थोर पराक्रमी वीरांगना…झाशीची राणी लक्ष्मीबाई

Jhansi Lakshmi Bai Yanchi Mahiti

आपल्या पवित्र अश्या भारत भूमीत बरेच शूर पराक्रमी झुंजार योद्धे जन्माला आले, या शुरविरांमध्ये एक अशी राणी होऊन गेली जीने आपल्या साम्राज्याला इंग्रजांच्या हाती जाण्यापासून वाचवण्याकरता त्यांच्याशी कडवी झुंज दिली…झाशी ला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. राणी लक्ष्मीबाई 1857 च्या स्वातंत्र्य समरातील शूर वीरांगना…उत्तर मध्य भारतात असलेल्या झाशी या मराठा शासित राज्याची राणी. मिळालेल्या अल्प आयुष्यात ब्रिटीश साम्राज्याशी लढा देत त्यांनी रणसंग्राम पुकारला होता.

झाशीची राणी लक्ष्मीबाई एक महान वीरांगना – Rani Laxmibai Information in Marathi

Rani Laxmibai Information in Marathiराणी लक्ष्मीबाईंचा इतिहास – Rani Lakshmi Bai Biography in Marathi

नाव (Name) राणी लक्ष्मीबाई (माणिकर्णिका तांबे)
टोपण नाव  मनु
जन्म (Birthday) 19 नोव्हेंबर 1828
जन्मस्थान (Birthplace) वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत
वडील (Father Name) मोरोपंत तांबे
आई (Mother Name) भागीरथी बाई
विवाह (Marriage) 19 मे 1842
पती (Husband Name) झाशी चे महाराज गंगाधरराव नेवाळकर
अपत्य (Childrens) दामोदर राव, आनंद राव (दत्तक पुत्र)
उल्लेखनीय कार्य 1857 चा स्वातंत्र्य संग्राम
धर्म हिंदू
राज्य झाशी
आवड घोडेस्वारी, धनुर्विद्या
मृत्यू (Death) 18 जून 1858
मृत्यूचे ठिकाण कोटा नजीक, ग्वालियर, मध्य प्रदेश, भारत

झाशीची राणी लक्ष्मीबाईचा इतिहास – Rani Lakshmi Bai History in Marathi

राणी लक्ष्मीबाईने आपल्या अद्वितीय साहस आणि पराक्रमाने केवळ इतिहास रचला असे नसून प्रत्येक स्त्री च्या मनात साहस आणि उर्जेचा संचार घडवला  आपल्यातील पराक्रमाने कित्येक राजांना पराजित केलं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांना कडवी झुंज देत इतिहासाच्या पानांमध्ये आपली विजयगाथा सुवर्णाक्षरांनी कोरली.

लक्ष्मीबाईंनी आपल्या झाशीला वाचविण्यासाठी ब्रिटीशांशी लढण्याचे अतुलनीय साहस दाखवले आणि झुंजार लढवय्याचे मरण स्वीकारले. तिच्या पराक्रमी इतिहासाचे स्मरण आज देखील अभिमानाने केलं जातं. राणी लक्ष्मीबाईने आपल्या बलिदानाने आणि पराक्रमाने केवळ भारतीय स्त्रीच नव्हे तर समस्त देशातील स्त्रियांची मान अभिमानानं उंच केली आहे. राणी लक्ष्मीबाईचं जीवन देशभक्ती आणि बलिदानाची एक अनुपम गाथा आहे.

राणी लक्ष्मीबाई चे प्रारंभिक जीवन – Rani Laxmi Bai Information

राणी लक्ष्मीबाईचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 ला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे भदैनी नगर इथं झाला. बालपणी त्यांना मणिकर्णिका आणि प्रेमानं मनु म्हंटलं  जाई. त्यांचे वडील मोरोपंत तांबे बिठूर न्यायालयात पेशवा होते, लक्ष्मीबाईंचे वडील आधुनिक विचारसरणीचे होते मुलींना समाजात स्वातंत्र्य व शिक्षण मिळायला हवं यावर त्यांचा विश्वास होता.

आपल्या वडिलांच्या या विचारांचा लक्ष्मीबाईंवर फार प्रभाव होता. लक्ष्मीबाईंमधील प्रतिभा मोरोपंतानी बालपणीच ओळखली होती आणि त्यामुळे त्यांना त्या काळातील इतर मुलींच्या तुलनेत अधिक स्वातंत्र्य दिल्या गेलं होतं. लक्ष्मीबाई अवघ्या 4 वर्षांच्या असतांना त्यांच्या आई भागीरथी बाईंचं निधन झालं त्यामुळे त्यांचा सांभाळ मोरोपंतानी केला.

मोरोपंत तांबे बाजीराव पेशव्यांच्या सेवेत असतांना एका ज्योतिष्याने लक्ष्मीबाईंच्या जन्मावेळी भविष्यवाणी केली होती की की मोठी होऊन ही मुलगी साम्राज्याची राणी होईल…आणि झाले देखील तसेच, पुढे लक्ष्मीबाई झाशीची राणी झाल्या आणि आपल्यातील दुर्दम्य साहस आणि पराक्रमाने सर्वांसमोर उदाहरण ठरल्या. शिक्षणा सोबत त्यांनी आत्मरक्षा, घोडेस्वारी, धनुर्विद्या याचं देखील प्रशिक्षण घेतलं आणि त्यामुळे त्या शस्त्रविद्येत प्रवीण झाल्या.

लक्ष्मीबाईचं बालपण – Rani Lakshmi Bai Story

माणिकर्णिका बालपणापासून दिसायला इतकी सुंदर होती की कोणीही तिचं कौतुक केल्याशिवाय तिच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नव्हता. तिचे वडील तिला कौतुकाने छबीली म्हणत असत. तिच्या आईच्या मृत्युनंतर मोरोपंत तिला बाजीराव पेशव्यांच्या बिठूरला घेऊन गेले. या ठिकाणी तिचं बालपण गेलं.

बाजीराव पेशव्यांच्या मुलांसोबत तिचं बालपण व्यतीत झालं, ते सगळे   बहिण-भावांसारखे एकत्र राहिले. एकत्र खेळणं अभ्यास करणं, याशिवाय येथे धनुर्विद्येचे, आत्मरक्षेचे त्यांनी धडे गिरवले. त्या शस्त्रविद्येत पारंगत होत गेल्या आणि उत्तम घोडेस्वार देखील झाल्या.

राणी लक्ष्मीबाईंमधील कौशल्य  –  Rani Lakshmi Bai Skills

  • राणी लक्ष्मीबाई रोज न चुकता योगाभ्यास करत असत, त्यांच्या रोजच्या दिनचर्येचा हा एक भाग होता.
  • आपल्या प्रजेप्रती त्यांना फार प्रेम आणि वात्सल्य होते त्या प्रजेची फार काळजी घेत असत.
  • गुन्हेगारांना योग्य शिक्षा देण्याची त्यांच्यात हिम्मत होती.
  • सैन्य कार्यात त्या कायम उत्साही असत. या कार्यात त्या निपुण देखील होत्या. लक्ष्मीबाईंना घोड्यांची चांगली पारख होती. मोठ-मोठे राजे देखील त्यांच्या घोडेस्वारीचं कौतुक करत असत.

नानासाहेब पेशव्यांचे लक्ष्मीबाईंना आव्हान – Nanasaheb Peshwa’s  Challenges 

लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाचे किस्से बालपणापासून घडत होते, मोठमोठ्या आव्हानांना सुद्धा त्या लीलया पार पाडत असत. एकदा नानासाहेबांनी लक्ष्मीबाईंना आपल्यासोबत घोडेस्वारीचं आव्हान दिलं, लक्ष्मीबाईंनी हे आव्हान अगदी हसत हसत स्वीकारलं आणि नानासाहेबांना या स्पर्धेत हरवलं देखील. लक्ष्मीबाईंची घोड्याला पळवण्याची प्रतिभा पाहून त्यांनी लक्ष्मीबाईंच कौतुक केलं आणि शाबासकी दिली.

नानासाहेबांनी लक्ष्मीबाईंना तलवार चालवणे, भालाफेक, बंदुकीने निशाणा लावणे  या गोष्टी शिकविल्या. कुस्ती मलखांब सारखे व्यायाम लक्ष्मीबाईंना आवडत असत.

राणी लक्ष्मीबाईंचा विवाह –  Marriage of Rani Lakshmibai

वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्यांचा विवाह उत्तर भारतातील झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला, आणि काशीची मनु झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली. वैवाहिक जीवन सुखानं व्यतीत होत असतांना त्यांना 1851 साली पुत्ररत्न प्राप्त झालं. त्याचं नांव दामोदर राव असं ठेवण्यात आलं.

परंतु हे बाळ अल्पायुषी ठरलं, 4 महिन्याचं असतांना या बाळाचा मृत्यू झाला. कुटुंबावर दुःखाची छाया पसरली. पुत्रवियोगामुळे गंगाधरराव आजारी राहू लागले, पती-पत्नींनी नातेवाईकांच्या मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या दत्तक विधानाचा विधी ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला जेणेकरून पुढे या निर्णयावर त्यांचा विरोध नसावा. दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव पूर्वी आनंदराव असे होते जे पुढे बदलून गंगाधर राव असे ठेवण्यात आले.

सतत आजारी असल्याने अखेर 21 नोव्हेंबर 1853 साली महाराज गंगाधरराव नेवाळकरांचे निधन झाले. त्यावेळी लक्ष्मीबाई केवळ 18 वर्षांच्या होत्या. पुत्रावियोगामुळे दुःखात असलेल्या लक्ष्मीबाईंवर पती निधानामुळे जणू आभाळच कोसळलं. परंतु स्वतःला सावरत त्यांनी राज्यकारभाराची सूत्र हाती घेतली.दत्तक पुत्र दामोदर राव लहान असल्याने लक्ष्मीबाईंनी राज्यकारभार चालविण्याचा निर्णय घेतला.

राणी लक्ष्मीबाई उत्तराधिकारी झाल्याचा ब्रिटीशांनी केला विरोध – British Against Lakshmibai

राणी लक्ष्मीबाई या अत्यंत धैर्यवान आणि साहसी होत्या. प्रत्येक निर्णय त्या फार समंजसपणे घेत असत. लक्ष्मीबाईंनी ज्यावेळी राज्यकारभाराची सूत्र आपल्या हाती घेतली त्यावेळी असं नियम होता की कोणत्याही राजाचा मृत्यू झाल्यास त्याचा स्वतःचा मुलगा उत्तराधिकारी होईल, परंतु जर पुत्र नसेल तर ते राज्य पूर्णतः ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात जाईल. या नियमामुळे लक्ष्मीबाईंना उत्तराधिकारी होण्यासाठी मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला.

गंगाधररावांच्या मृत्यू पश्चात ब्रिटीशांनी झाशीवर ताबा मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले, दत्तक पुत्रावर खटला देखील भरला, राज्याची  सगळी संपत्ती देखील जप्त केली, गंगाधर रावांनी घेतलेल्या कर्जाला लक्ष्मीबाईंच्या मिळकतीतून कापण्यास सुरुवात केली त्यामुळे लक्ष्मीबाईंना झाशी चा किल्ला सोडून राणी महालात जावे लागले. या संकटांमुळे राणी लक्ष्मीबाई घाबरल्या नाहीत, विचलित झाल्या नाहीत. राज्य ब्रिटीशांच्या ताब्यात जाऊ द्यायचे नाही या आपल्या निर्णयावर त्या ठाम राहिल्या. कसही करून आपलं राज्य वाचवायचचं या निर्धाराने त्यांनी सैन्य संघटन करण्यास सुरुवात केली.

