• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, August 16, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या २२ जून रोजी येणारे दिनविशेष

22 June Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.  आजच्या दिवशी भारताच्या इतिहास काळात बऱ्याच काही घटना घडल्या होत्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कॉंग्रेस पक्षापासून वेगळ होऊन फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापन केली होती. तसचं त्यांनी स्वरकर सदन येथे विनायक सावरकर यांची भेट देखील घेतली होती.

जाणून घ्या २२ जून रोजी येणारे दिनविशेष – 22 June Today Historical Events in Marathi

22 June History Information in Marathi
22 June History Information in Marathi

२२ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 22 June Historical Event

  • इ.स. १५०५ साली मुघल सम्राट हुमायू यांनी आपला पुत्र अकबर यांना आपला वारीसदार म्हणून घोषित केलं.
  • सन १७५७ साली इंग्रज सरकार आणि बंगालचे नवाब यांच्यात प्लासीच्या लढाईला सुरुवात झाली.
  • इ.स. १८९७ साली पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीवर बंदोबस्त करण्यासाठी इंग्रज सरकारने नेमलेल्या इंग्रज अधिकाऱ्याकडून होत असलेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून इंग्रज अधिकारी चार्ल्स रँड(Charles Rand) यांची दामोदर हरि चापेकर यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
  • सन १९०६ साली स्वीडन देशाने राष्ट्रीय ध्वज स्वीकारला.
  • सन १९३९ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षापासून अलिप्त होऊन स्वता:च्या फॉरवर्ड ब्लॉक या राजनीतिक पक्षाची स्थापना केली.
  • सन १९४१ साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जेर्मानीने सोवियत राष्ट्र रशियावर आक्रमण केलं.
  • सन १९९४ साली महाराष्ट्र सरकारने महिलां विषयी धोरण जाहीर केले. त्यानुसार, महिलांना निमसरकारी नोकऱ्यांत ३० टक्के आरक्षण देण्यात आलं.
  • सन २००७ साली भारत वंशीय अमेरिकन अंतराळ यात्री सुनिता विलियम्स आपल्या अंतराळ संघासोबत पुर्थ्वीवर सुखरूप परतल्या.
  • सन २०१६ साली भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने जागतिक विश्वविक्रम रचत आपल्या देशाच्या उपग्रहासह विदेशातील एकूण २० उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम रचला.

२२ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 22 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८०५ साली इटालियन राजकारणी, पत्रकार, व इटालियन क्रांतिकारक चळवळीचे प्रमुख ज्युसेप्पे मॅझिनी(Giuseppe Mazzini) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९६ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता व लेखक बाबुराव पेंढारकर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९८ साली भारतीय शास्त्रीय संगीताच्या ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित विनायक नारायण पटवर्धन यांचा जन्मदिन.
  • सन १९०० साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी व राजकारणी गणेश घोष यांचा जन्मदिन.
  • सन १९०८ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी लेखक, व जुन्या मराठी साहित्याचे संशोधक तसचं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाचे माजी कुलगुरू विष्णू भिकाजी कोलते यांचा जन्मदिन.
  • सन १९२५ साली भारत सरकारतर्फे लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मानित वरिष्ठ भारतीय पत्रकार,  महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राचे संपादक, इतिहासकार, अभ्यासक, उदार विचारांचे बौद्धिक, समाजसुधारक व लेखक गोविंद श्रीपाद तळवलकर यांचा जन्मदिन.
  • सन १९३२ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता अमरीश पुरी यांचा जन्मदिन.
  • सन १९८० साली कीर्ती चक्र व सेना पदक सन्मानित माजी भारतीय गोरखा रेजिमेंटम अधिकारी सुनील कुमार चौधरी यांचा जन्मदिन.
  • सन १९८५ साली भारतीय बास्केटबॉल संघाच्या माजी कर्णधार व बास्केटबॉल खेळाडू अनिता पॉलदुराई यांचा जन्मदिन.

२२ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 22 June Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९४० साली रशियन हवामानशास्त्रज्ञ व वनस्पतीशास्त्रज्ञ ब्लाडिमार पी. कोपेन यांचे निधन.
  • सन १९५५ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू सदाशिव गणपतराव शिंदे यांचे निधन.
  • सन १९८५ साली थोर भारतीय स्वतंत्र सेनानी व समाजसुधारक आणि राजकीय कार्यकर्ता तसचं, आर्य समाज व आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीचे अनुयायी मोहरसिंग राठोड यांचे निधन.
  • सन १९८८ साली भारतीय बौद्ध भिक्षू, अभ्यासक, प्रवासी व लेखक भदंत आनंद कौसल्यायन यांचे निधन.
  • सन १९९४ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता भारतीय तेलगु भाषिक चित्रपट निर्माता, अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि उद्योगपती ए. वी. प्रसाद यांचे निधन.
  • सन २००० साली हिंदी भाषिक लेखक व कवी केदारनाथ अग्रवाल यांचे निधन.
  • सन २०१२ साली रोमन कॅथोलिक चर्चचे भारतीय धर्मगुरू गिल्बर्ट ब्लेझ रेगो(Gilbert Blaze Rego) यांचे निधन.
  • सन २०१४ साली भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता राम नारायणन यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved