डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीविषयी माहिती

Babasaheb Ambedkar Jayanti Mahiti

१४ एप्रिल हा दिवस भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस अखिल बौध्द बांधव एका सणाप्रमाणे साजरा करतांना आपल्याला दिसुन येतात. समानता दिन आणि ज्ञान दिवसाच्या स्वरूपात देखील हा दिवस संपन्न होतो.

आयुष्यभर समानतेकरीता आपले जीवन खर्ची घालणारे बाबासाहेब समानतेचे प्रतिक आणि ज्ञानाचे प्रतिक म्हणुन देखील ओळखले जातात.

तव्दतच बाबासाहेबांना मानवाधिकाराचे आंदोलन, भारतीय संविधानाचे निर्माता म्हणुन आणि त्यांच्या प्रकांड विव्दत्ते करीता देखील संपुर्ण समाज त्यांना ओळखतो.

अगदी सुरूवातीला बाबासाहेबांचा जन्मदिवस सदाशिव रणपिसे या बाबासाहेबांच्या अनुयायींनी पुण्यात १४ एप्रिल १९२८ ला साजरा केला, बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू करण्याच्या मान त्यांना दिला जातो. सदाशिव रणपिसे बाबासाहेबांचे अनुयायी होते.

१४ एप्रिल ला बाबासाहेबांची प्रतिमा त्यांनी हत्तीच्या अंबारीवर विराजमान केली आणि रथातुन, उंटावरून भव्य मिरवणुक काढली.

आज देखील त्यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर लाखो अनुयायी बाबासाहेबांची जन्मभुमी मध्यप्रदेशातील महु या ठिकाणी, नागपुरातील दिक्षाभुमी व त्यांच्या समाधी स्थळावर मुंबईतील चैत्यभुमीवर एकत्र येत त्यांना अभिवादन करतात.

सरकारी कार्यांलयांमधे, भारतातील बौध्दविहारांमधुन बाबासाहेबांना या दिवशी नमन केले जाते.

डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीविषयी माहिती – Dr Babasaheb Ambedkar Jayanti in Marathi

Dr Babasaheb Ambedkar Jayanti in Marathi

२०१६ साली भारत सरकारने मोठया प्रमाणात बाबासाहेबांची जयंती (Babasaheb Jayanti) साजरी केली.

संयुक्त राष्ट्राने देखील पहिल्यांदा डॉ.आंबेडकरांची जयंती साजरी केली यावेळी १५६ देशातील प्रतिनीधी या कार्यक्रमात सहभागी झाले.

याप्रसंगी संयुक्त राष्ट्राने डॉ.आंबेडकरांचा “विश्व प्रणेता’’ म्हणुन गौरव केला.

संयुक्त राष्ट्राच्या ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय व्यक्तीची जयंती साजरी करण्यात आली.

बाबासाहेबांच्या व्यतिरीक्त आजपर्यंत केवळ दोनच व्यक्तींची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केलीये एक म्हणजे मार्टिन लुथर किंग आणि नेल्सन मंडेला.

डॉ. भिमराव आंबेडकर, मार्टिन लूथर किंग, आणि नेल्सन मंडेला हे तिघे महापुरूष मानवाधिकार संघर्षातील सर्वात महान नेता आहेत…

बाबासाहेबांचा जन्मदिवस आणि त्यांचे योगदान पाहता भारतीय लोकांकरीता हा दिवस उत्सवापेक्षाही उत्साहाने भरलेला असतो.

१४ एप्रिल या बाबासाहेबांच्या जन्मदिवशी शासकिय सुट्टी घोषीत करण्यात आली आहे.

दिल्लीत संसद भवनात प्रतीवर्षी त्यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात येते. भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान इतर राजकीय पक्षांसमवेत बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करतात.

भारतातील जनतेकरीता बाबासाहेबांच्या अतुल्य योगदानाला कधीही विसरता येणार नाही.

भारतीय  संविधानाचे जनक म्हणुन आपण त्यांना पाहातो.

भारतातील खालच्या वर्गातील समुहाकरीता, त्यांच्या आर्थिक उन्नतीकरीता शिक्षणाचे महत्व बाबासाहेबांनी जाणले आणि त्या करीता अविश्रांत परिश्रम घेतले.

अस्पृश्यांना समानतेचा अधिकार मिळण्याकरीता ’’चवदार तळयाचे आंदोलन’’ कधीही विसरता येणार नाही

बौध्द धर्माव्दारे आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांची सामाजिक क्रांती सुरूच राहिली.

भारतीय समाजा करीता त्यांनी दिलेल्या योगदानाला पहाता १९९० साली एप्रिल महिन्यात त्यांना “भारतरत्न’’ हा किताब देउन सन्मानित करण्यात आले.

ओशो आणि बराक ओबामा सारख्या अनेक प्रभावशाली आणि सुशिक्षीत व्यक्तिमत्वांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला आणि विचारांना प्रोत्साहित केले आणि त्यांची प्रशंसा केली आहे.

बाबासाहेबांच्या सन्मानार्थ अनेक सार्वजनिक संस्थांचे नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.

कित्येक चित्रपटांमधे आणि पुस्तकांमधे त्यांच्या विचारांचे वर्णन करण्यात आले आहे.

समाजातील प्रत्येक सदस्या मधुन जातीधर्माच्या भेदभावाला दुर करून समानतेची आणि समाधानाची भावना निर्माण करणे हे बाबासाहेबांचे खरे उद्दिष्ट होते.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here