“मेरी झांसी नही दुंगी” : पराक्रमी लक्ष्मीबाईंच्या संघर्षाला सुरुवात – Lakshmibai’s Struggle

झाशी ताब्यात घेण्याचा चंग बांधलेल्या ब्रिटीशांनी 7 मार्च 1854 ला सरकारी आदेश काढला, ज्यात झाशी राज्याला ब्रिटीश साम्राज्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राणी लक्ष्मीबाईंनी या आदेशाचे उल्लंघन करत “मै अपनी झांसी नही दुंगी” असे ब्रिटीशांना कळवले आणि त्यांच्या विरोधात संघर्ष अधिक तीव्र केला.

लक्ष्मीबाईंनी इतर राज्यांच्या मदतीने सेना तयार केली, या सेनेत लोकांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला. या सैन्यात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता, त्यांना युद्धाचे विशेष प्रशिक्षण दिल्या गेले. लक्ष्मीबाईंच्या या सैन्यात युद्ध कुशल आणि विद्वान असे गुलाम खान, दोस्त खान, खुदाबक्श, सुंदर-मुंदर, काशीबाई, मोतीबाई, लालाभाऊ बक्षी, दिवाण रघुनाथ सिंह, दिवाण जवाहर सिंह यांच्या समवेत 1400 सैनिक सहभागी होते.

1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका – Role of Queen Lakshmibai in the War of Independence 1857

10 मे 1857 ला इंग्रजांच्या विरोधात विद्रोहाच्या ठिणगीने चांगलाच पेट घेतला होता. या दरम्यान बंदुकीच्या गोळ्यांमध्ये डुकराची आणि गायीची चरबी वापरली जात असल्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि संपूर्ण देशात ब्रिटीशांविरोधात संघर्षाने पेट घेतला. त्यामुळे ब्रिटीशांनी नाईलाजाने या प्रकरणाला दाबले आणि झाशीच्या लक्ष्मीबाईंना त्यांचे राज्य सुपूर्द केले. त्यानंतर 1857 साली शेजारच्या ओरछा आणि दतिया येथील राजांनी झाशीवर आक्रमण केलं, परंतु मोठ्या शौर्याने राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या पराक्रमाचा परिचय देत विजय प्राप्त केला.

1858 साली इंग्रजांचे पुन्हा झाशीवर आक्रमण – Jhansi ki Rani Story

झाशी मिळविण्याच्या हट्टाने पेटलेल्या ब्रिटीशांनी पुन्हा हल्ला केला परंतु या वेळी तात्या टोपेंच्या नेतृत्वात 20,000 सैनिकांनी त्यांच्याशी युद्ध पुकारले…हे युद्ध त्यावेळी जवळपास 2 आठवडे चालले.

इंग्रजांनी किल्ल्याची भिंत तोडून कब्जा मिळवला, लुटमार सुरु केली.

परंतु यावेळी देखील राणी लक्ष्मीबाईंनी संयमाने परिस्थिती हाताळून दामोदर रावाचा जीव वाचवला. 1858 साली ब्रिटीशांनी झाशी आपल्या ताब्यात घेतल्या नंतर राणी लक्ष्मीबाई या आपल्या सैन्य समवेत काल्पी इथं पोहोचल्या.

येथे तात्या टोपे यांनी लक्ष्मीबाईंना मदत केली. शिवाय तेथील पेशव्यांनी देखील राणीला काल्पी इथं आश्रय दिला आणि आपले सैन्य देखील तिच्या मदतीसाठी दिले. 22 मे 1858 साली सर हुय रोज यांच्या नेतृत्वात इंग्रजांनी काल्पीवर आक्रमण केले, यावेळी राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या अतुलनीय शौर्याने त्यांचा पराजय केला. त्यामुळे ब्रिटीशां माघार घ्यावी लागली. परंतु इंग्रजांनी पराभवानंतर पुन्हा एकवेळ काल्पीवर हल्ला चढवला आणि यावेळी मात्र त्यांचा विजय झाला.

काल्पी येथील पराभवा नंतर रावसाहेब पेशवा, बंदा येथील नवाब, तात्या टोपे आणि मुख्य योद्धा यांनी लक्ष्मीबाईंना ग्वालियरवर अधिकार मिळविण्यास सुचवले जेणेकरून त्यांना त्यांची ध्येयप्राप्ती व्हावी.

राणी लक्ष्मीबाईंनी तात्या टोपेंच्या मदतीने ग्वालियर च्या राजा विरोधात युद्ध केलं व विजय प्राप्त केला.

परंतु त्यांनी ग्वालियर चे राज्य पेशव्यांच्या हाती सुपूर्द केले.

राणी लक्ष्मीबाईंचा मृत्यू – Rani Lakshmibai Death

17 जून 1858 ला राणी लक्ष्मीबाईंनी किंग्स रॉयल आयरिश विरोधात युद्ध पुकारले आणि पूर्व क्षेत्रातील ग्वालियर चे नेतृत्व केले. या युद्धात त्यांच्या महिला सेविकांनी देखील त्यांना चांगली साथ दिली.गेल्या युद्धात राणीचा घोडा राजरतनमारला गेल्याने या युद्धावेळी त्यांचा घोडा नवीन होता. या युद्धा दरम्यान राणी लक्ष्मीबाईंना हे आपले अखेरचे युद्ध असल्याची जाणीव झाली होती.

प्राप्त परिस्थिती स्वीकारत त्या पराक्रमाने युद्ध करीत राहिल्या. या युद्धात राणी जबर जखमी झाली आणि घोड्यावरून खाली कोसळली.

पुरुषी पोशाख परिधान केल्यानं इंग्रज लक्ष्मीबाईंना ओळखू शकले नाही आणि त्यांना  युद्धभूमीवर सोडून चालले गेले.

राणी लक्ष्मीबाईंचे सैनिक त्यांना गंगादास मठात घेऊन गेले आणि त्यांना गंगाजल पाजलं.

“कोणताही इंग्रज मला माझ्या देहाला स्पर्श करणार नाही” ही आपली अखेरची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

अश्या तऱ्हेने 17 जून 1858 ला कोटा येथील सराई नजीक ग्वालियर मधल्या फुलबाग येथे राणी लक्ष्मीबाईला वीरगती प्राप्त झाली.

साहसी वीरांगना…रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांनी कायम मोठ्या हिमतीने शौर्याने आपल्या शत्रूला पराजित केलं.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

युद्ध लढताना तिच्याजवळ कधी फार मोठे सैन्य नव्हते,

मोठे राज्य नव्हते तरीदेखील स्वातंत्र्य संग्रामात आपल्या साहसाचा आणि पराक्रमाचा ज्या तऱ्हेने तिने परिचय दिला तो अत्यंत अभिमास्पद असाच आहे.

तिच्या शौर्याचे कौतुक शत्रूंनी देखील केले.

अश्या झुंजार राणीमुळे भारताची मान कायम गर्वाने उंच राहणार आहे. राणी लक्ष्मीबाई प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत…

सिंहासन हिल उठे, राजवंशो ने भृकुटी तानी थी

बुढे भारत में भी आई, फिर सें नयी जवानी थी

गुमी हुई आजादी की किमत, सबने पहचानी थी

दूर फिरंगी को करने की, सबने मन में ठानी थी

चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी

बुंदेले हरबोलों के मुह, हमने सुनी कहानी थी

खूब लढी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top