रागावर नियंत्रणासाठी काही टिप्स

मित्रांनो, तुम्ही ती “Angry Bird” movie पाहिली काय ? तसे पाहिले तर हि लहान मुलांची movie आहे. परंतु यामध्ये आम्हा मोठ्यांसाठी देखील एक संदेश दिलेला आहे. या सिनेमातील मुख्य पात्र खूप रागीट होते आणि याच मुळे तो birds च्या वसाहती पासून दूर समुंद्रकिनारी घर बनवून राहत असे. आणि जेव्हा तो आपल्या रागावर नियंत्रण / Control Anger करणे शिकून घेतो तेव्हा तो वसाहतीचा hero बनून जातो.

या सिनेमात असा मुख्यतः संदेश दिला जातो कि राग हा कोणत्याही गोष्टीवर इलाज नाही. चला तर पाहूया –

Control Anger

रागावर नियंत्रणासाठी काही टिप्स / How To Control Anger Marathi

राग हा कोणत्याही गोष्टीवर इलाज नाही.

हि एक गोष्ट खरी आहे कि राग म्हणजे क्रोध एक प्राकृतिक आणि सामान्य भावना आहे आणि हि व्यक्तिच्या मुलभूत भावना मधील एक आहे. हि व्यक्तीची एक शारीरिक प्रतिक्रिया आहे. जर हे म्हटले कि हा राग व्यक्तीच्या सुख आणि दुःख या प्रमाणे ही एक भावना आहे तर ते चुकीचे ठरणार नाही, परंतु कधी– कधी कुणाचा राग या मर्यादेपर्यंत वाढत जातो कि तो स्वतःच्या आयुष्यावर आणि दुसऱ्यांच्या आनंदावर परिणाम करायला लागतो.

खूप लोक असे असतात कि ज्यांना राग तर येतो परंतु ते हे स्वीकारायला तयार नाही कि ते रागीट स्वभावाचे आहेत.

खर हे आहे कि जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा तो out of control होउन जातो.

अशावेळी ते ज्यांच्याशी प्रेम करतात त्यांनाच नुकसान करू लागतो. आमच्यातील खूप कमी लोक असे असतात कि जे त्यांचा स्वभाव रागीट आहे असे मानायला तयार असतात. आज आपणास आपल्या रागाला ओळखण्याचे संकेत आणि त्या पासून सुटका कशी करता येईल या विषयी बोलणार.

रागाला ओळखण्याचे संकेत –

जीवन केवळ सुखाचे नाव नाही , यामध्ये सुखासोबत संकटेसुद्धा येत-जात राहतात. अशावेळी कठिन परिस्थितिचा बाऊ करण्यामध्ये शहाणपण नाही आहे परंतु आपल्या रागापासून आपले नाते वाचविण्यात शहाणपण आहे.

रागाचे काही स्पष्ट sings असतात ज्यामुळे हे माहिती होते कि आम्ही रागामध्ये आहे. जशे –

  • धैर्या ची कमी
  • शिवी देणे
  • समोरच्यास कमी लेखने
  • चिड़चिड़ करणे
  • प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला दोषी ठरविणे.
  • राग आल्यावर काम बंद करणे किंवा मागे हटून जाणे
  • लोकांचे तुमच्यापासून दूर जाणे
  • पत्नी मुले आणि नातेवाइकांचे तुमच्याशी भीतीने बोलणे.

याला आपण एक प्रकारे सामान्य लक्षण मानु शकतो. परंतु या शिवाय रागाचे खूप सारे signs असू शकतात.

आमच्या आजू बाजूचे लोक, मित्र, नातेवाईक किंवा स्वतःमध्येही या प्रकारचे लक्षण असू शकतात.

परंतु याबाबत कोण्याही प्रकारची शरम नको यायला. या समस्येचे समाधान शोधायला पाहिजे.

यासाठी जर असे वाटते कि आपल्याला राग येत आहे तर यामध्ये आपल्याला स्वतःच आधी पाऊल उचलावं लागेल.

आता प्रश्न हा आहे कि रागावर कसे नियंत्रण करावे त्यासाठी पुढील उपाय आहे :

रागावर नियंत्रण करण्यासाठी काही सोपे उपाय –

बहुतक लोक आपल्या रागाला मित्र, नातेवाईक याच्यापासून लपवून ठेवतात. परंतु यांच्या रागाची माहिती या लोकांना आपल्या प्रियजनांशी केलेल्या व्यवहारावरून माहिती होते.

