी.
  • ब्राम्हण भोजनाचे देखील या दिवशी महत्व आहे.
  • या दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने, नवे वस्त्र खरेदी करावे.
  • वाहन घ्यावयाचे झाल्यास त्याची खरेदी अक्षयतृतीयेला करावी.
  • या दिवशी सातुचे महत्व असुन त्याचे दान दयावे आणि सेवन देखील करावे.
  • पाण्याने भरलेली घागर वाळा घालुन ब्राम्हणास दान द्यावी.
  • पळसाच्या पानांनी बनवलेल्या पत्रावळीवर खीर, कैरीचे पन्हं, चिंचोणी, कुरडया, कैरीची डाळ ब्राम्हणास खावयास द्यावी.

अक्षय सुखाचे दान देणारा हा दिवस सर्वत्र अतिशय भक्तिभावाने, पारंपारिक पध्दतीने साजरा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आजही पहावयास मिळते.

माहेरवाशिणी या दिवसांमधे माहेरी येत असल्याने त्यांचे कोडकौतुक देखील या सणाच्या निमीत्ताने केल्या जाते.

आपला अभिप्राय नक्की कळवा आंमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आणि आंमच्या माझी मराठी ला अवश्य भेट दया.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top