“सुभाष चंद्र बोस” स्वातंत्र्य काळातील अग्रगण्य नेता

Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi

“तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा!” असे घोषवाक्ये देणारे स्वातंत्र्य काळातील सुपर हिरो सुभाष चंद्र बोस ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे, सोबतच इंग्रजांचा सामना खूप चांगल्या पद्धतीने केला, इतिहासातील ह्याच महान व्यक्तिमत्वा विषयी आपण आजच्या लेखात माहिती पाहणार आहोत, तर चला पाहूया सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी माहिती.

“सुभाष चंद्र बोस” स्वातंत्र्य काळातील अग्रगण्य नेता – Subhash Chandra Bose Information in Marathi

Subhash Chandra Bose Information in Marathi
Subhash Chandra Bose Information in Marathi

सुभाषचंद्र बोस यांचे सुरुवातीचे जीवन – Subhash Chandra Bose History in Marathi

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओडीसा च्या कटक येथील प्रसिद्ध वकील जानकीनाथ यांच्या घरी २३ जानेवारी १८९७ ला झाला. त्यांच्या आईचे नाव प्रभावती देवी असे होते, वडील प्रतिष्ठीत वकील होते, त्यांना ब्रिटिशांच्या काळातील सन्मानीय पदवी “रावबहादूर” ने सन्मानित केल्या गेले होते, पण भारतावर इंग्रजांचे दडपण असल्या कारणाने त्यांनी त्या पदवीचा त्याग केला होता, आणि तेथूनच लहान सुभाष यांच्यात इंग्रजांविषयी द्वेष निर्माण होत गेला होता.

त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण प्रोटेस्टंड युरोपियन स्कूल मधून पूर्ण केले, आणि त्यांनतर १९०९ ला रेवेनशा च्या कोलोजियेट स्कूल मध्ये त्यांनी प्रवेश घेतला, तेथे त्यांच्यावर त्या शाळेचे मुख्याध्यापक बेधीमाधव दास यांचा चांगला प्रभाव पडला. सोबतच स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकांचे त्यांनी खूप चांगले रित्या वाचन आणि चिंतन केले.

पुढे मेहनतीने अभ्यास केल्यामुळे नेताजी यांचा दहावीमध्ये दुसरा क्रमांक आला होतो, त्यानंतर नेताजींनी प्रेसीडेंसी कॉलेज ला प्रवेश घेतला,

जेव्हा नेताजी १९११ ला कॉलेजात जाऊ लागले, तेव्हा एकदा एका इंग्रजी शिक्षकाने भारतीयांविषयी काही तरी विवादास्पद विधान दिले, तेव्हा ते नेताजींना सहन झाले नाही, आणि त्यांनी त्या शिक्षकाचा विरोध केला, याच कारणामुळे त्यांना एका वर्षासाठी त्या कॉलेजातून काढले गेलं,

नेताजींचे देशावरील प्रेम – Subhash Chandra Bose Mahiti Marathi

१९१८ ला कोलकत्याच्या स्कॉटिश कॉलेजमधून त्यांनी फिलोसोपी विषयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर सिविल सर्विस ची तयारी करण्यासाठी नेताजींनी कैम्ब्रिज च्या फ्रिट्ज विलियम कॉलेज मध्ये प्रवेश घेतला, आणि काही वर्षातच नेताजींनी चौथ्या क्रमांकावर येऊन या परीक्षेत उत्तीर्ण झाले. आणि सिविल सर्विस मध्ये नोकरी मिळविली सुद्धा. पण नेताजी या नोकरीला जास्त दिवस करू शकले नाही कारण तेव्हा हि सेवा इंग्रजांच्या हाताखाली काम करण्यासारखी होती,

यानंतर ते भरतात परत आले, त्यांच्यात देश प्रेम हे लहान पणा पासूनच भिनलेलं होत, आणि ते देश प्रेम तेव्हा आणखी खवळून बाहेर निघाले जेव्हा भारतामध्ये जालियानवाला बाग हत्याकांड झाले, तेव्हा त्यांनी ठरविले कि इंग्रजांचा आपल्या देशावर आणखी अत्याचार करू द्यायचा नाही,