यांच्या रागाचे दर्शन आपण तेव्हा करू शकतो जेव्हा असे लोक त्यांच्यावर राग दाखवतात ज्यांना ते प्रिय आहेत.

जर तुम्ही सुद्धा एवढे रागीट माणूस आहात तर काही सोपे उपायाला वापरून रागाला झटकन गायब करून आपल्या नात्यांना सुन्दर बनवू शकता –

10 पर्यंत number मोजा –

जेव्हा आपल्याला वाटते कि तुम्ही रागात आहात तेव्हा सर्वात आधी काहीही प्रतिक्रिया देण्यापेक्षा शान्त व्हा आणि लांब श्वास घ्या यामुळे आपल्याला रागावर control करण्यासाठी मदत होईल आणि एक गोष्ट जी आपल्याला बालिश वाटेल जी मी तुम्हाला सांगायला जात आहे, आणि ती आहे कि 1 ते 10 पर्यंत नंबर मोजा.

यामुळे आपल्याला विचार करायला आणि समजायला थोड़ा वेळ मिळेल.

एक break घ्या –

जर आपण रागामध्ये अनियंत्रित होत असाल तर सर्वात आवश्यक अशी परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला वाटेल कि राग खूप येत आहे.

तेव्हा आपण कोणत्याही विवादात पडू नये कारण कि आपण आपले नियंत्रण सुटण्याची शक्यता असते.

त्यामुळे चांगले हेच राहील कि तुम्ही त्या जागेवरून दूर व्हावे / एक छोटा break घ्या / थंडे पाणी प्या आणि थोडे फार चालू लागा.

अशा प्रकारे जेव्हा तुम्ही आणि दूसरा व्यक्ति शांत होईल तेव्हा आपली चर्चा पुन्हा सुरु करू शकता.

रागाचे कारण ओळखा –

रागाशी डील करण्यासाठी सर्वात आवश्यक हे शोधणे आहे कि रागाची कोणत्या परिस्थिति मुळे वाढ होत आहे. परिस्थिति आणि कारणांना व्यवस्थित समझून घ्यावे त्यापासून आलेल्या त्रासाला दूर करावे.

व्यायाम करील रागाला शांत –

व्यायाम आणि विश्राम यामुळे रागाच्या स्तराला कमी करण्याचा प्रयत्न करा. काही exercise जसे swimming, morning walk आणि योग यामुळे रागावर कंट्रोल केल्या जाऊ शकते.

सकाळच्या ताज्या हवेमध्ये निसर्गासोबत काही वेळ राहणे, दीर्घ श्वास घेणे इत्यादी मनाला शांती देईल.

रागावर नियंत्रण मिळविण्यात खूप फायदेशीर राहील. यासाठी आपल्या दैनिक जीवनात ध्यान आणि योग यांना जरुर समाविष्ट करा.

Sleep well –

कधी – कधी work load मुळे आम्ही व्यवस्थित झोपू शकत नाही. ज्यामुळे डोकेदुखी, तनाव आणि चिडचिड होणे आणि आम्ही विनाकारण दुसरयावर ओरडतो.

यासाठी तुम्ही तुमच्या व्यस्त दिनचर्येमधून 7 तासांची वेळ झोपण्यासाठी जरुर काढा कारण 7 से 8 तासांची झोप चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते.

रागीट स्वभाव माणसाच्या इच्छेवर पाणी सोडतो. आपल्या रागाला दाबू नका. आपल्या रागाच्या कारणास ओळख आणि रागाला दूर करण्याचा प्रयत्न करा.

एक वेळ प्रयत्न तर करून पहा मग आपल्याला स्वतःलाच जाणवेल कि राग नष्ट झाल्यामुळे नाते किती सुंदर होतात.

3 COMMENTS

  1. मला खुप राग येतो. थोड्या थोड्या कारणावरून पत्नी संघ भांडत राहतो. कृपया मला विलास सांगा. मला थोडा तिचा द्या मला थोड्या टीप द्या थोडा मार्ग सांगा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here