त्यांनी भारतीय कॉंग्रेस च्या सोबत राहून सुद्धा लोकांना इंग्रजांविरुद्ध आवाज उठविण्याचे सांगितले, पण काही दिवसांनंतर नेताजीं कॉंग्रेस मधून बाहेर पडले, आणि बाहेर पडल्या नंतर त्यांनी २२ जून १९३९ ला फोरवर्ड ब्लॉक ची स्थापना केली, कॉंग्रेस मधून बाहेर पडण्याचे कारण होते कि महात्मा गांधी आणि नेताजींचे विचार विपरीत होते, महात्मा गांधीनी अहिंसेच्या मार्गावरून स्वातंत्र्य मिळविण्याचे ठरविले होते, तेच नेताजी हिंसेवर सुद्धा विश्वास ठेवायचे,

शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो:

जेव्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताला न विचारता इंग्रज सरकार ने भारत देश त्यांच्या कडून लढणार असे वक्तव्य केले होते तेव्हा नेताजींनी त्या गोष्टीचा सामुहिक विरोध केला होता, तेव्हा त्यांना ७ दिवस जेल मध्ये काढावे लागले होते आणि ४० दिवसांपर्यंत नजरबंद केले गेले होते,

तर त्या नजर बंदीतून त्यांनी बाहेर पडण्याचे ठरविले, त्यांनी एका मौलवीची वेशभूषा धारण केली, तेथून थेट अफगाणिस्तानातून सोवियत संघ, मॉस्को, रोम च्या मार्गे जर्मनी मध्ये ला पोहचले. आणि तेथे त्यांनी काही विशेष व्यक्तींच्या मार्गदर्शनातून एका विशेष ब्युरो ची स्थापना केली. आणि या ब्युरो द्वारे त्यांनी रेडीओ च्या आझाद हिंद चे प्रसारण सुरु केले, सोबतच ब्रिटीशांच्या विरुद्ध जर्मनी आणि जपान यांना मदतीची मागणी केली होती.

इंग्रजांसाठी सर्वात घातक:

१९४३ च्या जुलै महिन्यामध्ये नेताजींनी जर्मनी वरून सिंगापूर ला प्रस्थान केले, आणि तेथे नेताजींनी राष्ट्रीय सेनेचे गठन करण्याचे ठरविले, आणि त्यांनी राश बिहारी बोस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेनेचे सुद्धा गठन केले. या सेनेमध्ये महिलांसाठी एक स्पेशल युनिट होते त्या युनिट ला त्यांनी झाशीची राणी युनिट म्हणून नाव दिले. आणि दिवसेंदिवस हे संघटन वाढत चालले होते.

नेताजी इंग्रजांविरुद्ध देशाच्या बाहेरून लढत होते, आणि इंग्रजांसाठी या गोष्टीला कसे सामोरे जावे हि गोष्ट लक्षात येत नव्हती, म्हणून नेताजी इंग्रजांसाठी खूप घातक ठरले होते, जेव्हा त्यांनी जर्मनी मध्ये रेडीओ च्या माध्यमाने नवीन चळवळ सुरु केली होती, तेव्हा पासून इंग्रजांची नजर त्यांच्यावर होती असे म्हणावे लागेल, तेव्हा नेताजींनी सेनेला घेऊन अंदमान निकोबार, मणिपूर या ठिकाणी भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवला होता,

पण त्यानंतर काही राष्ट्रकुल सैन्याच्या हमल्या नंतर नेताजींच्या सेनेचे मनोबल पडले, आणि या पराभवानंतर ते रशिया ची मदत मागायला विमानामध्ये निघाले आणि हे विमान १८ ऑगस्ट १९४५ ला ताईवान जवळ क्रॅश झाले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांचा मृतदेह सापडला नाही. आणि त्यांची मृत्यू आजही एक विवादच बनून आहे.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here